दिनांक : २९ जुलै २०२६ | बुधवार
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा मनाला खऱ्या मार्गदर्शकाची गरज भासते. पैसा, पद, प्रतिष्ठा आणि यश मिळाले तरी मनाला समाधान मिळत नाही. अशा वेळी जीवनाला योग्य दिशा दाखवणारे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आणि आत्मज्ञानाचा मार्ग उघडणारे सद्गुरु लाभणे हेच सर्वात मोठे भाग्य असते.
गुरु पौर्णिमा हा गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करण्याचा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी गुरुपूजन तसेच गुरुमंत्र दीक्षा दिली जाईल.ज्यांच्या मनात खऱ्या अर्थाने अध्यात्मात प्रवेश करण्याची इच्छा आहे, उपासना आणि साधना करून मानवी जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्याची तळमळ आहे, त्यांनी या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून गुरुंच्या चरणी शिष्यत्वाची विनंती करावी.
गुरुमंत्र दीक्षा ही विकत घेण्याची गोष्ट नाही. तिच्यासाठी कोणतेही शुल्क किंवा फी नसते. गुरुंची कृपा आणि आपले भाग्य यावरच शिष्यत्व अवलंबून असते. परंतु गुरु पौर्णिमेचा दिवस असा मानला जातो की, या दिवशी गुरु कोणालाही सहजपणे नाकारत नाहीत. म्हणूनच अनेक साधक वर्षभर या दिवशीची आतुरतेने वाट पाहत असतात.
जर आपण गुरुमंत्र दीक्षा घेण्यास इच्छुक असाल, किंवा आपण आधीपासून गुरुमाईंचे शिष्य असाल, तर आपले नाव आगाऊ नोंदवणे आवश्यक आहे. आधीपासूनचे सर्व शिष्य यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
स्थळ : वांगणी, जिल्हा – ठाणे
कार्यक्रम सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होईल. मात्र सर्वांनी सकाळी ९.०० वाजेपर्यंत स्थळी उपस्थित राहावे.
सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहार, चहा आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र राहण्याची किंवा तयार होण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दूरवरून येणाऱ्या साधकांनी स्वतःची व्यवस्था करून यावे.
गुरुमंत्र दीक्षा हा गुरु-शिष्य परंपरेतील अत्यंत पवित्र आणि आयुष्याला नवे वळण देणारा संस्कार आहे. दीक्षेपूर्वी काही आवश्यक नियम, तयारी आणि पारंपरिक विधी पाळावे लागतात. याविषयीची संपूर्ण माहिती कार्यालयातून दिली जाईल.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : ७०२८१७७९५०
टीप : गुरुमंत्र दीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा फी नाही.
कदाचित ही संधी पुन्हा इतक्या सहज मिळणार नाही. जर आपल्या अंतःकरणातून खऱ्या गुरूच्या शोधाची हाक येत असेल, तर या गुरु पौर्णिमेला एक पाऊल पुढे टाका. कदाचित याच दिवसापासून आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होईल.
व्हाटसअप्प ग्रुप - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN

