श्रीगुरुचरित्र वाचनाचे वेळी आवर्जून पाळावेत असे, २० नियम व पथ्ये!

तीन दिवस, सात दिवस किंवा नित्य ५ ओव्यांचे पारायण करतानादेखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे.

श्रीगुरुचरित्र वाचनाचे वेळी आवर्जून पाळावेत असे, २० नियम व पथ्ये!

श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने  आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या.

तीन दिवस, सात दिवस किंवा नित्य ५ ओव्यांचे पारायण करतानादेखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे. ते नियम कोणते, याबाबत केशवतनय माहिती देतात-

१. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आन्हिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते, त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून, त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे, असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले, तरी श्रीदत्तात्रेयदेवता प्रीत्यर्थ किंवा श्रीदत्तात्रेयदेवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा.

हेही वाचा : श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती.

२. नंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

३. वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे. 

४. वाचनापूर्वी संध्या व १०८ गायत्री जप अवश्य करावा.

५. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे.

६. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे.

७. वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये, मध्येच कुणाशी बोलू नये.

८. पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी.

९. कायिक, वाचिक, मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे.

१०. या सात दिवसांत दाढी करू नये. तसेच केस व नखे कापू नयेत.

११. पारायण काळात तिखट, मीठ, आंबट, कांदा, लसूण, परान्न कटाक्षाने टाळावे. एकभूक्त राहावे. सायंकाळी दूध प्यावे.

१२. जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हाव़े 

१३. समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा. 

१४. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा. 

१५. रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी. 

१६. वाचनात यांत्रिकपणा नको. मनोभावे वाचन करावे. 

१७. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मधेच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने `यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो.' असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच, सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा.

१८. या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा, तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकिकत आली असेल, त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये. ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते, तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे. 

१९. स्त्रियांनीदेखील आपला मासिक धर्म पार पाडून शुचिर्भूत होऊन श्रीदत्तचरित्राचे पारायण करावे.

२०. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे, इप्सित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे.



भोंदूने सुशिक्षित बाईला लुबाडले....

जय जगदंब जय भवानी 🙏

मी रश्मीताई, तुमच्यापैकी अनेकांना माहीत असलेली.आज मी तुम्हाला माझी या जगदंबेच्या चरणी जोडले जाण्याची कहाणी सांगणार आहे. मी या इथे माईंच्या बरोबर जोडले जाण्याआधी मी अतिशय विचित्र परिस्थितीत फसले होते. माझ्या मुलीचे लग्न लावून दिले होते. पण म्हणतात ना आपले चांगले झालेले लोकांना बघवत नाही. मी एवढी सुशिक्षित असतानाही मला एका भोंदु बाबाने फसवले. त्याने माझे घरातील भांडी, जमीन जुमला माझाकडे असलेला पैसा अडका सगळे फसवून काढून घेतले. आणि दोन बॅग हातात देऊन हाकलून दिले.

आपले सर्वस्व हिरावून घेतलेले असताना माईंची ओळख झाली होती. शेवटी माईंनी तिकीट काढून दिले. आणि स्वतःकडे बोलावून घेतले. स्टेशनवर दादाला पाठवून मला घरी घेऊन आल्या.

खरे तर मी माझेच सांगत आलेय पण माईंनी कोणत्या परिस्थितीत मला आधार दिला ते तर सांगितलेच नाही. स्वतः माईं स्वता अत्यंत साध्या परिस्थिति मध्ये राहतात. अशाही परिस्थितीत त्यांनी एका बेघर झालेल्या स्त्रीला (मला) आधार दिला.

मी घरी गेले तर ," तू दिवसभर काही खाल्ल नसेल, हातपाय धुवून जेवायला बस." असे आईच्या मायेने जेवायला घातले. दोन तीन दिवस मला शांत होऊ दिले पण त्यांनी बघितले की मी नैराश्य आणि माझ्या मुलीच्या आठवणीत दिवसरात्र खणगून जात आहे आणि मनाला खात आहे, मी डिप्रेशन मध्ये जाऊन जीवाचे काही बरे वाईट करू नये म्हणून त्यांनी मला महाशक्तीपिठात येणारे कॉल्सला उत्तर द्यायला सांगितले यामुळे माझे लक्ष माझ्या दुख आणि भूतकाळवरुण वळवले. तेव्हा पासून मी जवळपास सर्वच कॉल मी उचलते.

मी आज 3 वर्षापासून माईंनकडे राहते पण आजवर कधीही त्यांना पैसा जमा करताना बघितले नाही. दक्षिणेत आलेले पैसे सरळ गोसेवेसाठी पाठवून देतात. जेवढे आवश्यक आहे तेवढेच घेतात. न त्यांना पैशाचा लोभ न सोन्याचे दागिने घालून मिरवण्याची हौस. आजच्या भडक कपडे आणि दागिने घालून मिरावणाऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये मला माझी गुरुमाई साक्षात ब्रह्मचारिणी स्वरूपातील जगदंबा म्हणून भासते. त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते भडक मेकअप करून फिरणाऱ्यामध्ये येउच शकत नाही. त्यांच्या कित्येक शिष्यांना हायसे वाटते कारण मी माईंच्या सहवासात राहून उपासना शिकले. रोज त्यांच्या सोबतच उपासनेला बसते. आणि कधी कधी त्यांच्या हातचे प्रसादरूपी जेवण सुद्धा मिळतो. अन्नदान करताना सर्रास माईच स्वयंपाक करतात. माईंच्या हातचे जेवण मिळणे म्हणजे साक्षात अन्नपूर्णेची कृपा होणे आहे.

असे माझे आणि महाशक्तीपीठ परिवाराचे एक अजोड असे नाते निर्माण झाले. मला माईंनी फोनवर बोलताना," जय जगदंब" असे म्हणायला सांगितले. त्याप्रमाणे मी तसेच म्हणायला सुरुवात केली आणि जगदंबेच्या नावाचा हा मंत्र माझ्या आयुष्यात एक परिवर्तन देऊन गेला.

अशा या 'जय जगदंब' या मंत्राचे माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. "जगदंब "या मंत्राने माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. या मंत्राने मला आत्मविश्वास दिला. या मंत्राने मला जगण्याची उमेद दिली, या मंत्राने मला समाजात इज्जत दिली. मला मान मिळाला.मला जगण्याचा नवा मार्ग मिळाला.या मंत्राने माझी आध्यात्मिक उंची वाढली आणि इहलोकीचा मार्गही मोकळा झाला.

महाशक्तीपिठाने 108 कोटी जगदंब नामलेखन आणि शक्तियाग याचे व्रत घेतले आहे. आणि त्यात मी सुद्धा सहभाग घेतला आहे. तुम्ही म्हणाल की आता यात सहभाग घेण्यासाठी किती दक्षिणा लागते? किती फी लागते? तर त्याचे उत्तर एक रुपया पण दक्षिणा किंवा फी लागत नाही.लागते ती फक्त श्रद्धा आणि भक्ती.. या दोन गोष्टी तुमच्याजवळ असतील तर तुम्ही नक्कीच या नामाचा वसा घेऊ शकता. मी रोज जसा मला वेळ मिळेल तसे नामलेखन करत आहे. अत्यंत दिव्य अनुभव मी अनुभवले आहेत. दुसरे म्हणजे नाम लेखनाचा वसा घेतल्याने मनातली भीती नाहीशी झाली. मन शांत आणि स्थिर झाले. मनातल्या वेदना हळूहळू कमी झाल्या. मनाची अस्वस्थता, उलघाल कमी झाली.

आणि महाशक्तीपिठात येणारे जवळपास सर्वच कॉल मी उचलते किंवा कधी कधी कोणी दुसरे महाशक्तीपिठातील उपासक उचलतात. म्हणून माझे सर्व शिष्य परिवार आणि इतरांसोबत बोलणे होतेच. त्यातून मला कळतेच की माझ्यासारखेच नामलेखणचे व्रत घेतलेल्यांना वेगवेगळे अनुभव आले. कोणाचा आर्थिक प्रश्न सुटला. कोणाला कौटुंबिक सुख प्राप्त झाले.

आता हा अनुभव मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की जीवनात अध्यात्माची पायरी चढून अनुभव घेण्याची इच्छा ठेवणाऱ्यांनी हे व्रत घेऊन त्याचा दिव्य अनुभव घ्या आणि आपल्या बरोबर किमान दोघांना तरी याची माहिती द्या जर त्या व्यक्ति च्या नशिबात असेल तर करेल नाही तर जशी जगदंबेची इच्छा!
या नामलेखनाच्या व्रत घेऊन आत्मविश्वास आणि जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी तयार व्हा!

जय जगदंब जय भवानी जय शिवराय🙏🙏🙏

लेखिका - रश्मिताई



देवीचा अत्यंत प्रभावी चतुराक्षरी मंत्र

महाशक्तिपिठात अनेक भक्त देवीच्या उपासनेसाठी येतात. त्यांचं एकच आग्रहाचं मागणं असतं – "माई, मला एखादा गुप्त, गोपनीय, सिद्ध बीजमंत्र द्या… जो फक्त मला मिळेल, जो अतिशय शक्तिशाली असेल." त्यांच्या चेहऱ्यावर एक शोध असतो – मंत्राचा, देवीच्या कृपेचा, आणि त्यातून मिळणाऱ्या दिव्य अनुभूतीचा.

पण आजचं वास्तव काय आहे? सोशल मीडियावर मंत्र वाटणारे आणि विकणारे अनेक ढोंगी लोक तयार झालेत. त्यांनी समाजात एक चुकीची संकल्पना पेरली आहे – की प्रत्येक देवी वेगळी आहे, आणि प्रत्येक देवीचा वेगळा बीजमंत्र असतो. त्यामुळे लोक एका मंत्रानंतर दुसऱ्या मंत्राच्या मागे धावू लागलेत. एका देवीकडून दुसऱ्या देवीकडे, एका पुस्तकातून दुसऱ्या ग्रंथात, एका यूट्यूब चैनलवरून दुसऱ्यावर.

पण ज्याने देवीला हृदयाने ओळखलं आहे, ज्याचा तिच्यावर नितांत श्रद्धेचा, नात्याचा आणि समर्पणाचा विश्वास आहे – तिच्या छत्रछायेखाली असलेल्याला देवी खुणावतेच… की "बाळा, तुला माझा मंत्र बाहेर शोधायचा नाही, तुला माझं नाव मनात धारण करायचं आहे."

हिऱ्याची पारख जोहरीलाच असते, तसंच मंत्र आणि त्यामागच्या अदृश्य शक्तीची खरी ओळख केवळ गुरुच करू शकतो. कारण गुरु केवळ शब्द देत नाही, तो शब्दात शक्ती जागवतो. तो मंत्राची लय, गती, वेळ, श्रद्धा आणि त्यामागचा भाव – सगळं तपासून, त्या शिष्याच्या आत्म्याशी सुसंगत असा मंत्र देतो.

असाच एक हिरा… आणि असाच एक मंत्र… जो आजवर बहुतेकांच्या दृष्टीने एक दगड वाटला. केवळ एक शब्द, केवळ एक साधा उच्चार वाटला – पण ज्यात देवीचं अखंडीत अस्तित्व साठलेलं आहे.

आज मी त्याच मंत्राची, त्याच हिर्याची खरी किंमत, खरी महती तुमच्यासमोर मांडते आहे.

तो मंत्र म्हणजे – ‘जगदंब’.

देवीचं रूप, तिचे विविध भास, तिचे वेगवेगळे मंत्र आणि बीजाक्षरं जरी स्वतंत्र वाटत असली, तरी त्यांच्या पाठीमागची शक्ति मात्र एकच आहे – आदिशक्ति. काहींना दुर्गा आवडते, काहींना लक्ष्मी, काही सरस्वतीची उपासना करतात, काही कालीला आवाहन करतात, पण हे सगळे प्रवाह अखेर एका महासागरातच एकवटतात – ती म्हणजे जगदंबा. देवी कोणत्याही रूपात असो, तिची करुणा, रक्षणाची भावना आणि जागृत शक्ती एकच असते. म्हणूनच देवीची कृपा मिळवण्यासाठी मोठे यज्ञ, क्लिष्ट साधना किंवा गुह्य बीजमंत्र आवश्यक नाहीत. तिच्या कृपेचा एकच दार आहे – 'जगदंब'.

‘जगदंब’ हा मंत्र पाच बीजाक्षरांनी तयार झालेला आहे – ज, ग, द, अं, ब. हे पाच अक्षरं केवळ उच्चारायचे शब्द नाहीत, तर ही पाच उर्जेची केंद्रं आहेत. ‘ज’ हे अक्षर जागृतीचं प्रतीक आहे. हे मनातील सुप्त शक्तींना जागं करतं. ज्ञान, प्रेरणा आणि चेतना जागवणारा नाद म्हणजे 'ज'. देवी सरस्वतीचं ते मूर्त स्वरूप आहे. ‘ग’ हे स्थैर्य, गुरुत्व आणि महत्त्वाचं द्योतक आहे. देवी लक्ष्मीप्रमाणे हे अक्षर आपल्या आयुष्यात समृद्धी, संतुलन आणि प्रेमाचा भाव घेऊन येतं. ‘द’ हे अक्षर दमन आणि दयाचं प्रतीक आहे. महाकालीप्रमाणे हे अक्षर आपल्यातील अंधाराचा नाश करतं, भीती नष्ट करतं, आणि संरक्षण प्रदान करतं. ‘अं’ हे नादब्रह्माचं बीज आहे. या नादात संपूर्ण विश्वाची ऊर्जा विलीन आहे. हे अक्षर मंत्राला ब्रह्मत्व प्रदान करतं. आणि शेवटी ‘ब’ – हे आईपणाचं, भावनेचं आणि भक्तीचं बीज आहे. आईची माया, प्रेम, आणि सर्वांना कवेत घेणारी भावना या अक्षरामध्ये सामावलेली आहे.

या मंत्रामध्ये देवीच्या तीन मुख्य रूपांचा – महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली – पूर्ण समावेश आहे. ज्ञान, धन, आणि शक्ति – ही सृष्टीची तीन मूलभूत स्तंभ आहेत, आणि हे तिन्ही या मंत्रामध्ये वास करतात. म्हणून ‘जगदंब’ हा केवळ एक मंत्र नाही, तर संपूर्ण देवीतत्त्वाचं सार आहे. या एका मंत्राच्या जपाने सृजन, पालन आणि संहार – या तीनही शक्ती जागृत होतात. हा मंत्र मनाला स्थिर करतो, चिंतनाला गती देतो, आणि अंतःकरणात नवी प्रकाशरेषा उमटवतो.

खूप जण देवीच्या विविध रूपांचे गुप्त बीजमंत्र शोधत गुरुंना किंवा ग्रंथांना भेटतात. पण खरा मंत्र हा शोधून सापडत नाही, तो भक्ताच्या अंतरातून प्रकट होतो. जो देवीच्या छत्रछायेखाली असतो, त्याला हीच ओळख पटते की 'तिचं नाव, तिचं खरं रूप म्हणजे जगदंब'. त्यामुळे हा मंत्र दुसरीकडे शोधायची गरजच नाही. तो आई स्वतः वेळोवेळी समोर आणते – कधी एखाद्या गाडीत, दुकानात, पोस्टमध्ये, पुस्तकात, किंवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून. जणू काही ती म्हणतेय, “बाळा, मी इथे आहे, माझं नाव घे. माझ्या नावातच माझं अस्तित्व आहे.”

ही अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे. केवळ या एका मंत्राच्या सतत जपामुळे त्यांच्या आयुष्यात अमूल्य बदल घडले. अंधारातून प्रकाश मिळाला, संकटातून मार्ग सापडला, हृदयातील वेदना शांत झाल्या, आणि आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला. हे मंत्र तिचं स्मरण आहे, तिचं रक्षण आहे, आणि तिच्या अनंत कृपेची ओळख आहे.

‘जगदंब’ उच्चारला की एकदा का मनात आईचं स्मरण जागं झालं, की त्या नावातच पूर्ण साधना, उपासना आणि शांती सामावलेली आहे. म्हणूनच, कुठल्याही मोठ्या तयारीशिवाय, विधीशिवाय, फक्त श्रद्धेने हा मंत्र घेतला तर त्यातून देवी स्वतः प्रकट होते. ही आई आहे – ती अवघड करत नाही, ती सोपी करत जाते. तिचा मंत्रही तसाच – सहज, सरळ आणि अत्यंत प्रभावशाली.

जगदंब म्हणजे आदिशक्तीचं मूर्त स्वरूप. तिचं हे नाव – ज, ग, द, अं, ब – यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य लपलेलं आहे. हे नाव जपलं, की कुठल्याही रूपाची कृपा, कुठल्याही देवीचा आशीर्वाद आपोआप मिळतो. मग ते दुर्गेचं रक्षण असो, लक्ष्मीचं वैभव असो, की सरस्वतीचं ज्ञान – या सगळ्यांचं केंद्र आहे ‘जगदंब’.

ती आपल्या लेकरांचं रक्षण करते, त्यांच्यावर प्रेम करते, त्यांना संकटांमधून बाहेर काढते. कित्येक वेळा जीवनात अशी क्षणं येतात की कुणीही आपल्यासोबत नसतं, भीती वाटते, संकटं वेढून टाकतात – अशा क्षणी फक्त ‘जगदंब’ म्हणावं – आणि आश्चर्यकारकरित्या एक आंतरिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि शांतता जाणवते. हा मंत्र संकटात कवच बनतो. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की हा मंत्र जपल्याने त्यांच्यावरचं संकट सहजपणे टळलं, मन शांत झालं, मार्ग सापडले.

हा मंत्र मनाला केंद्रित करतो. जेव्हा आपण 'जगदंब' म्हणतो, तेव्हा आपलं चंचल मन थांबतं, श्वास स्थिर होतो आणि आपल्या अंतर्मनाशी एक संपर्क तयार होतो. यामुळे ध्यान गाढ होतं, चिंतन सखोल होतं, आणि ज्या समस्यांनी मनात गोंधळ माजवला होता त्या हळूहळू विरून जातात. जगदंब मंत्राचं हे एक मोठं सामर्थ्य आहे – की तो आपल्या आतल्या अंधाराला शांतीच्या प्रकाशाने भरून टाकतो.

गुरुकृपायुक्त उपासकांसाठी तर हा मंत्र अधिक प्रभावशाली ठरतो. जेव्हा हा मंत्र गुरुच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या कृपाछायेखाली जपला जातो, तेव्हा त्याची ऊर्जा अनंतपटीने वाढते. कारण गुरुचरणांशी जोडलेलं मन जेव्हा भगवतीचं नामस्मरण करतं, तेव्हा त्या मंत्राच्या प्रत्येक अक्षरातून कृपेचा प्रवाह वाहू लागतो. त्यामुळे हा मंत्र एक केवळ जपण्याचा उपक्रम न राहता, एक जीवंत, अनुभवण्याजोगा उपासनेचा प्रवास बनतो.

अनेकांनी आपल्या अनुभवातून सांगितलं आहे की हा मंत्र त्यांचं आयुष्य पालटवून गेला. काहींना मानसिक अंधारातून प्रकाशाकडे नेलं, काहींना आरोग्य मिळवलं, काहींना भावनिक आधार दिला. काहींना जिथे सर्व मार्ग बंद झाले होते, तिथे हा मंत्र नवा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ ठरला. एक मुलगी आत्महत्येच्या विचारांतून बाहेर आली, एका आईने आजारी मुलासाठी रात्रंदिवस 'जगदंब'चा जप केला आणि अचंबित करणाऱ्या पद्धतीने बाळ ठणठणीत झालं – असे अनुभव केवळ ऐकायला नाही, तर अनुभवायलाही मिळाले आहेत.

'जगदंब' हा मंत्र कोणत्याही विशेष विधीशिवाय, कोणत्याही मोठ्या तयारीशिवाय केवळ श्रद्धेने जपता येतो. दररोज सकाळी किंवा रात्री, शांत बसून, डोळे मिटून, हृदयात भगवतीचं स्मरण करत फक्त ‘जगदंब… जगदंब…’ म्हणत राहिलं, तरी आतून खूप काही बदलतं. सुरुवातीला फक्त शब्द वाटतात, पण हळूहळू त्या शब्दांमागे एक शक्ती जाणवू लागते. ही शक्ती आपल्या बोलण्यात, विचारांत, वागण्यात उतरते.

गर्भवती स्त्रियांनी ‘जगदंब’ मंत्राचा जप केल्यास गर्भातील बाळावर खूप सकारात्मक प्रभाव होतो. लहान मुलांना हाच मंत्र शिकवला, ऐकवला, तर त्यांच्या मनात श्रद्धा, स्थैर्य आणि शांतता वाढते. या मंत्रात आईपणाची अशी करुणा आहे की लहानसहान मुलांच्या मनालाही तो पोसतो, समजतो.

अमावास्या, नवरात्र, चंद्रग्रहण यासारख्या दिवशी ‘जगदंब’ मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो. परंतु खरा प्रभाव तर नियमिततेमध्ये आहे. जेव्हा आपण दररोज हाच मंत्र जपत राहतो, तेव्हा आपलं आयुष्य हळूहळू त्याच्या प्रभावाने आकार घेतं – अधिक समर्थ, अधिक प्रेमळ आणि अधिक शांत बनतं.

‘जगदंब’ म्हणणं म्हणजे आईला हाक मारणं. हे नावच इतकं मधुर, इतकं शक्तिशाली आहे की एकदाच मनापासून उच्चारलं तरी आंतरिक बळ जागं होतं. आणि हा मंत्र जर मनात स्थिर झाला, तर आयुष्य अस्थिर राहू शकत नाही. ‘जगदंब’ हा मंत्र म्हणजे जीवनाच्या अंधाऱ्या रस्त्यावरचा एक तेजस्वी दीप आहे. तो मंत्र, ती आई, ती शक्ती आपल्या हृदयात असली – तर मग कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही.

जगदंब… जगदंब… जगदंब…

करुणा, रक्षण व आध्यात्मिक उन्नतीचा स्त्रोत. मंत्राच्या दिव्य अनुभवांची गूढ, भावनिक आणि साक्षात्कारपूर्ण मांडणी. देवीचा अत्यंत प्रभावी चतुराक्षरी मंत्र

जगदंब नामलेखन माहिती

जगदंब... एक नाव... एक मंत्र... एक शक्तियात्रा!

"जगदंब" हे केवळ देवीचे नाव नाही, ते एक मंत्र आहे — श्वासासारखा सतत चालणारा, आणि प्राणासारखा प्रत्येकाला जीवन देणारा. जगदंब नावाचा उच्चार केवळ ओठांवर न राहता, मनातून, हृदयातून, आणि आत्म्याच्या खोलवरून होतो, तेव्हाच या नावाची खरी शक्ती प्रकट होते. आणि जेव्हा हे नाव केवळ बोललं जात नाही, तर लिहिलं जातं — आर्ततेने, नित्यनेमाने, श्रद्धेने, तेव्हा ते केवळ अक्षर राहत नाही, ते एक बीज बनतं. शक्तीचं बीज.

१०८ कोटी सामूहिक नामलेखन व्रत आणि शक्तियाग —

हा उपक्रम म्हणजे केवळ भक्तीचा एक मार्ग नव्हे, तर तो आहे हजारो साधकांच्या एकत्रित शक्तीचा महासंकल्प. एक वही... एक लेखणी... एक व्रत... एक शक्ती... हा उपक्रम "महाशक्तिपीठ" मार्फत सुरू करण्यात आलेला आहे. उद्दिष्ट एकच — १०८ कोटी ‘जगदंब’ नाम लेखन करून, संपूर्ण भारतभर एक सामूहिक आध्यात्मिक ऊर्जा तयार करायची आहे. हा व्रत म्हणजे फक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्याचा मार्ग नाही, तो आहे स्वतःच्या आत दडलेली शक्ती जागवण्याचा संकल्प.

हे व्रत कसे करायचे?

दररोज किमान २१०० वेळा ‘जगदंब’ नाव लिहायचं आहे.३६५ दिवसांमध्ये एकूण ७,६६,५०० वेळा हे नाव लिहिले जाईल.तुमच्या हस्ताक्षरात, तुमच्या भावनांनी ओथंबलेलं, तुमच्या आत्म्याचं अर्पण असलेलं हे लेखन एकत्र करून शेवटी एक विशाल शक्तियाग केला जाईल. या शक्तियागात प्रत्येक साधकाची वही आहुती म्हणून अर्पण केली जाईल — आणि त्यातून जागृत होणारी ऊर्जा हजारो आयुष्यं बदलवेल.

हे व्रत का विशेष आहे?

कारण इथे कोणताही भेदभाव नाही. स्त्री-पुरुष, वयोवृद्ध, विद्यार्थी, कामगार, गृहिणी — कोणताही वयोगट असो.हे व्रत मोफत आहे.कोणतीही फी नाही. कोणतेही शुल्क नाही.फक्त एक संकल्प आहे, एक श्रद्धा आहे.

आवश्यक साहित्य:

  • २०० पानी वही

  • लाल शाईचा नवीन पेन (शाई बदलू नये)

  • एक लाल वस्त्र आणि आसन

  • लेखन करताना जवळ ठेवायचं पाणी: वेलची, गुलाबजल, दूध आणि खडीसाखर यांचं मिश्रण

व्रताचे नियम:

  • दररोज उत्तरेकडे तोंड करून लेखन करावं.

  • शुद्ध मनाने, मौनात राहून, शक्यतो मोबाइल/टीव्ही/गोंगाटापासून दूर राहून लेखन करावं.

  • राग, द्वेष, गॉसिप, तक्रारी यांपासून दूर रहावं.

  • लेखन झाल्यानंतर तयार केलेलं पाणी स्वतः प्यावं आणि घरच्या मंडळींनाही द्यावं.

  • बेडवर झोपणं शक्यतो टाळावं. जमल्यास चटईवर झोपावं.

लाल शाईचे महत्त्व

लाल म्हणजे देवीचा रंग — शक्ती, रक्त, जीवन आणि समर्पण.लाल शाईतून लिहिलेलं प्रत्येक "जगदंब" हे अक्षर म्हणजे देवीच्या चरणी अर्पण केलेला शुद्ध भाव, आपल्या रक्तासारखा पवित्र.त्या प्रत्येक अक्षरात तुमचं दुःख, आशा, प्रार्थना, आणि श्रद्धा भरलेली असते.

या व्रताचे अनुभूतीदायक अनुभव:

या व्रतातून आधी अनेक साधकांनी आयुष्याला कलाटणी दिली आहे.

  • कुणाला नोकरी मिळाली

  • कुणाला अपत्यप्राप्ती झाली

  • कुणाला कोर्ट केस मध्ये विजय मिळाला

  • कुणी आत्महत्या टाळली

  • कुणाच्या आयुष्यात पुन्हा समाधान परतलं

हे फक्त अनुभव नाहीत, ही शक्तीची साक्ष आहे.

१०८ कोटी सामूहिक नामलेखन व्रत आणि शक्तियाग. जगदंब

नावनोंदणी कशी करावी?

कोणतंही शुल्क न देता, फक्त एक संकल्प घेऊन खालील लिंकवर तुमचं नाव नोंदवा:


👉 https://forms.gle/aMdYmeU2ZfqYW2oW7

अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क:

📞 7028177950

🌐 www.gurumaai.org

महाशक्तीपिठाचा अनुभव

कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात की वाटतं, सर्व काही अडकून गेलंय. काहीच पुढे सरकत नाही. काही व्यक्तींना वर्षानुवर्षे हीच अवस्था भोगावी लागते. घरात आजारपण सतत येतं, औषधं करावी लागतात, खर्च वाढतो पण उत्पन्न मात्र स्थिरच राहतं. पैसा टिकत नाही, लागोपाठ कर्ज वाढतं, एक संपलं की दुसरं घ्यावं लागतं. नात्यात सतत कुरबुरी, भांडणं, समज-गैरसमज, अगदी रक्ताच्या नात्यात सुद्धा विसंवाद असतो. घरात कोणाशी कोणाचं जमत नाही. सगळे उपाय करून थकल्यावरही काहीच बदल होत नाही. देवदर्शन, व्रतवैकल्य, वास्तु उपाय, ग्रहशांत, मंत्रतंत्र, तांत्रिक उपाय सगळं करून पाहिलं तरी प्रश्न तेच, आणि मनात एक वेगळीच पोकळी निर्माण होते “देव आहे का खरंच?” ही शंका हळूहळू मन पोखरायला लागते.

अशा व्यक्तीचा आणि त्यांच्या कुटुंबाचा छळ समाजाच्या पातळीवर सुरू होतो मानसिक छळ, आर्थिक दडपण, सामाजिक तिरस्कार. मग माणूस एकटाच पडतो. नातेसंबंध, पैसा, आरोग्य, श्रद्धा  सर्व गोष्टी हातातून निसटत जातात. या वेळी हक्काचं कुणी वाटत नाही. अशी असंख्य माणसं महाशक्तीपिठाकडे आली आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेली ही अडचण शब्दांत व्यक्त केली आणि महाशक्तीपिठात त्यांना उत्तर मिळालं. काही वेळा उत्तर एकदम स्पष्ट मिळालं, कधी कधी प्रक्रिया वेळ घेणारी होती, पण त्यांच्या मनातला अंधार हळूहळू विरघळू लागला.

महाशक्तीपीठ म्हणजे केवळ पूजा-पाठ करणारी संस्था नाही. ही एक अशी जागा आहे जिथे पैसा नाही, तर माणूस महत्त्वाचा मानला जातो. इथे तुम्हाला कुणी थोतांड दाखवणार नाही. इथे कुळाचार, शास्त्र, धर्म आणि अध्यात्म या चौकटीत राहून शुद्ध आणि सात्विक मार्गाने लोकांचं कल्याण केलं जातं. इथे येणाऱ्यांकडून सोनं-नाणं मागितलं जात नाही, पण त्यांच्या जीवनात जी दागिन्यासारखी नाती आहेत ती जपली जातात. इथे माणूस हरवलेला असेल, पण त्याला पुन्हा सावरून उभं राहण्यासाठी बळ दिलं जातं.

महाशक्तीपिठात कुणी आलं की, आधी त्याच्या मनातला अंधार समजून घेतला जातो. त्याचे प्रश्न ऐकले जातात. त्याला कोणताही निर्णय घाईत घ्यायला लावला जात नाही. आणि मुख्य म्हणजे, इथे सेवा ही हृदयातून केली जाते. सेवा निशुल्क नाही, कारण प्रत्येक गोष्टीला एक जबाबदारी असते. पण इथे जे काही शुल्क घेतलं जातं, त्याचा वापर धर्मकार्य, अन्नदान, शिक्षण, आणि जनकल्याणासाठीच होतो याची पूर्ण शाश्वती दिली जाते.

महाशक्तीपीठ ही एक साद आहे अशा सर्व लोकांसाठी जे आज एकटे आहेत, जे हरवले आहेत, जेथून मार्ग दिसत नाही. तुम्ही जर अशा अडचणीत असाल, वाट चुकल्यासारखं वाटत असेल, तर एकदा महाशक्तीपिठात या. प्रत्यक्ष येणं शक्य नसेल तर एक कॉल करा, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, आणि उत्तरही दिलं जाईल.

आयुष्य एका कॉलने किंवा भेटीने एकदम बदलणार नाही, पण त्या दिवशी एक नवी दिशा सुरू होईल  ज्याने आजवर हजारो लोकांची आयुष्यं उजळून निघाली आहेत.

गटारी नाही दीप अमावस्या!

 गेल्या अनेक वर्षांपासून एक विचित्र, वेदनादायक आणि लज्जास्पद प्रथा आपल्या मराठी समाजात रूढ झाली आहे – आषाढ अमावस्येला ‘गटारी’ म्हणून संबोधण्याची. एकेकाळी देवांच्या पूजेसाठी, घरात दिवे लावून सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस, आज हळूहळू दारू, मटण, धिंगाणा आणि अपसंस्कृतीचा उत्सव बनतो आहे. आणि हे सर्व होतंय, आपल्याच हातून... आपल्या मूळ परंपरेला हरताळ फासून!

२४ जुलै गुरुवारी येणारी ही अमावस्या, केवळ आषाढ महिन्याचा शेवट नाही, तर आपल्या भक्ती, कृतज्ञता आणि प्रकाशाचा सण आहे – दीप अमावस्या! या दिवशी घरातील सर्व दिवे, समया, तोरण, पाणवठे, अंधाऱ्या कोपऱ्यांत ठेवल्या जाणाऱ्या समया, तांब्या-लोटे – या सर्वांची पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी, दिव्यांचे महत्व केवळ प्रकाश देणे नव्हे, तर नकारात्मक ऊर्जा दूर करणे, घरात शुभशक्तींचं आमंत्रण करणे आणि देवाला दीप अर्पण करत त्याच्या कृपेसाठी प्रार्थना करणे असं होतं.

शास्त्र सांगतं की अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. म्हणून या रात्री दिवे लावणे, पूजन करणे आणि मंत्रजप, स्तोत्रपठण करणे यांना विशेष महत्व आहे. या दिवशी घरात जास्त प्रकाश असावा म्हणून दीप पूजनाची प्रथा आहे. आषाढ महिन्याचा शेवट असल्यामुळे, पावसामुळे वातावरणात निर्माण होणारी आर्द्रता, जंतुसंसर्ग, मानसिक अस्वस्थता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दीपपूजन हे एक प्रकारचं वैज्ञानिक शुद्धीकरण मानलं जातं.

पण आज त्याच दिवशी आपण काय करतो? हॅपी गटारी म्हणत मद्यपान, मांसाहार, आणि उथळ हशा-मस्करी! दिव्यांच्या पूजनाच्या दिवशी आपण गटारीत झेप घेतो – हे आपल्या समाजाच्या अधःपतनाचे लक्षण नाही का?

गटारी साजरी करणाऱ्या काहींचं म्हणणं असतं की, "आता चातुर्मास सुरू होतो, चार महिने संयम ठेवायचा, म्हणून शेवटचं एकदा धमाल करतो." पण गटारी म्हणजे धमाल का? मद्यपान, मांसाहार, बेशिस्त नाच-गाणं, अंगात येणं, एकमेकांना शिवीगाळ – ह्या गोष्टी आपल्याला खरंच गर्वाने मिरवाव्या वाटतात का?

चातुर्मास सुरू होणं म्हणजे आत्मशुद्धीचा काळ सुरू होणं. श्रीविष्णू योगनिद्रेत जातो, देव-कार्य, मांगल्य कार्य बंद होतात. हा काळ संयमाचा, स्वाध्यायाचा, उपासनेचा आहे. चार महिने शरीराला, मनाला आणि आत्म्याला विश्रांती देण्याचा, चिंतन-मनन करण्याचा काळ आहे. या काळाचा प्रारंभ आपण अशा अशुद्धतेने का करतो? गटारीचा उद्देश खरंच धार्मिक आहे की आपल्या आळशी मनाने तयार केलेलं एक सोयीस्कर कारण?

आजही भारतात अनेक ठिकाणी, विशेषतः तमिळनाडू, कर्नाटक, केरळ अशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे धार्मिक दिवस अतिशय साधेपणाने, भक्तिभावाने साजरे होतात. आपल्याच महाराष्ट्रात अनेक घरोघरी दिव्यांच्या पूजनासाठी संध्याकाळी ओवाळी केली जाते. दिव्यांना कुंकू, हळद, फुलं, फळं वाहिली जातात. सासू सूनबाईंचे डोळे भरून येतात, कारण हा दिवस त्यांच्या वंशाची परंपरा सांगणारा असतो. पण अशा दिवशी जर घराबाहेर दारूच्या बाटल्या, चिकन मटणाचे कंटेनर, आणि "हॅपी गटारी"च्या शुभेच्छा असलेल्या स्टिकर्सनी फोन आणि सोशल मिडिया भरलेले असतील, तर घरातले देव, दिवे आणि संस्कार काय संदेश घेतील?

मुलं मोठी होतात, आजीआजोबांकडून ते विचारतात – "आज काय सण आहे आजी?" आणि आजीला सांगावं लागतं – “गटारी.” किती वाईट वाटतं हे ऐकून. जो दिवस "दीप अमावस्या" या नावाने ओळखला गेला पाहिजे, तो "गटारी" या निंदनीय नावाने ओळखला जातोय. आणि त्यामागे आपणच कारणीभूत आहोत.

हे बदलणं आपल्या हातात आहे. आपण जर या दिवशी खरं तर दिव्यांचं पूजन केलं, घर स्वच्छ केलं, देवाच्या चरणी प्रार्थना केली, तर आपल्या पुढच्या पिढीलाही हा दिवस चांगल्या प्रकारे ओळखता येईल. संस्कृती कधीही मोठमोठ्या घोषणा देऊन जिवंत राहत नाही, ती छोट्या कृतीतून, घराघरातून, आणि रोजच्या जगण्यातून जिवंत ठेवावी लागते.

आपण जे शेवटचं खाऊन पिऊन घेण्याचं कारण सांगतो, ते ही आधीचे लोक एका मर्यादेत करत असत. पावसाळ्याच्या शेवटाकडे, नद्या दुथडी भरून वाहात असताना, लोकांना मांसाहार आणि मद्यपानासाठी मर्यादा घालावी लागत असे. त्या पूर्वीच्या काळात केवळ काही धनाढ्य लोक हे करायचे. आणि तेही घरातल्या वडीलधाऱ्यांच्या संमतीने. पण आजच्या काळात, पिढ्या बदलल्यात, संवाद हरवलेत, संस्कार विसरले गेलेत आणि सणांचा मूळ हेतू हरवला आहे.

प्रसारमाध्यमंही यात कमी दोषी नाहीत. वृत्तवाहिन्यांवर मोठ्या उत्साहात सांगितलं जातं की ‘गटारीमध्ये आज महाराष्ट्रात ५० लाख बाटल्या खपल्या!’ या बातम्या समाजाच्या भावी पिढीच्या संस्कृतीचं काय भविष्य घडवतायत?

आपण जर गटारीला गटारातच ठेवायचं ठरवलं, तर दिव्यांचा सण आपोआपच हरवेल. आणि जेव्हा प्रकाश हरवतो, तेव्हा अंधाराचे साम्राज्य सुरू होते. दिवा म्हणजे केवळ प्रकाश नव्हे, तो श्रद्धा आहे, शुद्धतेचं प्रतीक आहे, देवतांचं आवाहन आहे. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री जेव्हा एखाद्या घरी एक लहानसा पण दिवा लावला जातो, तेव्हा तो फक्त घरातच नव्हे, मनातही प्रकाश आणतो.

म्हणूनच, ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे – गटारी नावाच्या कृत्रिम, विकृत आणि गैरसमजूत असलेल्या "सणाला" दूर ठेवणं आणि दीप अमावस्येला ती खरी ओळख परत मिळवून देणं. आपल्या लहानग्यांना दिव्यांच्या महत्त्वाबद्दल सांगा, त्यांना समया सजवायला लावा, त्यांच्या छोट्या हातांनी पूजन करायला द्या. त्यांना "गटारी"चं नाही, "दीप अमावस्या"चं संस्कार देणं – हे आपल्या पुढच्या पिढीला दिलेलं एक मौल्यवान दान ठरेल.

आपण देवाला दिवा दाखवतो, म्हणजेच आपल्यातल्या अंधाराला दूर करण्याची तयारी करतो. मग आजच्या दिवशी, त्या अंधारालाच साजरा करणं ही किती मोठी विडंबनं आहे नाही का?

चला, या वर्षी आपण एक संकल्प करू – दीप अमावस्येला "गटारी" म्हणणं थांबवू. तो दिवस केवळ आनंदाचा, भक्तीचा आणि प्रकाशाचा ठरवू. आपल्या संस्कृतीला अपमानित करणाऱ्या प्रत्येक कृतीला थांबवू. आपण जिथे आहोत, जसे आहोत – तिथूनच सुरुवात करू.

कारण जोपर्यंत दिवा उजळतो, तोपर्यंत अंधाराचा अधिकार राहत नाही.

जय दीप, जय संस्कृती, जय महाराष्ट्र!

अंगात येणे आणि जगदंब

मी देवीची भक्त आहे. पण खरं सांगायचं तर, एक काळ असा होता की मला "अंगात येणारे लोक" अजिबात आवडत नव्हते. त्यांचा चेहरा बघूनच राग यायचा. वाटायचं, ही काय नौटंकी आहे? अंगात देवी येते म्हणतात आणि सगळ्या गावात थयथयाट करत फिरतात. माझ्यासाठी ते केवळ ढोंग वाटायचे. आणि माझ्या मनात एकच विचार ठाण मांडून बसलेला असायचा "माझी आई, तुळजाभवानी, अशी का वागेल? असं नौटंकी का करेल?" मला तो तिचा अपमान वाटायचा.

हे मत इतकं पक्कं झालं होतं की, जेव्हा मी पहिल्यांदा गुरुमाईंचा व्हिडीओ पाहिला, तेव्हा त्या ही मला अशाच लोकांसारख्या वाटल्या. मी लगेचच स्क्रोल केलं. पण गंमत अशी की त्यांच्याच अनेक व्हिडीओ, पुन्हा, पुन्हा, आणि पुन्हा माझ्यासमोर यायला लागल्या. अगदी सहा महिन्यानंतरही. जसं काही त्या व्हिडीओमागे कोणी तरी मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतं. शेवटी एक दिवस मी एक दोन विडिओ पहिले आणि मग त्यांचा ग्रुप जॉइन केला.

तिथे कळालं की, गुरुमाई अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत, कोणाला घाबरवत नाहीत, उगाच संचाराचा तमाशा करत नाहीत. त्या देवीच्या, गुरूंच्या आणि भौतिक जीवनाशी निगडीत सात्विक आणि शास्त्रोक्त उपाय देतात ज्याला वैज्ञानिक आधार पण असतो. पण एक गोष्ट त्या स्पष्ट सांगतात ज्यांना खरोखरच संचार होतो, त्यांचा अपमान करू नका.

मला गुरुमाईंमुळे, त्यांच्या शब्दांतून, त्यांच्या अनुयायांच्या अनुभवांतून, आणि त्यांच्या कार्यातून कळायला लागलं की देवीची भक्ति करण्यासाठी अंगात वारे किंवा संचार असायची आवश्यकता नसते.

आता काही दिवसांपूर्वी ग्रुपवर नामलेखनाची माहिती मिळाली. अशा भरपूर उपासना आणि उपाय त्या वेबसाइट आणि ग्रुप वर देत असतात. पण मी आजवर कोणतीही उपासना केली नाही. पण त्या दिवशी मी लेख वाचला जगदंब नामलेखन व्रत आणि शक्तियाग यावर. खूप खोल, खूप प्रामाणिक आणि खूप सामर्थ्यशाली शब्द होते. तो लेख वाचता वाचता माझ्या मनात अचानक "जगदंब... जगदंब.. हे शब्द घोळवू लागले. मी लक्ष विचलित करण्यासाठी लेख सोडून रील्स बघितल्या, गाणे ऐकले. पण मनात तो शब्द काही निघायचे नाव घेत नव्हता.

शेवटी मी थकले आणि रात्री झोपताना मनात म्हटले ठीक आहे मी अगदी मनापासून तुला बोलवते आहे आई जर तुला वाटत आहे मी हे व्रत घ्यावे तर मला काही तरी चमत्कार दाखव ज्याने मला विश्वास बसेल. माझ्या तुळजाभवानी वर माझा विश्वास आहेच पण गुरु रेवती माई यांच्यावर मला विश्वास बसत नव्हता आणि त्यांनी दिलेला हा जगदंब मंत्र ही मला काही विशेष वाटत नव्हता. वाटत होते एवढा साधारण मंत्र? या पेक्षा मोठे मोठे संस्कृत श्लोक आणि मंत्र अनुष्ठान करते मी देवीचे त्या पुढे हा जगदंब मंत्र अगदी क्षुल्लक वाटत होता. पण तरी ही डोळे मिटले लांब श्वास घेतला आणि अगदी प्रेमाने आई तुळजा भवानी ला स्मरून मनात म्हटले जगदंब जगदंब जगदंब.. 5-6 मिनिटे तशीच बोलत राहिले..
आणि नंतर तिथेच अंथरूण टाकून झोपले. दिवसभर काम केल्याने थकव्यामुळे लगेच झोप लागली. पण त्याच रात्री एक विलक्षण स्वप्न पडलं...

मी एका गडद जंगलात होते. अंधार इतका होता की श्वास घ्यायलाही भीती वाटावी. सभोवताली झाडांची कुजबुज, कुठूनतरी गुरगुरण्याचा आवाज, असे वाटायचे कोणी तरी मला लपून बघत आहे, हसत आहे आणि माझा पाठलाग करत आहे आणि मी... एकटी. मी पळायचा प्रयत्न करत होते, पण पाय चिखलात रुतलेले. अंगावर काटा आला होता. मी किंचाळायचा प्रयत्न केला, पण आवाजच फुटेना माझ पूर्ण शरीर अगदी बांधल्यासारख झालेल तोंडून आवाज फुटेना ओरडण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. स्वप्नात देखील मी माझे सर्व स्तोत्र, कवच आठवन्याचा प्रयत्न करत होते पण मला काहीच आठवत नव्हते. आता मी काय करू? अचानक मला आठवला तो लेख आणि नकळत माझ्या मनात एक नाम सुरू झाले "जगदंब... जगदंब... जगदंब..."

आणि...पुढच्याच क्षणी, एक शांत, थंडसर हात माझ्या हातात आला.

मी थरथरत होते. त्या हातातून शांती आणि सामर्थ्य एकत्र वाटत होतं.त्या हाताने मला चिखलातून, अंधारातून बाहेर खेचलं.माझ्या आजूबाजूला प्रकाश पसरायला लागला. तेव्हा मी पहिल्यांदाच तिचा चेहरा पाहिला ती माझी आई होती तुळजाभवानी माझी जगदंबा. आता अतिशयोक्ति वाटेल किंवा माझी कल्पना पण जे रूप मी पाहिले ते मी शब्दांत वर्णन नाही करू शकत. ती काहीच बोलली नाही. पण तिच्या डोळ्यांतून एक सागर उतरला माझ्या मनात त्या क्षणाला मी तिचीच झाले. पुढच्याच क्षणी मी खेचले गेले प्रकाशात आणि त्यानंतर मला जाग आली, तेव्हा सकाळचे ४.१७ वाजले होते. मी पूर्ण घामाघूम झाले होते. मी स्वप्नात होते? पण मला ती अनुभूति जी आई माझ्या जवळ असण्याची झाली ती मनातून जात नव्हती. मी जोरजोरात रडायला लागले. माझ्या आवाजाने घरातले सगळेच उठले. मी त्यांना नाही सांगू शकले म्हटले मला भयानक स्वप्न पडले बस एवधच बोलून गप बसले. आणि त्यांना झोपायला सांगितले. पण आता मला झोप येणार नव्हती मी उठले आणि लिहायला बसले "जगदंब... जगदंब... जगदंब..." पानभर लिहिलं, तरी थांबत नव्हते. माझा हात चालूच होता.मी ठरवलं हेच माझं व्रत. हेच माझं आयुष्य. आणि हीच माझी देवी.

आज मी लिहितेय हा अनुभव,

आजही ती रात्र आठवली की अंगावर शहारा येतो. आणि हृदयात एकच गूंज उमटते "जगदंब... जगदंब..."

आता मी त्या व्रताचा एक भाग आहे. मी दररोज नाव लिहिते. आणि रोज तिच्या अस्तित्वाला अनुभवते. माझं सगळं आयुष्य बदललं. एका अनुभवाने. एका स्वप्नाने. आणि त्या नावाने—जगदंब.


- मेधा पुष्कर मगर
पुणे

तंत्रोक्त मारुती कवच

या कवचाचे पठन केल्याचे लाभ: 
शत्रुनाशक प्रभाव : या कवचात भगवान हनुमानांना शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आह्वान केले जाते. जे गुप्तपणे आपली हानी करतात अशा शत्रूना दंडित करण्यासाठी या कवचचे विधीवत अनुष्ठान करावे. विधी व्हॉटसप्प ग्रुप मध्ये दिलेली आह.
ग्रहबाधा निवारण : पिशाच, भूत, डाकिनी-शाकिनी, ब्रह्मराक्षस, प्रेतबाधा अशा नकारात्मक ऊर्जा किंवा अतीन्द्रिय शक्तींमुळे बाधित लोकांसाठी हे कवच अत्यंत प्रभावशाली मानले जाते.
तांत्रिक संरक्षण : हे कवच एक बंधनात्मक यंत्रासारखे कार्य करते. त्यामुळे वाईट नजर, दृष्ट दोष, तंत्र क्रिया किंवा मानसिक त्रास यावर परिणामकारक आहे. 
कार्यसिद्धी : जो उपासक हे कवच पठन करतो, त्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होते. 
आत्मबल आणि ऊर्जेचा संचार : हे कवच नियमित पठन केल्याने उपासकामध्ये प्रचंड मानसिक ऊर्जा, धैर्य, आणि निर्भयता निर्माण होते. 
तत्काळ प्रभावी कवच : अन्य स्तोत्रांप्रमाणे याचे फल उशिरा न येता काही वेळांत परिणाम जाणवू शकतो – विशेषतः योग्य काल, गुरु-अनुमति आणि शुद्ध स्थितीत पठन केल्यास.

तंत्रोक्त मारुती कवच : WhatsApp Group - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN

तंत्रोक्त मारुती कवच

ॐ नमो भगवते विचित्र वीर हनुमते
प्रलय कालानल प्रभा प्रज्वलनाय ।
प्रताप वज्र देहाय । अञ्जना गर्भ सम्भूताय ।
प्रकट विक्रमवीर दैत्यदानव
यक्ष रक्षोगण ग्रहबन्धनाय ।
भूतग्रह बन्धनाय । प्रेतग्रह बन्धनाय ।
पिशाचग्रह बन्धनाय ।
शाकिनी डाकिनी ग्रह बन्धनाय ।
काकिनी कामिनी ग्रह बन्धनाय ।
ब्रह्मग्रह बन्धनाय । ब्रह्मराक्षस ग्रह बन्धनाय ।
चोरग्रह बन्धनाय । मारी ग्रह बन्धनाय । एहि एहि ।
आगच्छ आगच्छ । आवेशय आवेशय ।
मम हृदये प्रवेशय प्रवेशय । स्फुर स्फुर । प्रस्फुर प्रस्फुर ।
सत्यं कथय । व्याघ्रमुख बन्धन ।
सर्पमुख बन्धन । राजमुख बन्धन ।
नारीमुख बन्धन । सभामुख वन्धन ।
शत्रुमुख बन्धन । सर्वमुख बन्धन ।
लङ्का प्रासाद भञ्जन । अमुकं मे वशमानय ।
क्लीं क्लीं क्लीं ह्रीं श्रीं श्रीं राजानं वशमानय ।
श्रीं ह्रीं क्लीं स्त्रिय आकर्षय आकर्षय
शत्रून्मर्दय मर्दय मारय मारय
चूर्णय चूर्णय खे खे श्री रामचन्द्राज्ञया
मम कार्यसिद्धिं कुरु कुरु ।
ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः फट् स्वाहा ।
विचित्रवीर हनूमन् मम सर्वशत्रून् भस्मी कुरु कुरु ।
हन हन हुं फट्स्वाहा ।
एकादशशतवारं जपित्वा सर्वशत्रून् वशमानयति नान्यथा इति ॥

॥ इति श्री तंत्रोक्त मारुती कवच संपूर्णम ॥

या कवचाचे संभाव्य धोके आणि नियमभंगाचे दुष्परिणाम:

अशुद्ध मनाने आणि वातावरणात पठन केल्यास उलटा परिणाम मिळू शकतो. मारुतीचे उग्र रूप असल्यामुळे, जर साधक मानसिक असंतुलन, घाणेरडे विचार किंवा कपट घेऊन पठन करतो, तर हे कवच त्याच्यावर उलटा परिणाम करू शकते.

मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य आहे.
हनुमानजी ब्रह्मचारी, सात्विक देवता आहेत. त्यांचे उग्र रूप विशेषतः रक्षणासाठी उदयास येते, पण अशुद्ध शरीर, मांसाहार, दारू, किंवा व्यभिचार करणाऱ्यांना ते सहन करत नाहीत. अशा व्यक्तींनी हे कवच पठन केल्यास ते त्यांच्या जीवनात उलट तणाव, आजार, अपयश, किंवा मानसिक असंतुलन आणू शकते.

सतत पठन न करता उत्सुकतेपोटी किंवा हव्यासाने वापर
जर एखाद्याने हे कवच फक्त हव्यासाने, केवळ शत्रूचा नाश करण्याच्या हेतूने, तर कालांतराने त्या व्यक्तीच्या जीवनात भयंकर अस्थिरता निर्माण होऊ शकते.

ब्रह्मचर्य न पाळल्यास दुष्परिणाम
या कवचात वर्णन केलेली शक्ती ब्रह्मचर्यव्रत, तप, आणि संयमानेच संतुलित होते. जर साधक ब्रह्मचर्याचे पालन करत नसेल, तर तो उग्र उर्जेला सांभाळू शकत नाही आणि त्यामुळे 'कुंडलिनी दोष', 'ऊर्जा ब्लॉक', किंवा अनैतिक आकर्षण निर्माण होऊ शकते.


WhatsApp Group - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN

  • "तंत्रोक्त मारुती कवच"

  • "हनुमान कवच स्तोत्र"

  • "ग्रह बाधा निवारण मंत्र"

  • "हनुमान उपासना मंत्र"

  • "शत्रु नाशक स्तोत्र"

दशमहाविद्या कोण आहेत?

दशमहाविद्या – या नावातच सामावलेली आहे अपरंपार तांत्रिक रहस्यांची शक्तिपुंजं. "महाविद्या" म्हणजेच "महान विद्या", आणि "दश" म्हणजे दहा. या दहा तांत्रिक शक्ती म्हणजे स्वयं आदिशक्तीचे – परमेश्वरी ज्ञान, काळ, सृजन, संहार, मोह, वैराग्य, योग, मृत्यू, कल्याण अशा सर्व शक्तींचे विविध रूपे. या देवींची पूजा ही सामान्य भक्तीमार्ग नाही. ह्या कोणत्या भाविकांच्या 'आईच्या' किंवा 'हळव्या' भावना समजून घेणाऱ्या नाहीत. त्या क्रूर, कठोर आणि अतिशय शिस्तबद्ध आहेत. जशा नियमात पूजा झाली तर त्या कृपाही करतात, पण जर नियम मोडले, तर नाश अटळ आहे.

या महाविद्या आहेत: काली, तारा, षोडशी (त्रिपुरसुंदरी), भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. या सर्वांचे मूळ स्वरूप वेगवेगळे असले, तरी त्यांचा मार्ग एकच – तंत्र. आणि तंत्र म्हणजे केवळ पूजाच नव्हे, तर एक अखंड साधना, जेथे नियम, निष्कलंकता, संयम, उपासनेचे सातत्य, वेळ, दिशा, भाव, आचार-विचार, शरीराची व मानसिक शुद्धता. या सगळ्यांचे काटेकोर पालन अनिवार्य आहे.

परंतु आजच्या काळात, विशेषतः गृहस्थ लोकांमध्ये एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. तो म्हणजे “देव काही आपल्या चुका बघून माफ करत असतो”, “आईला मनापासून हाक मारली की ती धावते”, “आई रागवत नाही”, “आई सगळं समजून घेते” – हो, हे आपल्या कुलदेवी, ग्रामदेवी, कुटुंबातील परम स्नेहशील देवींबाबत योग्यही ठरू शकते. पण ‘दशमहाविद्या’ या त्या आई नव्हेत. त्या देवी आहेत, पण त्यांच्या ठिकाणी आईपणाचा ओलसर गोडवा फारसा नाही. त्यांचं आईपण म्हणजे तत्त्वज्ञान, शक्ती, निर्णय, संहार, आणि परत नव्याने निर्माण करणे.

या महाविद्यांच्या उपासनेत जर तुम्ही वेळ पाळला नाही, प्रायश्चित्त घेतलं नाही, यंत्रपूजा अर्धवट केली, प्राणप्रतिष्ठित मूर्तीला वेळेवर नैवेद्य, आवाहन, विसर्जन दिलं नाही, तर त्या शक्तीचा राग सौम्य नसतो. अनेक वेळा लोकांना वाटतं “माझ्या घरात कालीची मूर्ती आहे, मी तिला रोज फुल वाहतो, नमस्कार करतो. ती माझी आई आहे. ती रागावेल का माझ्यावर?” पण सत्य हे आहे की, तुमचं भाव कितीही प्रामाणिक असलं, तरी त्या देवी भावावर नव्हे तर विधीवर चालतात. विधी झाला, तर कृपा; विधी मोडला, तर नाश.

कालीची उपासना केली जाते मृत्युपर्यंतचा भय सोसण्यासाठी;

तारा – ज्याचे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं धाडस आहे त्याच्यासाठी;

षोडशी – राजस सौंदर्याच्या, त्रैलोक्य मोहाच्या अनुभवासाठी, जी ब्रह्मचर्य पाळणाऱ्या साधकासाठी आहे;

भैरवी – जी साधकाला पूर्णतः आपल्याच चर्म, रक्त, अस्थी, विकारातून पार उतरवते;

छिन्नमस्ता – जिची मूर्तीच स्वतःचे डोके कापलेली आहे आणि तरीही रक्त तीनजणींना पाजते;

धूमावती – विधवा, अस्थिरता आणि संपूर्ण वैराग्याची देवी;

बगलामुखी – शत्रुनाशासाठी वापरली जाणारी, पण ज्यात जर अंहकार आला, तर उलट स्वतःचाच नाश; मातंगी – पूर्णतः अपवित्र वाटणाऱ्या गोष्टींमधून दिव्यता शोधणारी;

आणि कमला – लक्ष्मीचे अत्यंत तांत्रिक रूप.

गृहस्थ व्यक्ती ह्या देवींची पूजा का करू नये?

कारण पहिलं म्हणजे – गृहस्थ जीवनच अशा तांत्रिक साधनेसाठी अडथळा आहे. सकाळी उठून ऑफिस, मुलांचं शाळेचं काम, घरची धावपळ, पती-पत्नीचं एकमेकांवर अवलंबून असणं, अनियमित जेवणं, कामाचा ताण, आणि मनात भिन्न भावनांची भरती-ओहोटी. यातून कोण घरात ठरलेली दिशा, ठरलेली वेळ, ठरलेलं आचरण, स्त्री-पुरुष स्पर्शवर्ज्यता, तांत्रिक ब्रह्मचर्य, मंत्रोपासनेतील अचूक उच्चार, नैमित्तिक पूजा, अन्ननियम, मौन, आणि तपश्चर्या याचे पालन करणार?

दुसरं म्हणजे – दशमहाविद्यांमधील काही देवींचे स्वरूप आणि उपासना ह्या अशा गोष्टी वापरतात ज्या सामान्य संस्कृतीत “अपवित्र” मानल्या जातात – जसं की छिन्नमस्ता साधनेत रक्त, धूमावती उपासनेत विधवा भोजन, मातंगी साधनेत अन्नाचं उष्टं, मृतदेहाजवळ पूजा, रात्रभर स्मशानात बसून साधना, इत्यादी. हे सर्व गोष्टी सामन्य गृहस्थ व्यक्तींच्या जीवनाशी आणि मानसिकतेशी पूर्णपणे विसंगत आहेत.

तीसरा मुद्दा – या देवी कुलदेवीसारख्या "माझ्या बाळाला मी माफ करीन", असं म्हणणाऱ्या नाहीत. उलट त्या फॉर्मूल्यासारख्या आहेत – 1 + 1 = 2. जसा चुकीचा नंबर डायल केला तर कॉल दुसऱ्यालाच लागतो, तसा चुकीचा विधी केला, अर्धवट केला, किंवा नियम न पाळता पूजा केली तर लाभ सोडाच, पण नुकसान निश्चितच. काही वेळा तर त्या देवींची शक्ती उलटून साधकावर परिणाम करत असते – घरात अघोरी घटक तयार होणे, मानसिक अस्थिरता, रात्रंदिवस स्वप्नात भीतीदायक दृश्ये, आर्थिक नुकसान, घरात अपघात, अचानक मृत्यू, घरात वाद, रोग, मुलांमध्ये चिडचिड, पती-पत्नीमध्ये वितुष्ट – हे सर्व अनुभव अनेक तथाकथित 'भाविक' किंवा 'स्वघोषित साधक' अनुभवल्याचे उघडपणे सांगितले गेले आहे.

लोक आज देवींच्या मूळ स्वरूपाकडे न बघता, सोशल मिडियावर एकमेकांचे व्हिडीओ बघून “माझं मन ओढलं जातं कालीकडे”, “तारामातेचा चेहरा खूप शांत वाटतो”, “छिन्नमस्तेच्या मूर्तीपुढे बसल्यावर खूप काही विचित्र अनुभवलं” – अशा भावनांवर आधारित अर्धवट श्रद्धा घेऊन या शक्तींकडे वळतात. पण भावनांवर देवी कृपा करत नाहीत. त्या तपावर, सच्च्या शुद्ध आचरणावर, आणि मंत्रसिद्ध साधनेवर कृपा करतात.

खरंतर या देवींचा मार्ग म्हणजे “नाश करून निर्माण” करणारा. तुझं संपूर्ण जुना स्वभाव, अहंकार, वासना, भीती, मोह, आसक्ती, राग – हे सर्व त्या आधी नष्ट करतात, त्यावर उलटतात, त्याला चिरडतात. त्यानंतरच त्या शक्ती प्रसन्न होतात.

म्हणून सामान्य गृहस्थाने या उपासनेकडे केवळ “आई” म्हणून बघू नये. त्या देवी आहेत – पण त्या आई नव्हेत, जशा आपणास वाटतात. त्यांच्या कृपेसाठी नियम हाच धर्म आहे.

गृहस्थाने आपली श्रद्धा आणि पूजाअर्चा आपल्या कुलदेवी, ग्रामदेवी, पारंपरिक देवतांमध्ये ठेवावी. त्या देवी भाव ग्रहण करतात, क्षमा करतात, वासनेतूनही भक्ती शोधतात, आणि खऱ्या अर्थाने “आई” असतात. पण दशमहाविद्या – त्या शक्ती आहेत. त्या प्रचंड, प्रखर, प्रखरापलीकडच्या... आणि त्यांच्याशी खेळ करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी खेळ.

शेवटी, उपासना हवीच – पण ती आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या जीवनशैलीशी सुसंगत, आणि आपल्या संस्कारांशी एकरूप असली पाहिजे. श्रद्धेचा अर्थ अंधत्व नव्हे.ज्ञानपूर्वक मार्ग, नियमबद्ध साधना, आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय दशमहाविद्यांच्या दिशेने पाऊल टाकणं – हे दिव्य नव्हे, ते धोकादायक आहे.

तेव्हा पूजेला भाव देताना, देवतेच्या स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान आणि शिस्त हाच खरा श्रद्धेचा मार्ग आहे. अशा शिस्तबद्ध मार्गासाठीच दशमहाविद्या आहेत – ज्यांना पूजणं म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या धमन्यांमध्ये अग्निशुद्धी घालणं. त्या कृपा करतात, पण भावावर नव्हे – नियमांवर.

अशाच अजून गूढ आणि रहस्यमयी माहितीसाठी आपला व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा


Latest Post

अप्सरा, यक्षिणी आणि योगिनी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनेक जण विचारतात की अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी किंवा अशा सूक्ष्म जगातील शक्तींची साधना करता येते का. पुस्तके वाचून, यूट्यूबवरील व्हिडि...