महाशक्तीपीठ विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाशक्तीपीठ विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

महाशक्तिपीठ भक्तिसेवा सदस्य


हजार नाही, लाख नाही, करोडो नाही... खरी भक्ती ही पैशाच्या राशीत नाही मोजली जात. खरी भक्ती ही त्या साध्या, निरपेक्ष भावात आहे जो मनातून उगम पावतो. महाशक्तिपीठ याच भावनेवर उभं आहे. इथे दान हे कोणत्याही बंधनाखाली नाही, कोणत्याही दबावाखाली नाही, तर ते फक्त आणि फक्त भक्ताच्या मनापासून आलेल्या श्रद्धेच्या भावनेतून असतं.

आजकालच्या जगात मोठं दान करणाऱ्यांची नावे पुढे केली जातात, मोठमोठे दान करणाऱ्यांचा गौरव केला जातो. पण महाशक्तिपीठाचं वेगळेपण इथेच आहे की, इथे कोण किती रक्कम दिली याला महत्त्व नाही. कारण आई जगदंबा ही केवळ पैशाने नाही तर भक्ताच्या भक्तिसेवा करण्याच्या भावनेने प्रसन्न होते. एका रुपयाने दिलेलं दानही तिच्या दृष्टीने तितकंच मोठं असतं जितकं लाखोंनी दिलेलं दान. कारण खरी किंमत आहे ती भक्तीची, आस्थेची, नि:स्वार्थ सेवाभावाची.

म्हणूनच महाशक्तिपीठात सदस्यत्व घेण्यासाठी कोणतेही दान देणे आवश्यक नाही. इथे केवळ नाव नोंदवूनही आपण अधिकृत सदस्य बनू शकतो. कारण महाशक्तिपीठात प्रवेश हा दानावर अवलंबून नाही, तर श्रद्धेवर अवलंबून आहे. आईच्या कार्यात सामील व्हायचं आहे का, तिच्या दैवी सेवेला हातभार लावायचं आहे का – हा एकच प्रश्न आहे. आणि याचं उत्तर जेव्हा "हो" असतं, तेव्हाच भक्ताला आईच्या मंडळात स्थान मिळतं.

यात दान देणारे भक्तही आहेत आणि दान न देऊ शकणारे भक्तही आहेत. पण दोघांनाही इथे समान सन्मान आहे. कारण महाशक्तिपीठ हे फक्त पैशाने नाही तर भक्तांच्या प्रेमाने, सेवाभावाने आणि नामस्मरणाने उभं आहे. जगदंबेला मानणारे असोत वा न मानणारे, अखेर तीच आई आहे. तिच्या कृपेच्या छायेखाली प्रत्येक मूल समान आहे. आई कधी आपल्या लेकरांमध्ये भेद करत नाही. म्हणून महाशक्तिपीठ सुद्धा भेद करत नाही.

महाशक्तिपीठात सर्वांना प्रवेश आहे. कारण हे पीठ हे पैशाचं, शक्तीचं किंवा मानाचं नाही तर भक्तीचं, प्रेमाचं आणि एकात्मतेचं आहे. इथे प्रत्येक सदस्य एक समान आहे. ज्या भक्ताने मनापासून दान केलं त्याचं स्वागत आहे, पण ज्याच्याकडे दान करण्यासारखं काही नाही त्याचंही स्वागत आहे. कारण शेवटी दान हे दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी आहे. आपण आईच्या चरणी अर्पण केलं की मनाला समाधान लाभतं, अंतरंगात शांती येते आणि जीवनात एक नवीन ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो.

म्हणूनच महाशक्तिपीठाचं तत्त्व एकदम स्पष्ट आहे "भक्तीची किंमत नाही, आस्थेला बंधन नाही, आणि जगदंबेच्या कृपेला अट नाही." जो मनापासून जगदंबेला आपलं मानतो तो महाशक्तिपीठाचा भाग आहेच. आणि जो अद्याप मानत नाही, तोही आईचा लेकच आहे. कारण अखेर जगदंबेची माया ही सर्वव्यापी आहे. महाशक्तिपीठ हे तिच्या त्या मायाळू छायेतले एक जिवंत रूप आहे, जिथे प्रत्येकाला स्थान आहे – दान करणाऱ्यालाही, न करणाऱ्यालाही.! भक्तिसेवा



Latest Post

अप्सरा, यक्षिणी आणि योगिनी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनेक जण विचारतात की अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी किंवा अशा सूक्ष्म जगातील शक्तींची साधना करता येते का. पुस्तके वाचून, यूट्यूबवरील व्हिडि...