सायुज्य कुलदेवी उपासना (मोफत ऑनलाइन सत्र)

🌺 महाशक्तिपीठ सायुज्य कुलदेवी उपासना — मोफत ऑनलाइन सत्र 🌺

आपल्या जीवनात प्रत्येकाची एक कुलदेवी असते. ती आपली आध्यात्मिक आई, आपली वंशरक्षक शक्ती असते. पण आज अनेकांना आपली कुलदेवी कोण आहे हेच माहीत नाही… किंवा माहिती असूनही उपासना थांबली आहे. म्हणूनच महाशक्तिपीठ सायुज्य तर्फे एक विशेष मोफत ऑनलाइन सत्र (Session) आयोजित करण्यात आले आहे.

या सत्रात कुलदेवी उपासना संदर्भातील अनेक महत्त्वाचे विषय स्पष्ट करण्यात येतील 
🔹 कुलदेवी म्हणजे नक्की कोण?
🔹 आपली कुलदेवी माहीत नसल्यास काय करावे?
🔹 कुलदेवीची उपासना न केल्याने कोणत्या समस्या निर्माण होतात?
🔹 कुलदेवीच्या कृपेने जीवनात कोणते बदल होतात?

हे सत्र पूर्णतः ज्ञानपर आणि मार्गदर्शनात्मक असेल, ज्यामध्ये गुरु रेवती माई कुलदेवी उपासनेचा खरा हेतू, महत्त्व आणि तिची ऊर्जा आपल्या जीवनात कशी जागृत होते याचे मार्गदर्शन करतील.

🔱 सत्राची खास वैशिष्ट्ये 🔱

  • गुरुमाई यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन

  • प्रश्नोत्तर सत्र – कुलदेवी उपासनेशी संबंधित प्रश्नांची उत्तरे

  • उपासनेसाठी अंतःकरणाची तयारी

  • महाशक्तिपीठ सायुज्य कुलदेवी उपासना चे वैशिष्ट्य

📿 नोंदणीसाठी (Join now) खालील लिंकवर क्लिक करा:
सत्र Zoom Meeting द्वारे आयोजित केले जाईल. तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावरून सहज सहभागी होता येईल.

🌸 ही संधी आहे आपल्या वंशशक्तीशी पुन्हा जोडण्याची, आपल्या कुलदेवीशी सायुज्य साधण्याची.
प्रत्येक स्त्री–पुरुषासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी ही उपासना एक जीवनपरिवर्तनाचा आरंभ ठरू शकते.

🙏 महाशक्तिपीठ सायुज्य तर्फे आपणांस या पवित्र सत्रात सहभागी होण्यासाठी हार्दिक निमंत्रण! 🙏







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Latest Post

अत्यंत विशेष उपाय

वैयक्तिक सशुल्क मार्गदर्शन घेणाऱ्यांसाठी महाशक्तिपीठ तर्फे करण्यात येणारे उपाय हे सर्वसामान्य किंवा सार्वजनिक स्वरूपाचे नसून अत्यंत विशेष, भ...