सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

जप कोणत्या माळेने करावा?

भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालिरिती, मान्यता आहेत. आपल्या देशात शेकडो मंदिरे आहेत. विविध धर्म, जाती, पंथ एकत्रितपणे भारतात नांदतात. धर्म, विचार, पद्धती, चालिरिती, परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे नामस्मरण. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे, ती व्यक्ती भगवंतांचे नामस्मरण नेहमी करत असते. नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे. देवाची साधना करण्याचा नामस्मरण एक मार्ग आहे. नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकार आहे. नापजप हा कोणालाही हानिकारक नाही. नामजपाला वयाचे बंधन नसते. नामजप कुठेही करता येतो. त्याला खास विशिष्ट स्थळ हवे, असे काही नाही. शांत आणि एकांत जागा उपलब्ध असली तर, अधिक चांगले, पण ती उपलब्ध नसली तरी चालते. नामजपाला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली असते, अशी मान्यता आहे. नामजपासाठी सोवळे-ओवळे पाळायची आवश्यकता नाही. नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो. नामस्मरण करताना कोणत्या माळा अधिक लाभदायक ठरू शकतात, जाणून घेऊया...

रुद्राक्ष माळ
नामस्मरण करताना विविध प्रकारच्या माळा आपण वापरतो. यामध्ये रुद्राक्षाच्या माळेचा वापर केला जातो. रुद्राक्षाचे अनेक प्रकार असतात. एकमुखी, पंचमुखी वगैरे. मात्र, नामस्मरण करताना साध्या रुद्राक्षांची माळ वापरली तरी चालते. गणपती, गायत्री देवी, दुर्गा देवी, महादेव शिवशंकर, कुमार कार्तिकेय आणि पार्वती देवीचे नामस्मरण वा जप करताना रुद्राक्षाची माळ वापरणे लाभदायक असते, असे मानले जाते. याशिवाय रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्याने हृदयरोग, रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच रुद्राक्षाच्या माळेत अकस्मात मृत्यू टाळण्याची मोठी ताकद असते, असेही सांगितले जाते. 

तुळशी माळ
नामस्मरण जेवढे जास्त करता येईल, तेवढे चांगले. ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज म्हणतात की, आंधळ्याने पाणी भरावे तसे नामस्मरण करावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो, तसे नाम सतत घेत राहावे. श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, सूर्य नारायण यांचे नामस्मरण करण्यासाठी तुळशीची जपमाळ वापरावी, असे सांगितले जाते. वारकरी सांप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्य साधारण महत्त्व आहे. बहुतांश वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ दिसते. तुळशीची माळ घातल्याने शरीर व मन शुद्ध करण्यासाठी तुळशीची माळ घालावी, अशी मान्यता आहे.

स्फटिक माळ
नामस्मरण करताना उच्चारापेक्षा नामाला अधिक महत्त्व असते. दुर्गा देवीच्या सर्व रुपांचे नामस्मरण करण्यासाठी स्फटिकांची माळ वापरावी, असे सांगितले जाते. देवीच्या नऊ स्वरुपांचा जप करतानाही ही माळ लाभदायक ठरते. याशिवाय लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवीचे नामस्मरण करताना स्फटिकांची माळ वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच स्फटिकांची माळ घातल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. रक्तासंबंधीचे आजार आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्फटिकांची माळ गळ्यात घातल्यास उपयोग होतो, अशी मान्यता आहे. 

शुभ्र चंदन माळ
नामस्मरण कुठेही करता येते. स्थळ-काळाच्या त्याला मर्यादा नाहीत. नामस्मरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे नामजप करताना आपले मन पवित्र हवे; प्रसन्न हवे. नामस्मरणाला वा नामजपाला मर्यादा नाहीत. कोणत्याही देवतेच्या नामस्मरणासाठी शुभ्र चंदनाची माळ वापरली जाते. देवतांच्या पूजनावेळी चंदन वापरले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या विचार केल्यास, शुभ्र चंदनाची माळ गळ्यात धारण केल्याने शरीर शुद्ध व ताजेतवाने होते आणि मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. 

लाल चंदन माळ
दुर्गा देवीचा नामजप करण्यासाठी रक्तचंदनाची माळ सर्वाधिक लाभदायक असल्याची मान्यता आहे. त्याचप्रमाणे रक्तचंदनाची माळ धारण केल्यास त्याचा उपयोग मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना होतो, असे सांगितले जाते. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशवासीयांना घरात बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरात बसल्या बसल्या आपण नामस्मरण नक्कीच करू शकतो. नामस्मरणात एक अमोघ शक्ती आहे. भगवंतांचे नामस्मरण केल्याने नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येऊ शकते. शिवाय वेळही चांगल्या कृतीत घालवल्याचे समाधान मिळेल. भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी जगाने मान्य केल्या असून, अनेक कृती आचरणात आणल्या जात आहेत. आपणही नामस्मरण करून त्याला हातभार लावू शकतो. 

गोमुखी / जपमाळ बॅग
मंत्रजप/नामस्मरण करण्याचे साधारण नियम
मंत्रजप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ असेल तर अधिक लाभ होतो; कारण शंकरांना रुद्राक्ष अतिप्रिय आहे. हि माळ सहजपणे उपलब्ध होते. हि माळ १०८ रुद्राक्षाची असल्यास अति उत्तम. यात एक सुमेरू (मेरुमणी) असतो. जेव्हा साधक मंत्रजप करतो तेव्हा सुमेरू आल्यावर माळ मागच्या दिशेला उलटवून पुन्हा मंत्रजप सुरु केले जाते. मेरुमणी ओलांडू नये हि काळजी मात्र घ्यावी लागते, अन्यथा दोष लागतो.
मंत्रजप करताना गोमुखी (कापडी पिशवी) वापरावी जेणेकरून मंत्रजप करताना कुणी पाहू नये
एका व्यक्तीने एकच जपमाळ वापरावी, दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरू नये
मंत्रजप करताना मध्येच बोलू नये त्याने मंत्रजप खंडित होतो
जप पूर्ण झाल्यावर लगेच जागेवरून उठू नये. किमान ५-१० मिनिटे शांत बसावे
त्यानंतर शिवलिंगाला नमस्कार करून मगच आसन सोडावे

Group Join करा - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN 


















































शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

Mrit Sanjiavani Stotram | मृत संजीवनी स्तोत्रम

मृत संजीवनी स्तोत्र हे भगवान शिवांना अर्पण केलेले एक अत्यंत प्रभावी व पवित्र स्तोत्र आहे. हे मंत्र नसून स्तोत्र किंवा कवच स्वरूपाचे असल्यामुळे याचा जप माळेवर केला जात नाही, तर श्रद्धेने व नियमाने याचा पाठ केला जातो. भारतीय परंपरेत मृत संजीवनी स्तोत्राला विशेष महत्त्व आहे, कारण ते जीवनरक्षण, आरोग्य व दीर्घायुष्य यांच्याशी संबंधित मानले जाते. ऋषी वसिष्ठांनी रचलेले हे स्तोत्र भगवान मृत्युञ्जय शिवांची उपासना करते, जे मृत्यूवर विजय मिळवणारे मानले जातात.

या स्तोत्राच्या नियमित पाठामुळे व्यक्तीला मानसिक बळ प्राप्त होते. आजारपण, अपघात, शस्त्रक्रिया किंवा कठीण काळात मनात निर्माण होणारी भीती, चिंता व अस्थिरता कमी होण्यास मदत होते. मन शांत होते आणि नकारात्मक विचारांऐवजी आशा, धैर्य व सकारात्मकता वाढते. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की मृत संजीवनी स्तोत्राचा पाठ केल्याने आजाराशी लढण्याची अंतर्गत शक्ती वाढते आणि रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतात.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले असता, हे स्तोत्र एक संरक्षण कवच मानले जाते. अकाली मृत्यू, संकटे, अनिष्ट बाधा व दैवी अडथळे दूर ठेवण्यासाठी याचा पाठ केला जातो. स्तोत्रात शरीराच्या प्रत्येक अवयवाचे संरक्षण भगवान शिव करतात अशी भावना व्यक्त केली आहे, ज्यामुळे साधकाला पूर्ण संरक्षणाची अनुभूती येते. आयुष्य दीर्घ, निरोगी व अर्थपूर्ण व्हावे, अशी प्रार्थना या स्तोत्रातून केली जाते.

मृत संजीवनी स्तोत्राचा पाठ सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने करावा. माळ, विशिष्ट आसन किंवा कठोर नियमांची आवश्यकता नसली तरी शुद्ध उच्चार, पवित्र भावना आणि श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. वैद्यकीय उपचारांचा पर्याय म्हणून नव्हे, तर मानसिक व आध्यात्मिक आधार म्हणून या स्तोत्राचा पाठ केल्यास जीवनात स्थैर्य, आश्वासकता व आत्मिक शांती निश्चितच प्राप्त होते.

॥ मृत सञ्जीवनी स्तोत्रम् ॥ 

एवमाराध्य गौरीशं देवं मृत्युञ्जयेश्वरम् । मृतसञ्जीवनं नाम्ना कवचं प्रजपेत्सदा ॥ १॥

सारात्सारतरं पुण्यं गुह्याद्गुह्यतरं शुभम् । महादेवस्य कवचं मृतसञ्जीवनाभिधम् ॥ २॥ 

समाहितमना भूत्वा श‍ृणुष्व कवचं शुभम् । श‍ृत्वैतद्दिव्य कवचं रहस्यं कुरु सर्वदा ॥ ३॥

व(ज)राभयकरो यज्वा सर्वदेवनिषेवितः । मृत्युञ्जयो महादेवः प्राच्यां मां पातु सर्वदा ॥ ४॥

दधानः शक्तिमभयां त्रिमुखं षड्भुजः प्रभुः । सदाशिवोऽग्निरूपी मामाग्नेय्यां पातु सर्वदा ॥ ५॥

अष्टादशभुजोपेतो दण्डाभयकरो विभुः । यमरूपी महादेवो दक्षिणस्यां सदाऽवतु ॥ ६॥

खड्गाभयकरो धीरो रक्षोगणनिषेवितः । रक्षोरूपी महेशो मां नैरृत्यां सर्वदाऽवतु ॥ ७॥

पाशाभयभुजः सर्वरत्नाकरनिषेवितः । वरुणात्मा महादेवः पश्चिमे मां सदाऽवतु ॥ ८॥

गदाभयकरः प्राणनायकः सर्वदागतिः । वायव्यां मारुतात्मा मां शङ्करः पातु सर्वदा ॥ ९॥

शङ्खाभयकरस्थो मां नायकः परमेश्वरः । सर्वात्मान्तरदिग्भागे पातु मां शङ्करः प्रभुः ॥ १०॥

शूलाभयकरः सर्वविद्यानमधिनायकः । ईशानात्मा तथैशान्यां पातु मां परमेश्वरः ॥ ११॥

ऊर्ध्वभागे ब्रह्मरूपी विश्वात्माऽधः सदाऽवतु । शिरो मे शङ्करः पातु ललाटं चन्द्रशेखरः ॥ १२॥

भ्रूमध्यं सर्वलोकेशस्त्रिनेत्रो लोचनेऽवतु । भ्रूयुग्मं गिरिशः पातु कर्णौ पातु महेश्वरः ॥ १३॥

नासिकां मे महादेव ओष्ठौ पातु वृषध्वजः । जिह्वां मे दक्षिणामूर्तिर्दन्तान्मे गिरिशोऽवतु ॥ १४॥

मृतुय्ञ्जयो मुखं पातु कण्ठं मे नागभूषणः । पिनाकी मत्करौ पातु त्रिशूली हृदयं मम ॥ १५॥

पञ्चवक्त्रः स्तनौ पातु उदरं जगदीश्वरः । नाभिं पातु विरूपाक्षः पार्श्वौ मे पार्वतीपतिः ॥ १६॥

कटिद्वयं गिरीशो मे पृष्ठं मे प्रमथाधिपः । गुह्यं महेश्वरः पातु ममोरू पातु भैरवः ॥ १७॥

जानुनी मे जगद्धर्ता जङ्घे मे जगदम्बिका । पादौ मे सततं पातु लोकवन्द्यः सदाशिवः ॥ १८॥

गिरिशः पातु मे भार्यां भवः पातु सुतान्मम । मृत्युञ्जयो ममायुष्यं चित्तं मे गणनायकः ॥ १९॥

सर्वाङ्गं मे सदा पातु कालकालः सदाशिवः । एतत्ते कवचं पुण्यं देवतानां च दुर्लभम् ॥ २०॥

मृतसञ्जीवनं नाम्ना महादेवेन कीर्तितम् । सहस्रावर्तनं चास्य पुरश्चरणमीरितम् ॥ २१॥

यः पठेच्छृणुयान्नित्यं श्रावयेत्सुसमाहितः । स कालमृत्युं निर्जित्य सदायुष्यं समश्नुते ॥ २२॥

हस्तेन वा यदा स्पृष्ट्वा मृतं सञ्जीवयत्यसौ । आधयो व्याधयस्तस्य न भवन्ति कदाचन ॥ २३॥

कालमृत्युमपि प्राप्तमसौ जयति सर्वदा । अणिमादिगुणैश्वर्यं लभते मानवोत्तमः ॥ २४॥

युद्धारम्भे पठित्वेदमष्टाविंशतिवारकम् । युद्धमध्ये स्थितः शत्रुः सद्यः सर्वैर्न दृश्यते ॥ २५॥

न ब्रह्मादीनि चास्त्राणि क्षयं कुर्वन्ति तस्य वै । विजयं लभते देवयुद्धमध्येऽपि सर्वदा ॥ २६॥

प्रातरुत्थाय सततं यः पठेत्कवचं शुभम् । अक्षय्यं लभते सौख्यमिह लोके परत्र च ॥ २७॥

सर्वव्याधिविनिर्मृक्तः सर्वरोगविवर्जितः । अजरामरणो भूत्वा सदा षोडशवार्षिकः ॥ २८॥

विचरत्यखिलाँलोकान्प्राप्य भोगांश्च दुर्लभान् । तस्मादिदं महागोप्यं कवचं समुदाहृतम् ॥ २९॥

मृतसञ्जीवनं नाम्ना देवतैरपि दुर्लभम् ॥ ३०॥

॥ इति श्रीवसिष्ठप्रणीतं मृतसञ्जीवन स्तोत्रं सम्पूर्णम् ॥ PDF मिळवण्यासाठी ग्रुप जॉइन करा - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

दुर्गाष्टोत्तरशतनाम साधना


दुर्गाष्टोत्तरशतनाम साधना ही माता दुर्गेच्या १०८ दिव्य नावांच्या सतत आणि नियमाने केलेल्या जपावर आधारित एक अतिशय प्रभावी साधना आहे. रोज देवीची ही १०८ नावे पूर्ण भक्तीने आणि स्वच्छ मनाने उच्चारली जातात. दुर्गेची ही नावे शक्ती, करुणा, संरक्षण, आरोग्य, संपत्ती, ज्ञान आणि यश यांचे मूळ रूप आहेत. म्हणूनच ही साधना अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी मानली जाते. ही साधना एका देवीपुरती मर्यादित नाही. कारण माता दुर्गा म्हणजे सर्व देवी-देवतांच्या शक्तींचा एकत्रित आणि सर्वोच्च रूप. काली, लक्ष्मी, सरस्वती, चामुंडा, भुवनेश्वरी, त्रिपुरसुंदरी, अंबिका, अन्नपूर्णा, भवानी, जगदंबा, तारा, मातंगी, ललिता तसेच भारतातील सर्व शक्तिपिठे या देवींची शक्ती मिळून दुर्गा हे अद्भुत रूप तयार होते. म्हणून दुर्गाष्टोत्तरशतनाम जप म्हणजे प्रत्यक्षात सर्व देवींची एकाच वेळी आणि पूर्ण शक्तीने साधना होते. प्रत्येक नावात देवीचे रौद्र, सौम्य, करुणामयी, रक्षण करणारे, ज्ञान देणारे आणि सर्व सिद्धी देणारे रूप सामावलेले आहे.

उपस्थिती या सगळ्यात नवीन तेज दिसू लागते. कामे सहज होतील, अधिकारी व्यक्तींचा सहकार्य मिळेल असे अनुभवही येऊ लागतात. ग्रहबाधा, नकारात्मक ऊर्जा, दृष्ट किंवा कुणी केलेली बाधा यांचा प्रभाव हळूहळू संपतो आणि साधकाभोवती एक दैवी संरक्षण कवच तयार होते. आरोग्य, संतानसुख, दीर्घायुष्य, संपत्ती, कीर्ती, बल आणि शांती जीवनातील स्थिरता देणारे सर्व लाभ सहज मिळतात. साधकाच्या आतल्या जगातही मोठा बदल दिसू लागतो. मन शांत होते, विचारात स्पष्टता येते, निर्णयक्षमता वाढते, आत्मविश्वास मजबूत होतो आणि जीवनातील अडथळ्यांवर प्रकाश पडतो. जिथे मार्ग बंद वाटत होता तिथेच मार्ग आपोआप तयार होतो असे अनुभव अनेक साधकांनी सांगितले आहेत. या साधनेचा अतिशय खास फायदा म्हणजे नकारात्मक ऊर्जा, तांत्रिक किंवा शत्रूकृत काहीही असले तरी त्याचा साधकावर परिणाम होत नाही. दुर्गेच्या १०८ नावांचे कंपन इतके पवित्र आणि शक्तीने भरलेले असते की ते साधकाला सतत संरक्षण देते. साधक झोपेत असो किंवा जागा, घरात असो किंवा बाहेर देवीचे कवच त्याच्याभोवती राहते. ही साधना म्हणजे फक्त जप नसून देवीच्या शक्तींचे थेट आवाहन आहे. जप करताना मन शुद्ध होते, कर्म शुद्ध होतात आणि आत्म्याचे तेज वाढते. २१०० पाठ पूर्ण करणारा साधक एका उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचतो, जिथून त्याचे संपूर्ण जीवन बदलू लागते. सांसारिक क्षेत्रात यश, समृद्धी आणि स्थैर्य मिळते; आध्यात्मिक क्षेत्रात शांतता, अनुभव आणि अंतःप्रकाश मिळतो. 

पिडीएफ मिळवण्यासाठी व्हॉटसप्प ग्रुप जॉइन करा

https://chat.whatsapp.com/BbgIVjXxRetK0phVSQcgG8 1️⃣ या लिंक जाऊन वर इच्छुक साधकांनी फॉर्म भरून सबमिट करावा. https://forms.gle/JrsXvkZ1CifPd2TY8 ----------------- 2️⃣ तुमचे टेलिग्राम वरील नाव आणि फॉर्म वरील नाव एक सारखे/मिळते जुळते असावे. फॉर्मवर पूर्ण नाव भरावे - उदा. Arun Keshav Joshi टेलिग्राम वर तुम्ही पूर्ण नाव ठेवू शकता किंवा Initials वापरू शकता - उदा. 1️⃣A K Joshi, 2️⃣Arun Joshi, 3️⃣Arun Keshav Joshi --------------------------- 3️⃣ सूचना कोणत्याही प्रकारची fees/दक्षिणा या साधनेसाठी लागणार नाही. आधी फॉर्म भरावा मग ग्रुप मध्ये जॉइन होण्यास request करावी. ------------ 4️⃣ या लिंकद्वारे तुम्ही ग्रुप वर जॉइन होऊ शकता ग्रुप वर जॉइन होण्यासाठी तुमच्या फोन मध्ये टेलिग्राम ही app असणे आवश्यक आहे - https://t.me/+FkDMJNjzFIdlOTU1 🚩⚠️ फॉर्म भरल्याशिवाय ग्रुप मध्ये प्रवेश मिळणार नाही.

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

कसे कुलदेवी आई तुळजाभवानीने रक्षण केले?

ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे पण पात्रांची सर्व नावे बदललेली आहेत.

पुण्यातील शनिवार पेठेत राहणारी सान्वी एकदम मॉडर्न, धडाकेबाज, कुणालाच न भीणारी मुलगी. जॉब, पार्टी, सोशल लाइफ सगळं परफेक्ट. पण गेल्या काही महिन्यांपासून तिचं आयुष्य अचानक उलटू लागलं. रात्री झोप लागत नसे, अंगावर शहारे येत, घरात वारंवार विचित्र आवाज ऐकू यायचे. रूममेटला देखील तिच्या बेडशेजारी कोणी तरी बसल्यासारखी सावली दिसली होती. पण आध्यात्मिक गोष्टींवर विश्वास नसलेल्या सान्वीने हे सगळं स्ट्रेस आहे असं समजून दुर्लक्ष केलं.

पण परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत गेली. ऑफिसमध्ये अचानक बेशुद्ध पडणे, अंगावर न दिसणाऱ्या ओरखड्या उठणे, रात्रभर अंधारात उभी राहून स्वतःशी बोलणे हे सगळं तिच्याच नकळत होत होतं. तिला स्वतःला काहीच समजत नव्हतं. डॉक्टरांनीही रिपोर्ट नॉर्मल सांगितले. पुण्यात राहणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं, “हे काहीतरी वेगळंच आहे… तुला कोणा आध्यात्मिक व्यक्तीशी बोलायला हवं.”

एके दिवशी इंस्टाग्राम स्क्रोल करताना तिच्या नजरेस गुरुमाईंचे एक reel पडलं 'कवडीशास्त्र, कुलदेवी संरक्षण आणि आध्यात्मिक उपचार' याबद्दल अतिशय स्पष्ट आणि काटेकोर मार्गदर्शन. त्या व्हिडिओत गुरुमाईंनी सांगितलेली दोन वाक्यं तिच्या मनाला भिडली “जिथे कुलदेवीची कृपा असते, तिथे कोणत्याही नकारात्मक शक्तीचा वावर राहत नाही. पण कुलदेवीपासून दुरावले तर नकारात्मकता जवळ येते.” सान्वीने लगेच त्यांच्याशी संपर्क साधला. दुसऱ्याच दिवशी तिला गुरुमाईंनी फोनवरून वैयक्तिक मार्गदर्शन दिलं. सान्वीचं बोलणं ऐकल्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं, “बाळा, तुझ्यावर बाहेरील प्रभाव आहे. तुझी कुलदेवीने तुला आधीही अनेकदा वारंवार सूचना दिल्या पन तू दुर्लक्ष केलेस, पण आता तू दुर्लक्ष करू नकोस. भीऊ नकोस ती अजून ही तुझ्या रक्षणासाठी उभी आहे फक्त काही बंधन तिला तुझ्यापर्यन्त येण्यासाठी रोखत आहेत. ते तूच तोडू शकतेस फक्त मी जेवढे सांगते तेवढे कर”

गुरुमाईंनी तिला काही अगदी सोपे पण अत्यंत शक्तिशाली उपाय दिले काही विशेष गुप्त मंत्रजप, घरात विशिष्ट दिवास्वच्छता, एक पावित्र्य विधी आणि संरक्षणासाठी ‘सायुज्य कुलदेवी यंत्र’ सोबत ठेवण्याची सूचना दिली. ते सर्व उपाय पूर्ण केल्यानंतर एक दिवशी रात्री एक मोठा बदल झाला. सामान्यतः ३ वाजता जागे होणारी सान्वी त्या रात्री शांत झोपली. पण पहाटे तिला एक स्वप्न पडलं तिच्या घराच्या दारात एक प्रखर तेजोमय स्त्री उभी, हातात त्रिशूल… स्वप्नात ती स्त्री म्हणाली, “घाबरू नको बाळा, मी आलेय!” सान्वी अचानक जागी झाली अंगावर पांढरेशुभ्र पिसाटलेले रोमांच, पण मनात एक अनाकलनीय शांतता.

दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरुमाईंनी फोन केला आणि तिला विचारलं, “स्वप्नात कुणी तरी आली होती का बाळा?” सान्वीने अवाक होत “हो…” असं उत्तर दिलं. गुरुमाईं म्हणाल्या, “तीच तुझी कुलकुलस्वामिनी आई तुळजाभवानी. तू केलेल्या विधींनी तिला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मिळाला. आता त्रास कमी होईल.” आणि तसंच झालंही. पुढील सात दिवस तिच्या घरात कोणताही आवाज आला नाही. सावल्या दिसेनाशा झाल्या. रात्रीची घबराट गायब झाली. बेशुद्ध पडणे, अंगावर ओरखडे सगळं बंद झालं. ती पूर्ण बरी झाली. 

एकेकाळी “या आध्यात्मिक गोष्टी फालतू आहेत” म्हणणारी सान्वी आता म्हणते “आधुनिक असलं म्हणजे मूर्ख असणं नाही. विज्ञान आवश्यक आहे, पण कुलदेवीची कृपा त्याहून मोठी आहे.” आज सान्वी अत्यंत शांत, स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. कामात प्रगती, मनात श्रद्धा, आणि आयुष्यात संरक्षण. हे सगळं तिला तुळजाभवानीच्या कृपेने आणि गुरुमाईंनी दिलेल्या योग्य, कठोर पण अचूक मार्गदर्शनाने मिळालं. नावे बदलली आहेत, पण ही घटना पुण्यात घडलेली आहे, आणि सत्य इतकंच की—कुलदेवीच्या कृपेपासून दूर गेलं की सावल्या जवळ येतात, आणि तिचं स्मरण केलं की अंधार नाहीसा होतो.

जॉइन करा व्हाटसप्प ग्रुप  

शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

माईंच्या यूट्यूब लाईव्ह कवडीशास्त्र सेशनबद्दल संपूर्ण माहिती

लाईव्ह सेशन पूर्णपणे मोफत असतात

  • गुरुमाईंचे यूट्यूबवर होणारे कवडीशास्त्राद्वारे प्रश्नोत्तर सेशन पूर्णपणे मोफत असतात.
  • कोणालाही कोणताही शुल्क भरावा लागत नाही.

प्रश्न कसा विचारावा?

  • फक्त पूर्ण नाव (नाव + आडनाव) आणि थोडक्यात, पण मुद्देसूद आणि स्पष्ट प्रश्न लिहावा.
  • गर्दी खूप असल्याने तुमचा मेसेज पटकन वर जातो, म्हणून तोच मेसेज कॉपी करून वारंवार टाकत राहावा.

सेशनची वेळ

  • साधारण १ तास असते.
  • कधी कधी १ तास ३० मिनिटे ही चालते.

प्रश्न घेतला जाणे ही जगदंबेची कृपा
  • खूप सारे लोक एकाच वेळी प्रश्न टाकतात. त्या गर्दीतून तुमचा प्रश्न निवडला जाणे आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणे ही पूर्णपणे जगदंबेची इच्छा आणि तुमच्यावर असलेली कृपा मानावी. 
  • जर एखाद्या दिवशी तुमचा प्रश्न झाला नाही तर वाइट न मानता दुसऱ्या दिवशी पुन्हा विचारावा.
  • माई कधीही लाईव्हमध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांचा प्रयास असतो जमेल तेवढे सर्वांचे प्रश्न घेणे. कोणाचा मुद्दाम प्रश्न घेतात किंवा कोणाचा घेत नाहीत असे त्या करत नाहीत. 


सुपरचॅट विषयी महत्त्वाची माहिती

  • माई कधीही कोणाला सुपरचॅट करा असे सांगत नाहीत.
  • सेवा मोफतच आहे.
  • तरीही, गर्दीमध्ये आपले नाव/प्रश्न हायलाइट हवा असेल तर काही लोक सुपरचॅट करतात.

सुपरचॅट ग्राह्य धरण्याचे नियम :

  • नाव आणि प्रश्न सुपरचॅटमध्ये लिहिला असलाच पाहिजे. 
  • फक्त रिकामा सुपरचॅट पाठवला तर तो ग्राह्य धरला जात नाही. 
  • सुपरचॅट आल्यास सर्वांना दिसतो— 
  • गुप्त सुपरचॅट येत नाही, 
  • त्यामुळे “माझा सुपरचॅट झाला नाही” अशी तक्रार असते तर नाव/प्रश्न लिहिला नसेल किंवा सुपरचॅट प्रत्यक्षात आलेलाच नसेल.


इमोजी वापरू नयेत

  • चॅटमध्ये इमोजी टाळावेत
  • तसे केल्यास महाशक्तीपीठची टेक्निकल टीम तुम्हाला टाइम आउट करू शकते.


टेक्निकल टीमची भूमिका

  • कॅमेऱ्यासमोर जरी माई असल्या तरी
  • प्रत्येक लाईव्हवर टेक्निकल टीम सतत लक्ष ठेवत असते. 
  • चॅटची शिस्त, नियम, मेसेज फ्लो—हे सर्व टीम हँडल करते.

मोफत सेवा आणि वैयक्तिक सेवेमधला फरक

  • यूट्यूबवरील लाईव्ह मार्गदर्शन—मोफत

  • पण ज्यांना: वैयक्तिक मार्गदर्शन, तपशीलवार ज्योतिष, कवडीशास्त्र, माईंशी बोलून फोनवर सविस्तर सल्ला हवे असेल, त्यासाठी फीस असते.


वैयक्तिक मार्गदर्शन बुक करण्याची प्रक्रिया

  • वैयक्तिक मार्गदर्शनाची वेळ बुक करण्यासाठी 7028177950 या नंबरवर संपर्क करावा.

  • त्या नंबरवर माईंच्या शिष्या रश्मि ताई आहेत.
    त्या तुम्हाला पुढील प्रक्रिया, शुल्क आणि उपलब्ध वेळ पूर्णपणे समजावून सांगतील.


    यूट्यूब चॅनलची लिंक - https://www.youtube.com/@mahashaktipeeth

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

मला माईंकडून 'कौलप्रसाद' घ्यायचा असल्यास कसा घेऊ?

माईंकडून ‘कौलप्रसाद’ घ्यायचा असल्यास प्रक्रिया अत्यंत सोपी, पारंपरिक आणि संपूर्ण श्रद्धेवर आधारित आहे. आठवड्याला गुरुमाई कवडीद्वारे लाईव्ह सेशनमध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न घेतात, पण ते साधारण, हलक्या प्रकारचे आणि दैनंदिन शंकांचे असतात. खोल, महत्त्वाचे, जीवननिर्णय देणारे किंवा कुलदैवताशी संबंधित प्रश्न फक्त दुर्गाष्टमीला घेतले जातात. कारण कौलप्रसाद हा साधा हो–नाही उत्तर नसतो, तो देवीची आज्ञा असते—ती दुर्गाष्टमीच्या  दिवशीच स्वीकारली जाते.

दुर्गाष्टमीच्या दिवशी गुरुमाई सकाळी पूजन करतात, देवीचे आवाहन होते आणि त्यानंतर सकाळी ९ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत कौलप्रसाद घेतला जातो. या दिवशी घेतलेले संकेत अत्यंत स्पष्ट, तंतोतंत आणि दैवी मानले जातात. म्हणूनच महत्त्वाचा, खोल, निर्णायक किंवा कुलदैवताशी संबंधित प्रश्न असले तर तो हाच दिवस योग्य.

जर तुम्हाला कौलप्रसाद घ्यायचा असेल तर तुम्ही 7028177950 या क्रमांकावर संपर्क करावा. तुमचा प्रश्न नीट, स्पष्ट शब्दांत लिहून पाठवावा—धूसर प्रश्न विचारू नये, कारण कौलप्रसाद नेहमी एकच सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देतो. त्यानंतर तुमची नोंद केली जाईल आणि येणाऱ्या दुर्गाष्टमीला तुमचा कौलप्रसाद घेतला जाईल. तुमच्या नावाने, तुमच्या प्रश्नावर, देवीच्या साक्षीने कवडी टाकली जाईल आणि जो निर्णय येईल तोच तुमचा दैवी संकेत.

एका प्रश्नाची दक्षिणा ५०१ रुपये + १०० रुपये कुरिअर चार्ज अशा प्रकारे असते. ही दक्षिणा ही देवाला नवस म्हणून, आणि कवडीद्वारे कौलाच्या प्राचीन परंपरेचा आदर म्हणून दिली जाते. प्रसाद, कुंकू आणि कौलाचे लिखित उत्तर या सर्वांसह तुमचा प्रसाद त्या आठवड्यातच तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवला जातो.

या संपूर्ण प्रक्रियेत पूर्ण गोपनीयता पाळली जाते—तुमचा प्रश्न, तुमचे नाव, तुमच्या समस्येचे स्वरूप हे फक्त माईंपर्यंत मर्यादित राहते. कौलप्रसाद हा अत्यंत पवित्र, संवेदनशील आणि दैवी संकेत असल्यामुळे त्यात कोणतीही हलगर्जी, गोंधळ किंवा बाहेर चर्चा केली जात नाही. तुम्ही जितक्या श्रद्धेने विचाराल, तितक्याच स्पष्टतेने देवी उत्तर देते—हा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

म्हणूनच कौलप्रसाद घेताना संयम, श्रद्धा आणि दैवी निर्णय स्वीकारण्याची तयारी असावी. बाकी सगळे माईंच्या आणि देवीच्या हातात सुरक्षित.

सूचना - दुर्गाष्टमीला होणाऱ्या कौलप्रसाद याचे कोणतेही लाईव्ह सेशन होणार नाहीत. भक्तांच्या प्रश्नांची गोपनीयता ठेवण्यासाठी त्यांना लेखी पत्र पाठवले जाईल (ज्यांना उत्तर लवकर पाहिजे असेल त्यांना दुर्गाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी whatsapp वर कळवण्यात येईल आणि प्रसाद पोस्टाने पाठवले जाईल). म्हणून ज्यांना खरेच महत्वाचे प्रश्न असतील, स्वतच्या कुलदेवी आणि कुलदेवते वर श्रद्धा-विश्वास असेल आणि येणाऱ्या कौलप्रसाद नुसार निर्णय घेण्याची तयारी असेल. त्यांनीच कौलप्रसाद बूक करावे (संपर्क - 7028177950) अन्यथा करू नये. 'उगाच विचारून बघू, काय उत्तर येते बघू' अशी मानसिकता असणाऱ्यांनी कौलप्रसाद बूक करू नये.


'कौलप्रसाद' घेताना त्यात कोणते प्रश्न विचारू शकतो?


कोकणात दिला जाणारा 'कौलप्रसाद' म्हणजे काय?

'कौलप्रसाद' घेताना त्यात कोणते प्रश्न विचारू शकतो?

कौलप्रसाद म्हणजे देवाचे उत्तर. ते फक्त होकार–नकार नसते, तर त्या उत्तरात माणसाचे भविष्य, कृपा, रक्षण आणि दिशा दडलेली असते. म्हणूनच कौलप्रसाद घेताना कोणते प्रश्न विचारायचे, कसे विचारायचे आणि काय विचारायचे नाही हे अत्यंत महत्वाचे ठरते. कोकणात, उत्तर भारतात, दक्षिण भारतात आणि गुरुमाईंच्या कवडीकौलातही हीच एक सूक्ष्म रेषा आहे जी पवित्रता आणि शिस्त टिकवून ठेवते. देवाला प्रश्न विचारणे म्हणजे विश्वाच्या दाराशी उभे राहून मार्ग विचारणे. अशा वेळी प्रश्न हलकेफुलके किंवा मनाला येईल तसे विचारायचे नसतात. फक्त तेच प्रश्न विचारायचे जे खरे, महत्त्वाचे आणि जीवनाला दिशा देणारे असतात.

कौलप्रसादात विचारला जाणारा प्रश्न एकच असावा. माणसाच्या मनात शंभर प्रश्न असले तरी देवाकडे एकावेळी एकच ठेवावा, कारण देवाचा निर्णय स्पष्ट, निर्व्याज, अगदी धारदार असतो. दहा–बारा प्रश्न रचून ‘काय उत्तर येते ते बघू’ असे करणे म्हणजे कौलप्रसादाचे पावित्र्य कमी करणे. कौल हा प्रयोग नाही; तो संवाद आहे. त्यामुळे कौलात विचारायचा प्रश्न मनाला धरून असावा, निर्णय घ्यायची तयारी असावी. देव म्हणेल ते स्वीकारण्याची क्षमता असेल तेव्हाच कौल घ्यावा. अन्यथा मन दुभंगते आणि उत्तर निरर्थक ठरते.

कौलप्रसादात सर्वात आधी विचारले जातात साधे, स्पष्ट प्रश्न—ही वेळ योग्य आहे का, हे काम करावे का, हा निर्णय सुरक्षित आहे का. देवाच्या हो–नाही उत्तरातून अनेक संकटांचे पर्व थांबले आहेत, ही कोकणाची परंपरा मान्य करते. घरगुती प्रश्न आल्यास कुलदेवता रागावली आहे का, नवस पूर्ण करावा का, या घरात काही दोष आहे का असे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न कुटुंबाच्या रक्षणाशी जोडलेले असल्याने ते प्रामाणिकपणे विचारायचे असतात.

धंदा, शेती, व्यवसाय याबद्दलही कौलात विचारले जाते. नवी जागा, नवा भागीदार, गुंतवणूक, दुकानाची दिशा—हे सर्व देवाच्या संमतीने ठरवले तर अडथळे कमी होतात, असे लोक सांगतात. नाती आणि विवाहासंबंधी प्रश्नही तितकेच गंभीर मानले जातात; कारण कौल नात्यांचे भविष्य सांगू शकतो. आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारताना देव हे दैवी कारण आहे का, उपाय सुचवत आहे का, कोणत्या देवतेकडे नवस करावा यासारखे मार्गदर्शक प्रश्नच विचारावे. कौल औषध नाही; तो दिशा आहे.

जमीन, घर, वास्तू यासंबंधी प्रश्न कोकणात सर्वाधिक विचारले जातात—ही जागा योग्य आहे का, वास्तुदोष आहे का, घरात अडथळे जागेमुळे आहेत का. कौल अडथळ्याचे मूळही सांगतो—पूर्वज, दृष्ट, देवक, कर्म. प्रवास, दिशा, समय, समुद्र–नदी पार करणे यांसारख्या प्रश्नांसाठीही कौल घेण्याची परंपरा जुनी आहे.

हरवलेल्या वस्तू, जनावर, चोरी, ही प्रश्नांची एक वेगळी शाखा आहे जी कोकणात अजूनही अत्यंत जिवंत आहे. उपाय, नवस, किती दिवस साधना करावी, कोणाला नवस करावा, देव स्वीकारतोय का—हे प्रश्न देव स्वतः उत्तर देतो असे मानले जाते. काही वेळा कोणता देव उत्तर देत आहे हेही कौल सांगतो. हे अत्यंत पवित्र मानले जाते.

पण काही प्रश्न कधीच विचारू नयेत. अनैतिक, इतरांना हानी पोहोचवणारे, विकृत किंवा मृत्यूशी संबंधित प्रश्न देवतेच्या मर्यादेबाहेर असतात. देवाला आव्हान देणारी भाषा, खोटे बोलून विचारलेले प्रश्न—हे कौलप्रसादासाठी अपमान असतात.

शेवटी एकच सार कौलप्रसाद म्हणजे खेळ नव्हे; तो देव, कुलदेवता आणि जगदंबेचा निर्णय आहे. मन स्वच्छ, प्रश्न थोडक्यात आणि जीवनात उतरवण्याची क्षमता असेल तेव्हाच कौलपुढे उभे राहावे. देवाचा संकेत नेहमी मनाला स्थिर करणारा असतो, पण त्याला स्वीकारणारी वृत्ती असेल तरच तो प्रसाद फळतो. देव बोलतो तेव्हा माणूस शांत होतो, आणि कौलप्रसादाचा खरा अर्थ तेव्हाच उमलतो.


कोकणात दिला जाणारा 'कौलप्रसाद' म्हणजे काय?


मला माई कडून 'कौलप्रसाद' घ्यायचा असल्यास कसा घेऊ?

कोकणात दिला जाणारा 'कौलप्रसाद' म्हणजे काय?

कोकणातील कौल, उत्तर भारतातील संकेतपद्धती, दक्षिण भारतातील कवडीकौल आणि गुरुमाई रेवती माई देतात तो कवडीद्वारे कौलप्रसाद… या सर्वांचा मूळ पाया एकच आहे दैवी संकेत.

पद्धती वेगळ्या, देव वेगळे, प्रदेश वेगळे, गुरू वेगळे, पण अर्थ एकच: देव जे सांगतो ते नम्रतेने ऐकणे. म्हणूनच कोकणातील भैरव, भवानी (रक्षक शक्ति आणि गांवदेवी), रावलनाथ, बेताल, जगदंब, करणी, जोगेश्वरी, देवकुळ माऊली यांच्या देवळांत घेतला जाणारा कौल आणि आदिशक्ती, जगदंबा, तुळजा भवानी तसेच इतर देवी अवतारांसाठी गुरुमाई रेवती माई देतात तो कवडीचा कौलप्रसाद हे दोन्हीही सारखेच आहे. पद्धत वेगळी दिसते पण तत्त्व तेच आहे.

कौल म्हणजे देवाचा निर्णय. कधी फुलावरून, कधी पानावरून, कधी तांदुळावरून तर कधी गव्हाच्या दाण्यांवरून. देवपुढे ठेवलेल्या या छोट्याशा प्रतीकांवरून देव आपली होकार-नकाराची भाषा सांगतो, आणि तो निर्णय अंतिम मानला जातो. देवाला विचारलेला प्रश्न, त्यावर टाकलेली कवडी किंवा फूल, ते जसे पडते तसे उत्तर मिळते. उत्तर कठीण असो वा सोपे, कोकणातील लोक ते बदलत नाहीत कारण देवाचा संकेत बदलता येत नाही हे त्यांना माहीत असते. उत्तर भारतातील शक्तिपीठांमध्येही अशाच प्रकारे दैवी प्रसादाने संकेत घेतले जातात. दक्षिणेत तर कवडीशास्त्र ही अतिशय जुनी परंपरा असून आजही भैरव–काळी–अम्मन देवळांत कवडीच नव्हे तर विशेष शंखकवचांनी संकेत घेतले जातात.

हीच परंपरा गुरुमाई रेवती माई आजच्या काळात साध्या आणि सहज मार्गाने पुन्हा जिवंत करत आहेत. माईंच्या हातून घेतला जाणारा कवडीद्वारे 'कौलप्रसाद' म्हणजे देवीची थेट आज्ञा. हजारो लोकांना माईनी कवडीद्वारे मार्गदर्शन केले आहे, पण माई नेहमी स्पष्ट सांगतात की रोजच्या लाईव्हमध्ये किंवा वैयक्तिक बोलण्यात कवडी पाहणे म्हणजे कौलप्रसाद देणे नव्हे. कारण कौलप्रसाद हा साधा खेळ किंवा हो–नाही उत्तर नाही. तो दैवी निर्णय आहे. देवाच्या उपस्थितीत, देवाच्या आज्ञेने दिलेला संकेत आहे. म्हणूनच कोणालाही कौलप्रसाद देण्याचा अधिकार नसतो; त्यासाठी गुरूची परवानगी, परंपरेचे ज्ञान आणि देवीशी असलेला नितांत निष्ठेचा आणि खडतर उपासनेचा दुवा आवश्यक असतो.

कोकणातील देवळांत सोमवार, रविवार, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी कौल घेतला जातो. देवाची जागृती या काळात जास्त मानली जाते. तसेच गुरुमाई प्रत्येक महिन्याच्या 'दुर्गाष्टमीला' फक्त त्या दिवशीच कवडीद्वारे कौलप्रसाद देतात. कारण कौल हा प्रसाद आहे, चौकशी नाही. निर्णय आहे, चर्चा नाही. ज्याला हा प्रसाद मिळतो, त्याने तो मनापासून स्वीकारण्याचीच अपेक्षा असते.

कौलप्रसाद हा फक्त उत्तर नसतो; तो देव आपल्याला सावध करत असतो, संरक्षण देत असतो, मार्ग दाखवत असतो. कौल मनापासून ऐकला तर ऐकणाऱ्याचे भलेच होते. हे कोकणातील असो किंवा काश्मीर हिमाचलातील देवळातील असो किंवा दक्षिणेतील अम्मन मंदिरातील कवडीकौल असो, सर्वांचे अनुभव सांगतात. कारण देव एक, दैवी ऊर्जा एक, आणि संकेत देण्याची शक्तीही एकच.

म्हणूनच पद्धती जरी वेगळ्या दिसल्या कुठे फूल, कुठे पान, कुठे तांदूळ, कुठे गहू, तर उत्तर-दक्षिणेत कवडी—तरी कौलप्रसाद हा सर्वत्र समान महत्त्वाचा आहे. हा प्रसाद म्हणजे देव बोलतोय, देवी मार्ग दाखवतेय, गुरू माध्यम बनून सत्य सांगतायत. देवाच्या शब्दाला मान दिला तर तो मार्ग नेहमीच भल्याचाच असतो. कौलप्रसादाचा सार अर्थ हा एकच: जे देव सांगतो ते स्वीकारा, मनाने स्वच्छ रहा आणि दैवी संकेताला नम्रतेने माना यापेक्षा मोठे रक्षण दुसरे नाही.


मला माईंकडून 'कौलप्रसाद' घ्यायचा असल्यास कसा घेऊ?



Latest Post

ज्ञानींची पवित्र जबाबदारी: बुद्धीचा उपयोग मानवकल्याणासाठी

ज्यांच्याकडे प्रखर बुद्धी आहे, त्यांचे सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे आपल्या मानसिक शक्तीचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करणे. खरी समज ही केवळ वै...