जप कोणत्या माळेने करावा?

भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालिरिती, मान्यता आहेत. आपल्या देशात शेकडो मंदिरे आहेत. विविध धर्म, जाती, पंथ एकत्रितपणे भारतात नांदतात. धर्म, विचार, पद्धती, चालिरिती, परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे नामस्मरण. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे, ती व्यक्ती भगवंतांचे नामस्मरण नेहमी करत असते. नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे. देवाची साधना करण्याचा नामस्मरण एक मार्ग आहे. नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकार आहे. नापजप हा कोणालाही हानिकारक नाही. नामजपाला वयाचे बंधन नसते. नामजप कुठेही करता येतो. त्याला खास विशिष्ट स्थळ हवे, असे काही नाही. शांत आणि एकांत जागा उपलब्ध असली तर, अधिक चांगले, पण ती उपलब्ध नसली तरी चालते. नामजपाला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली असते, अशी मान्यता आहे. नामजपासाठी सोवळे-ओवळे पाळायची आवश्यकता नाही. नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो. नामस्मरण करताना कोणत्या माळा अधिक लाभदायक ठरू शकतात, जाणून घेऊया...

रुद्राक्ष माळ
नामस्मरण करताना विविध प्रकारच्या माळा आपण वापरतो. यामध्ये रुद्राक्षाच्या माळेचा वापर केला जातो. रुद्राक्षाचे अनेक प्रकार असतात. एकमुखी, पंचमुखी वगैरे. मात्र, नामस्मरण करताना साध्या रुद्राक्षांची माळ वापरली तरी चालते. गणपती, गायत्री देवी, दुर्गा देवी, महादेव शिवशंकर, कुमार कार्तिकेय आणि पार्वती देवीचे नामस्मरण वा जप करताना रुद्राक्षाची माळ वापरणे लाभदायक असते, असे मानले जाते. याशिवाय रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्याने हृदयरोग, रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच रुद्राक्षाच्या माळेत अकस्मात मृत्यू टाळण्याची मोठी ताकद असते, असेही सांगितले जाते. 

तुळशी माळ
नामस्मरण जेवढे जास्त करता येईल, तेवढे चांगले. ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज म्हणतात की, आंधळ्याने पाणी भरावे तसे नामस्मरण करावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो, तसे नाम सतत घेत राहावे. श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, सूर्य नारायण यांचे नामस्मरण करण्यासाठी तुळशीची जपमाळ वापरावी, असे सांगितले जाते. वारकरी सांप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्य साधारण महत्त्व आहे. बहुतांश वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ दिसते. तुळशीची माळ घातल्याने शरीर व मन शुद्ध करण्यासाठी तुळशीची माळ घालावी, अशी मान्यता आहे.

स्फटिक माळ
नामस्मरण करताना उच्चारापेक्षा नामाला अधिक महत्त्व असते. दुर्गा देवीच्या सर्व रुपांचे नामस्मरण करण्यासाठी स्फटिकांची माळ वापरावी, असे सांगितले जाते. देवीच्या नऊ स्वरुपांचा जप करतानाही ही माळ लाभदायक ठरते. याशिवाय लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवीचे नामस्मरण करताना स्फटिकांची माळ वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच स्फटिकांची माळ घातल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. रक्तासंबंधीचे आजार आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्फटिकांची माळ गळ्यात घातल्यास उपयोग होतो, अशी मान्यता आहे. 

शुभ्र चंदन माळ
नामस्मरण कुठेही करता येते. स्थळ-काळाच्या त्याला मर्यादा नाहीत. नामस्मरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे नामजप करताना आपले मन पवित्र हवे; प्रसन्न हवे. नामस्मरणाला वा नामजपाला मर्यादा नाहीत. कोणत्याही देवतेच्या नामस्मरणासाठी शुभ्र चंदनाची माळ वापरली जाते. देवतांच्या पूजनावेळी चंदन वापरले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या विचार केल्यास, शुभ्र चंदनाची माळ गळ्यात धारण केल्याने शरीर शुद्ध व ताजेतवाने होते आणि मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. 

लाल चंदन माळ
दुर्गा देवीचा नामजप करण्यासाठी रक्तचंदनाची माळ सर्वाधिक लाभदायक असल्याची मान्यता आहे. त्याचप्रमाणे रक्तचंदनाची माळ धारण केल्यास त्याचा उपयोग मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना होतो, असे सांगितले जाते. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशवासीयांना घरात बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरात बसल्या बसल्या आपण नामस्मरण नक्कीच करू शकतो. नामस्मरणात एक अमोघ शक्ती आहे. भगवंतांचे नामस्मरण केल्याने नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येऊ शकते. शिवाय वेळही चांगल्या कृतीत घालवल्याचे समाधान मिळेल. भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी जगाने मान्य केल्या असून, अनेक कृती आचरणात आणल्या जात आहेत. आपणही नामस्मरण करून त्याला हातभार लावू शकतो. 

गोमुखी / जपमाळ बॅग
मंत्रजप/नामस्मरण करण्याचे साधारण नियम
मंत्रजप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ असेल तर अधिक लाभ होतो; कारण शंकरांना रुद्राक्ष अतिप्रिय आहे. हि माळ सहजपणे उपलब्ध होते. हि माळ १०८ रुद्राक्षाची असल्यास अति उत्तम. यात एक सुमेरू (मेरुमणी) असतो. जेव्हा साधक मंत्रजप करतो तेव्हा सुमेरू आल्यावर माळ मागच्या दिशेला उलटवून पुन्हा मंत्रजप सुरु केले जाते. मेरुमणी ओलांडू नये हि काळजी मात्र घ्यावी लागते, अन्यथा दोष लागतो.
मंत्रजप करताना गोमुखी (कापडी पिशवी) वापरावी जेणेकरून मंत्रजप करताना कुणी पाहू नये
एका व्यक्तीने एकच जपमाळ वापरावी, दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरू नये
मंत्रजप करताना मध्येच बोलू नये त्याने मंत्रजप खंडित होतो
जप पूर्ण झाल्यावर लगेच जागेवरून उठू नये. किमान ५-१० मिनिटे शांत बसावे
त्यानंतर शिवलिंगाला नमस्कार करून मगच आसन सोडावे

Group Join करा - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN 


















































Mrit Sanjiavani Stotram | मृत संजीवनी स्तोत्रम

मृत संजीवनी स्तोत्र हे भगवान शिवांना अर्पण केलेले एक अत्यंत प्रभावी व पवित्र स्तोत्र आहे. हे मंत्र नसून स्तोत्र किंवा कवच स्वरूपाचे असल्यामुळे याचा जप माळेवर केला जात नाही, तर श्रद्धेने व नियमाने याचा पाठ केला जातो. भारतीय परंपरेत मृत संजीवनी स्तोत्राला विशेष महत्त्व आहे, कारण ते जीवनरक्षण, आरोग्य व दीर्घायुष्य यांच्याशी संबंधित मानले जाते. ऋषी वसिष्ठांनी रचलेले हे स्तोत्र भगवान मृत्युञ्जय शिवांची उपासना करते, जे मृत्यूवर विजय मिळवणारे मानले जातात.

या स्तोत्राच्या नियमित पाठामुळे व्यक्तीला मानसिक बळ प्राप्त होते. आजारपण, अपघात, शस्त्रक्रिया किंवा कठीण काळात मनात निर्माण होणारी भीती, चिंता व अस्थिरता कमी होण्यास मदत होते. मन शांत होते आणि नकारात्मक विचारांऐवजी आशा, धैर्य व सकारात्मकता वाढते. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की मृत संजीवनी स्तोत्राचा पाठ केल्याने आजाराशी लढण्याची अंतर्गत शक्ती वाढते आणि रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतात.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले असता, हे स्तोत्र एक संरक्षण कवच मानले जाते. अकाली मृत्यू, संकटे, अनिष्ट बाधा व दैवी अडथळे दूर ठेवण्यासाठी याचा पाठ केला जातो. स्तोत्रात शरीराच्या प्रत्येक अवयवाचे संरक्षण भगवान शिव करतात अशी भावना व्यक्त केली आहे, ज्यामुळे साधकाला पूर्ण संरक्षणाची अनुभूती येते. आयुष्य दीर्घ, निरोगी व अर्थपूर्ण व्हावे, अशी प्रार्थना या स्तोत्रातून केली जाते.

मृत संजीवनी स्तोत्राचा पाठ सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने करावा. माळ, विशिष्ट आसन किंवा कठोर नियमांची आवश्यकता नसली तरी शुद्ध उच्चार, पवित्र भावना आणि श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. वैद्यकीय उपचारांचा पर्याय म्हणून नव्हे, तर मानसिक व आध्यात्मिक आधार म्हणून या स्तोत्राचा पाठ केल्यास जीवनात स्थैर्य, आश्वासकता व आत्मिक शांती निश्चितच प्राप्त होते.

॥ मृत सञ्जीवनी स्तोत्रम् ॥ 

एवमाराध्य गौरीशं देवं मृत्युञ्जयेश्वरम् । मृतसञ्जीवनं नाम्ना कवचं प्रजपेत्सदा ॥ १॥

सारात्सारतरं पुण्यं गुह्याद्गुह्यतरं शुभम् । महादेवस्य कवचं मृतसञ्जीवनाभिधम् ॥ २॥ 

समाहितमना भूत्वा श‍ृणुष्व कवचं शुभम् । श‍ृत्वैतद्दिव्य कवचं रहस्यं कुरु सर्वदा ॥ ३॥

व(ज)राभयकरो यज्वा सर्वदेवनिषेवितः । मृत्युञ्जयो महादेवः प्राच्यां मां पातु सर्वदा ॥ ४॥

दधानः शक्तिमभयां त्रिमुखं षड्भुजः प्रभुः । सदाशिवोऽग्निरूपी मामाग्नेय्यां पातु सर्वदा ॥ ५॥

अष्टादशभुजोपेतो दण्डाभयकरो विभुः । यमरूपी महादेवो दक्षिणस्यां सदाऽवतु ॥ ६॥

खड्गाभयकरो धीरो रक्षोगणनिषेवितः । रक्षोरूपी महेशो मां नैरृत्यां सर्वदाऽवतु ॥ ७॥

पाशाभयभुजः सर्वरत्नाकरनिषेवितः । वरुणात्मा महादेवः पश्चिमे मां सदाऽवतु ॥ ८॥

गदाभयकरः प्राणनायकः सर्वदागतिः । वायव्यां मारुतात्मा मां शङ्करः पातु सर्वदा ॥ ९॥

शङ्खाभयकरस्थो मां नायकः परमेश्वरः । सर्वात्मान्तरदिग्भागे पातु मां शङ्करः प्रभुः ॥ १०॥

शूलाभयकरः सर्वविद्यानमधिनायकः । ईशानात्मा तथैशान्यां पातु मां परमेश्वरः ॥ ११॥

ऊर्ध्वभागे ब्रह्मरूपी विश्वात्माऽधः सदाऽवतु । शिरो मे शङ्करः पातु ललाटं चन्द्रशेखरः ॥ १२॥

भ्रूमध्यं सर्वलोकेशस्त्रिनेत्रो लोचनेऽवतु । भ्रूयुग्मं गिरिशः पातु कर्णौ पातु महेश्वरः ॥ १३॥

नासिकां मे महादेव ओष्ठौ पातु वृषध्वजः । जिह्वां मे दक्षिणामूर्तिर्दन्तान्मे गिरिशोऽवतु ॥ १४॥

मृतुय्ञ्जयो मुखं पातु कण्ठं मे नागभूषणः । पिनाकी मत्करौ पातु त्रिशूली हृदयं मम ॥ १५॥

पञ्चवक्त्रः स्तनौ पातु उदरं जगदीश्वरः । नाभिं पातु विरूपाक्षः पार्श्वौ मे पार्वतीपतिः ॥ १६॥

कटिद्वयं गिरीशो मे पृष्ठं मे प्रमथाधिपः । गुह्यं महेश्वरः पातु ममोरू पातु भैरवः ॥ १७॥

जानुनी मे जगद्धर्ता जङ्घे मे जगदम्बिका । पादौ मे सततं पातु लोकवन्द्यः सदाशिवः ॥ १८॥

गिरिशः पातु मे भार्यां भवः पातु सुतान्मम । मृत्युञ्जयो ममायुष्यं चित्तं मे गणनायकः ॥ १९॥

सर्वाङ्गं मे सदा पातु कालकालः सदाशिवः । एतत्ते कवचं पुण्यं देवतानां च दुर्लभम् ॥ २०॥

मृतसञ्जीवनं नाम्ना महादेवेन कीर्तितम् । सहस्रावर्तनं चास्य पुरश्चरणमीरितम् ॥ २१॥

यः पठेच्छृणुयान्नित्यं श्रावयेत्सुसमाहितः । स कालमृत्युं निर्जित्य सदायुष्यं समश्नुते ॥ २२॥

हस्तेन वा यदा स्पृष्ट्वा मृतं सञ्जीवयत्यसौ । आधयो व्याधयस्तस्य न भवन्ति कदाचन ॥ २३॥

कालमृत्युमपि प्राप्तमसौ जयति सर्वदा । अणिमादिगुणैश्वर्यं लभते मानवोत्तमः ॥ २४॥

युद्धारम्भे पठित्वेदमष्टाविंशतिवारकम् । युद्धमध्ये स्थितः शत्रुः सद्यः सर्वैर्न दृश्यते ॥ २५॥

न ब्रह्मादीनि चास्त्राणि क्षयं कुर्वन्ति तस्य वै । विजयं लभते देवयुद्धमध्येऽपि सर्वदा ॥ २६॥

प्रातरुत्थाय सततं यः पठेत्कवचं शुभम् । अक्षय्यं लभते सौख्यमिह लोके परत्र च ॥ २७॥

सर्वव्याधिविनिर्मृक्तः सर्वरोगविवर्जितः । अजरामरणो भूत्वा सदा षोडशवार्षिकः ॥ २८॥

विचरत्यखिलाँलोकान्प्राप्य भोगांश्च दुर्लभान् । तस्मादिदं महागोप्यं कवचं समुदाहृतम् ॥ २९॥

मृतसञ्जीवनं नाम्ना देवतैरपि दुर्लभम् ॥ ३०॥

॥ इति श्रीवसिष्ठप्रणीतं मृतसञ्जीवन स्तोत्रं सम्पूर्णम् ॥ PDF मिळवण्यासाठी ग्रुप जॉइन करा - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN

दुर्गाष्टोत्तरशतनाम साधना


दुर्गाष्टोत्तरशतनाम साधना ही माता दुर्गेच्या १०८ दिव्य नावांच्या सतत आणि नियमाने केलेल्या जपावर आधारित एक अतिशय प्रभावी साधना आहे. रोज देवीची ही १०८ नावे पूर्ण भक्तीने आणि स्वच्छ मनाने उच्चारली जातात. दुर्गेची ही नावे शक्ती, करुणा, संरक्षण, आरोग्य, संपत्ती, ज्ञान आणि यश यांचे मूळ रूप आहेत. म्हणूनच ही साधना अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी मानली जाते. ही साधना एका देवीपुरती मर्यादित नाही. कारण माता दुर्गा म्हणजे सर्व देवी-देवतांच्या शक्तींचा एकत्रित आणि सर्वोच्च रूप. काली, लक्ष्मी, सरस्वती, चामुंडा, भुवनेश्वरी, त्रिपुरसुंदरी, अंबिका, अन्नपूर्णा, भवानी, जगदंबा, तारा, मातंगी, ललिता तसेच भारतातील सर्व शक्तिपिठे या देवींची शक्ती मिळून दुर्गा हे अद्भुत रूप तयार होते. म्हणून दुर्गाष्टोत्तरशतनाम जप म्हणजे प्रत्यक्षात सर्व देवींची एकाच वेळी आणि पूर्ण शक्तीने साधना होते. प्रत्येक नावात देवीचे रौद्र, सौम्य, करुणामयी, रक्षण करणारे, ज्ञान देणारे आणि सर्व सिद्धी देणारे रूप सामावलेले आहे.

उपस्थिती या सगळ्यात नवीन तेज दिसू लागते. कामे सहज होतील, अधिकारी व्यक्तींचा सहकार्य मिळेल असे अनुभवही येऊ लागतात. ग्रहबाधा, नकारात्मक ऊर्जा, दृष्ट किंवा कुणी केलेली बाधा यांचा प्रभाव हळूहळू संपतो आणि साधकाभोवती एक दैवी संरक्षण कवच तयार होते. आरोग्य, संतानसुख, दीर्घायुष्य, संपत्ती, कीर्ती, बल आणि शांती जीवनातील स्थिरता देणारे सर्व लाभ सहज मिळतात. साधकाच्या आतल्या जगातही मोठा बदल दिसू लागतो. मन शांत होते, विचारात स्पष्टता येते, निर्णयक्षमता वाढते, आत्मविश्वास मजबूत होतो आणि जीवनातील अडथळ्यांवर प्रकाश पडतो. जिथे मार्ग बंद वाटत होता तिथेच मार्ग आपोआप तयार होतो असे अनुभव अनेक साधकांनी सांगितले आहेत. या साधनेचा अतिशय खास फायदा म्हणजे नकारात्मक ऊर्जा, तांत्रिक किंवा शत्रूकृत काहीही असले तरी त्याचा साधकावर परिणाम होत नाही. दुर्गेच्या १०८ नावांचे कंपन इतके पवित्र आणि शक्तीने भरलेले असते की ते साधकाला सतत संरक्षण देते. साधक झोपेत असो किंवा जागा, घरात असो किंवा बाहेर देवीचे कवच त्याच्याभोवती राहते. ही साधना म्हणजे फक्त जप नसून देवीच्या शक्तींचे थेट आवाहन आहे. जप करताना मन शुद्ध होते, कर्म शुद्ध होतात आणि आत्म्याचे तेज वाढते. २१०० पाठ पूर्ण करणारा साधक एका उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचतो, जिथून त्याचे संपूर्ण जीवन बदलू लागते. सांसारिक क्षेत्रात यश, समृद्धी आणि स्थैर्य मिळते; आध्यात्मिक क्षेत्रात शांतता, अनुभव आणि अंतःप्रकाश मिळतो. 

पिडीएफ मिळवण्यासाठी व्हॉटसप्प ग्रुप जॉइन करा

https://chat.whatsapp.com/BbgIVjXxRetK0phVSQcgG8 1️⃣ या लिंक जाऊन वर इच्छुक साधकांनी फॉर्म भरून सबमिट करावा. https://forms.gle/JrsXvkZ1CifPd2TY8 ----------------- 2️⃣ तुमचे टेलिग्राम वरील नाव आणि फॉर्म वरील नाव एक सारखे/मिळते जुळते असावे. फॉर्मवर पूर्ण नाव भरावे - उदा. Arun Keshav Joshi टेलिग्राम वर तुम्ही पूर्ण नाव ठेवू शकता किंवा Initials वापरू शकता - उदा. 1️⃣A K Joshi, 2️⃣Arun Joshi, 3️⃣Arun Keshav Joshi --------------------------- 3️⃣ सूचना कोणत्याही प्रकारची fees/दक्षिणा या साधनेसाठी लागणार नाही. आधी फॉर्म भरावा मग ग्रुप मध्ये जॉइन होण्यास request करावी. ------------ 4️⃣ या लिंकद्वारे तुम्ही ग्रुप वर जॉइन होऊ शकता ग्रुप वर जॉइन होण्यासाठी तुमच्या फोन मध्ये टेलिग्राम ही app असणे आवश्यक आहे - https://t.me/+FkDMJNjzFIdlOTU1 🚩⚠️ फॉर्म भरल्याशिवाय ग्रुप मध्ये प्रवेश मिळणार नाही.

कसे कुलदेवी आई तुळजाभवानीने रक्षण केले?

ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे पण पात्रांची सर्व नावे बदललेली आहेत.

पुण्यातील शनिवार पेठेत राहणारी सान्वी एकदम मॉडर्न, धडाकेबाज, कुणालाच न भीणारी मुलगी. जॉब, पार्टी, सोशल लाइफ सगळं परफेक्ट. पण गेल्या काही महिन्यांपासून तिचं आयुष्य अचानक उलटू लागलं. रात्री झोप लागत नसे, अंगावर शहारे येत, घरात वारंवार विचित्र आवाज ऐकू यायचे. रूममेटला देखील तिच्या बेडशेजारी कोणी तरी बसल्यासारखी सावली दिसली होती. पण आध्यात्मिक गोष्टींवर विश्वास नसलेल्या सान्वीने हे सगळं स्ट्रेस आहे असं समजून दुर्लक्ष केलं.

पण परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत गेली. ऑफिसमध्ये अचानक बेशुद्ध पडणे, अंगावर न दिसणाऱ्या ओरखड्या उठणे, रात्रभर अंधारात उभी राहून स्वतःशी बोलणे हे सगळं तिच्याच नकळत होत होतं. तिला स्वतःला काहीच समजत नव्हतं. डॉक्टरांनीही रिपोर्ट नॉर्मल सांगितले. पुण्यात राहणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं, “हे काहीतरी वेगळंच आहे… तुला कोणा आध्यात्मिक व्यक्तीशी बोलायला हवं.”

एके दिवशी इंस्टाग्राम स्क्रोल करताना तिच्या नजरेस गुरुमाईंचे एक reel पडलं 'कवडीशास्त्र, कुलदेवी संरक्षण आणि आध्यात्मिक उपचार' याबद्दल अतिशय स्पष्ट आणि काटेकोर मार्गदर्शन. त्या व्हिडिओत गुरुमाईंनी सांगितलेली दोन वाक्यं तिच्या मनाला भिडली “जिथे कुलदेवीची कृपा असते, तिथे कोणत्याही नकारात्मक शक्तीचा वावर राहत नाही. पण कुलदेवीपासून दुरावले तर नकारात्मकता जवळ येते.” सान्वीने लगेच त्यांच्याशी संपर्क साधला. दुसऱ्याच दिवशी तिला गुरुमाईंनी फोनवरून वैयक्तिक मार्गदर्शन दिलं. सान्वीचं बोलणं ऐकल्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं, “बाळा, तुझ्यावर बाहेरील प्रभाव आहे. तुझी कुलदेवीने तुला आधीही अनेकदा वारंवार सूचना दिल्या पन तू दुर्लक्ष केलेस, पण आता तू दुर्लक्ष करू नकोस. भीऊ नकोस ती अजून ही तुझ्या रक्षणासाठी उभी आहे फक्त काही बंधन तिला तुझ्यापर्यन्त येण्यासाठी रोखत आहेत. ते तूच तोडू शकतेस फक्त मी जेवढे सांगते तेवढे कर”

गुरुमाईंनी तिला काही अगदी सोपे पण अत्यंत शक्तिशाली उपाय दिले काही विशेष गुप्त मंत्रजप, घरात विशिष्ट दिवास्वच्छता, एक पावित्र्य विधी आणि संरक्षणासाठी ‘सायुज्य कुलदेवी यंत्र’ सोबत ठेवण्याची सूचना दिली. ते सर्व उपाय पूर्ण केल्यानंतर एक दिवशी रात्री एक मोठा बदल झाला. सामान्यतः ३ वाजता जागे होणारी सान्वी त्या रात्री शांत झोपली. पण पहाटे तिला एक स्वप्न पडलं तिच्या घराच्या दारात एक प्रखर तेजोमय स्त्री उभी, हातात त्रिशूल… स्वप्नात ती स्त्री म्हणाली, “घाबरू नको बाळा, मी आलेय!” सान्वी अचानक जागी झाली अंगावर पांढरेशुभ्र पिसाटलेले रोमांच, पण मनात एक अनाकलनीय शांतता.

दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरुमाईंनी फोन केला आणि तिला विचारलं, “स्वप्नात कुणी तरी आली होती का बाळा?” सान्वीने अवाक होत “हो…” असं उत्तर दिलं. गुरुमाईं म्हणाल्या, “तीच तुझी कुलकुलस्वामिनी आई तुळजाभवानी. तू केलेल्या विधींनी तिला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मिळाला. आता त्रास कमी होईल.” आणि तसंच झालंही. पुढील सात दिवस तिच्या घरात कोणताही आवाज आला नाही. सावल्या दिसेनाशा झाल्या. रात्रीची घबराट गायब झाली. बेशुद्ध पडणे, अंगावर ओरखडे सगळं बंद झालं. ती पूर्ण बरी झाली. 

एकेकाळी “या आध्यात्मिक गोष्टी फालतू आहेत” म्हणणारी सान्वी आता म्हणते “आधुनिक असलं म्हणजे मूर्ख असणं नाही. विज्ञान आवश्यक आहे, पण कुलदेवीची कृपा त्याहून मोठी आहे.” आज सान्वी अत्यंत शांत, स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. कामात प्रगती, मनात श्रद्धा, आणि आयुष्यात संरक्षण. हे सगळं तिला तुळजाभवानीच्या कृपेने आणि गुरुमाईंनी दिलेल्या योग्य, कठोर पण अचूक मार्गदर्शनाने मिळालं. नावे बदलली आहेत, पण ही घटना पुण्यात घडलेली आहे, आणि सत्य इतकंच की—कुलदेवीच्या कृपेपासून दूर गेलं की सावल्या जवळ येतात, आणि तिचं स्मरण केलं की अंधार नाहीसा होतो.

जॉइन करा व्हाटसप्प ग्रुप  

माईंच्या यूट्यूब लाईव्ह कवडीशास्त्र सेशनबद्दल संपूर्ण माहिती

लाईव्ह सेशन पूर्णपणे मोफत असतात

  • गुरुमाईंचे यूट्यूबवर होणारे कवडीशास्त्राद्वारे प्रश्नोत्तर सेशन पूर्णपणे मोफत असतात.
  • कोणालाही कोणताही शुल्क भरावा लागत नाही.

प्रश्न कसा विचारावा?

  • फक्त पूर्ण नाव (नाव + आडनाव) आणि थोडक्यात, पण मुद्देसूद आणि स्पष्ट प्रश्न लिहावा.
  • गर्दी खूप असल्याने तुमचा मेसेज पटकन वर जातो, म्हणून तोच मेसेज कॉपी करून वारंवार टाकत राहावा.

सेशनची वेळ

  • साधारण १ तास असते.
  • कधी कधी १ तास ३० मिनिटे ही चालते.

प्रश्न घेतला जाणे ही जगदंबेची कृपा
  • खूप सारे लोक एकाच वेळी प्रश्न टाकतात. त्या गर्दीतून तुमचा प्रश्न निवडला जाणे आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणे ही पूर्णपणे जगदंबेची इच्छा आणि तुमच्यावर असलेली कृपा मानावी. 
  • जर एखाद्या दिवशी तुमचा प्रश्न झाला नाही तर वाइट न मानता दुसऱ्या दिवशी पुन्हा विचारावा.
  • माई कधीही लाईव्हमध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांचा प्रयास असतो जमेल तेवढे सर्वांचे प्रश्न घेणे. कोणाचा मुद्दाम प्रश्न घेतात किंवा कोणाचा घेत नाहीत असे त्या करत नाहीत. 


सुपरचॅट विषयी महत्त्वाची माहिती

  • माई कधीही कोणाला सुपरचॅट करा असे सांगत नाहीत.
  • सेवा मोफतच आहे.
  • तरीही, गर्दीमध्ये आपले नाव/प्रश्न हायलाइट हवा असेल तर काही लोक सुपरचॅट करतात.

सुपरचॅट ग्राह्य धरण्याचे नियम :

  • नाव आणि प्रश्न सुपरचॅटमध्ये लिहिला असलाच पाहिजे. 
  • फक्त रिकामा सुपरचॅट पाठवला तर तो ग्राह्य धरला जात नाही. 
  • सुपरचॅट आल्यास सर्वांना दिसतो— 
  • गुप्त सुपरचॅट येत नाही, 
  • त्यामुळे “माझा सुपरचॅट झाला नाही” अशी तक्रार असते तर नाव/प्रश्न लिहिला नसेल किंवा सुपरचॅट प्रत्यक्षात आलेलाच नसेल.


इमोजी वापरू नयेत

  • चॅटमध्ये इमोजी टाळावेत
  • तसे केल्यास महाशक्तीपीठची टेक्निकल टीम तुम्हाला टाइम आउट करू शकते.


टेक्निकल टीमची भूमिका

  • कॅमेऱ्यासमोर जरी माई असल्या तरी
  • प्रत्येक लाईव्हवर टेक्निकल टीम सतत लक्ष ठेवत असते. 
  • चॅटची शिस्त, नियम, मेसेज फ्लो—हे सर्व टीम हँडल करते.

मोफत सेवा आणि वैयक्तिक सेवेमधला फरक

  • यूट्यूबवरील लाईव्ह मार्गदर्शन—मोफत

  • पण ज्यांना: वैयक्तिक मार्गदर्शन, तपशीलवार ज्योतिष, कवडीशास्त्र, माईंशी बोलून फोनवर सविस्तर सल्ला हवे असेल, त्यासाठी फीस असते.


वैयक्तिक मार्गदर्शन बुक करण्याची प्रक्रिया

  • वैयक्तिक मार्गदर्शनाची वेळ बुक करण्यासाठी 7028177950 या नंबरवर संपर्क करावा.

  • त्या नंबरवर माईंच्या शिष्या रश्मि ताई आहेत.
    त्या तुम्हाला पुढील प्रक्रिया, शुल्क आणि उपलब्ध वेळ पूर्णपणे समजावून सांगतील.


    यूट्यूब चॅनलची लिंक - https://www.youtube.com/@mahashaktipeeth

मला माईंकडून 'कौलप्रसाद' घ्यायचा असल्यास कसा घेऊ?

माईंकडून ‘कौलप्रसाद’ घ्यायचा असल्यास प्रक्रिया अत्यंत सोपी, पारंपरिक आणि संपूर्ण श्रद्धेवर आधारित आहे. आठवड्याला गुरुमाई कवडीद्वारे लाईव्ह सेशनमध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न घेतात, पण ते साधारण, हलक्या प्रकारचे आणि दैनंदिन शंकांचे असतात. खोल, महत्त्वाचे, जीवननिर्णय देणारे किंवा कुलदैवताशी संबंधित प्रश्न फक्त दुर्गाष्टमीला घेतले जातात. कारण कौलप्रसाद हा साधा हो–नाही उत्तर नसतो, तो देवीची आज्ञा असते—ती दुर्गाष्टमीच्या  दिवशीच स्वीकारली जाते.

दुर्गाष्टमीच्या दिवशी गुरुमाई सकाळी पूजन करतात, देवीचे आवाहन होते आणि त्यानंतर सकाळी ९ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत कौलप्रसाद घेतला जातो. या दिवशी घेतलेले संकेत अत्यंत स्पष्ट, तंतोतंत आणि दैवी मानले जातात. म्हणूनच महत्त्वाचा, खोल, निर्णायक किंवा कुलदैवताशी संबंधित प्रश्न असले तर तो हाच दिवस योग्य.

जर तुम्हाला कौलप्रसाद घ्यायचा असेल तर तुम्ही 7028177950 या क्रमांकावर संपर्क करावा. तुमचा प्रश्न नीट, स्पष्ट शब्दांत लिहून पाठवावा—धूसर प्रश्न विचारू नये, कारण कौलप्रसाद नेहमी एकच सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देतो. त्यानंतर तुमची नोंद केली जाईल आणि येणाऱ्या दुर्गाष्टमीला तुमचा कौलप्रसाद घेतला जाईल. तुमच्या नावाने, तुमच्या प्रश्नावर, देवीच्या साक्षीने कवडी टाकली जाईल आणि जो निर्णय येईल तोच तुमचा दैवी संकेत.

एका प्रश्नाची दक्षिणा ५०१ रुपये + १०० रुपये कुरिअर चार्ज अशा प्रकारे असते. ही दक्षिणा ही देवाला नवस म्हणून, आणि कवडीद्वारे कौलाच्या प्राचीन परंपरेचा आदर म्हणून दिली जाते. प्रसाद, कुंकू आणि कौलाचे लिखित उत्तर या सर्वांसह तुमचा प्रसाद त्या आठवड्यातच तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवला जातो.

या संपूर्ण प्रक्रियेत पूर्ण गोपनीयता पाळली जाते—तुमचा प्रश्न, तुमचे नाव, तुमच्या समस्येचे स्वरूप हे फक्त माईंपर्यंत मर्यादित राहते. कौलप्रसाद हा अत्यंत पवित्र, संवेदनशील आणि दैवी संकेत असल्यामुळे त्यात कोणतीही हलगर्जी, गोंधळ किंवा बाहेर चर्चा केली जात नाही. तुम्ही जितक्या श्रद्धेने विचाराल, तितक्याच स्पष्टतेने देवी उत्तर देते—हा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

म्हणूनच कौलप्रसाद घेताना संयम, श्रद्धा आणि दैवी निर्णय स्वीकारण्याची तयारी असावी. बाकी सगळे माईंच्या आणि देवीच्या हातात सुरक्षित.

सूचना - दुर्गाष्टमीला होणाऱ्या कौलप्रसाद याचे कोणतेही लाईव्ह सेशन होणार नाहीत. भक्तांच्या प्रश्नांची गोपनीयता ठेवण्यासाठी त्यांना लेखी पत्र पाठवले जाईल (ज्यांना उत्तर लवकर पाहिजे असेल त्यांना दुर्गाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी whatsapp वर कळवण्यात येईल आणि प्रसाद पोस्टाने पाठवले जाईल). म्हणून ज्यांना खरेच महत्वाचे प्रश्न असतील, स्वतच्या कुलदेवी आणि कुलदेवते वर श्रद्धा-विश्वास असेल आणि येणाऱ्या कौलप्रसाद नुसार निर्णय घेण्याची तयारी असेल. त्यांनीच कौलप्रसाद बूक करावे (संपर्क - 7028177950) अन्यथा करू नये. 'उगाच विचारून बघू, काय उत्तर येते बघू' अशी मानसिकता असणाऱ्यांनी कौलप्रसाद बूक करू नये.


'कौलप्रसाद' घेताना त्यात कोणते प्रश्न विचारू शकतो?


कोकणात दिला जाणारा 'कौलप्रसाद' म्हणजे काय?

'कौलप्रसाद' घेताना त्यात कोणते प्रश्न विचारू शकतो?

कौलप्रसाद म्हणजे देवाचे उत्तर. ते फक्त होकार–नकार नसते, तर त्या उत्तरात माणसाचे भविष्य, कृपा, रक्षण आणि दिशा दडलेली असते. म्हणूनच कौलप्रसाद घेताना कोणते प्रश्न विचारायचे, कसे विचारायचे आणि काय विचारायचे नाही हे अत्यंत महत्वाचे ठरते. कोकणात, उत्तर भारतात, दक्षिण भारतात आणि गुरुमाईंच्या कवडीकौलातही हीच एक सूक्ष्म रेषा आहे जी पवित्रता आणि शिस्त टिकवून ठेवते. देवाला प्रश्न विचारणे म्हणजे विश्वाच्या दाराशी उभे राहून मार्ग विचारणे. अशा वेळी प्रश्न हलकेफुलके किंवा मनाला येईल तसे विचारायचे नसतात. फक्त तेच प्रश्न विचारायचे जे खरे, महत्त्वाचे आणि जीवनाला दिशा देणारे असतात.

कौलप्रसादात विचारला जाणारा प्रश्न एकच असावा. माणसाच्या मनात शंभर प्रश्न असले तरी देवाकडे एकावेळी एकच ठेवावा, कारण देवाचा निर्णय स्पष्ट, निर्व्याज, अगदी धारदार असतो. दहा–बारा प्रश्न रचून ‘काय उत्तर येते ते बघू’ असे करणे म्हणजे कौलप्रसादाचे पावित्र्य कमी करणे. कौल हा प्रयोग नाही; तो संवाद आहे. त्यामुळे कौलात विचारायचा प्रश्न मनाला धरून असावा, निर्णय घ्यायची तयारी असावी. देव म्हणेल ते स्वीकारण्याची क्षमता असेल तेव्हाच कौल घ्यावा. अन्यथा मन दुभंगते आणि उत्तर निरर्थक ठरते.

कौलप्रसादात सर्वात आधी विचारले जातात साधे, स्पष्ट प्रश्न—ही वेळ योग्य आहे का, हे काम करावे का, हा निर्णय सुरक्षित आहे का. देवाच्या हो–नाही उत्तरातून अनेक संकटांचे पर्व थांबले आहेत, ही कोकणाची परंपरा मान्य करते. घरगुती प्रश्न आल्यास कुलदेवता रागावली आहे का, नवस पूर्ण करावा का, या घरात काही दोष आहे का असे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न कुटुंबाच्या रक्षणाशी जोडलेले असल्याने ते प्रामाणिकपणे विचारायचे असतात.

धंदा, शेती, व्यवसाय याबद्दलही कौलात विचारले जाते. नवी जागा, नवा भागीदार, गुंतवणूक, दुकानाची दिशा—हे सर्व देवाच्या संमतीने ठरवले तर अडथळे कमी होतात, असे लोक सांगतात. नाती आणि विवाहासंबंधी प्रश्नही तितकेच गंभीर मानले जातात; कारण कौल नात्यांचे भविष्य सांगू शकतो. आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारताना देव हे दैवी कारण आहे का, उपाय सुचवत आहे का, कोणत्या देवतेकडे नवस करावा यासारखे मार्गदर्शक प्रश्नच विचारावे. कौल औषध नाही; तो दिशा आहे.

जमीन, घर, वास्तू यासंबंधी प्रश्न कोकणात सर्वाधिक विचारले जातात—ही जागा योग्य आहे का, वास्तुदोष आहे का, घरात अडथळे जागेमुळे आहेत का. कौल अडथळ्याचे मूळही सांगतो—पूर्वज, दृष्ट, देवक, कर्म. प्रवास, दिशा, समय, समुद्र–नदी पार करणे यांसारख्या प्रश्नांसाठीही कौल घेण्याची परंपरा जुनी आहे.

हरवलेल्या वस्तू, जनावर, चोरी, ही प्रश्नांची एक वेगळी शाखा आहे जी कोकणात अजूनही अत्यंत जिवंत आहे. उपाय, नवस, किती दिवस साधना करावी, कोणाला नवस करावा, देव स्वीकारतोय का—हे प्रश्न देव स्वतः उत्तर देतो असे मानले जाते. काही वेळा कोणता देव उत्तर देत आहे हेही कौल सांगतो. हे अत्यंत पवित्र मानले जाते.

पण काही प्रश्न कधीच विचारू नयेत. अनैतिक, इतरांना हानी पोहोचवणारे, विकृत किंवा मृत्यूशी संबंधित प्रश्न देवतेच्या मर्यादेबाहेर असतात. देवाला आव्हान देणारी भाषा, खोटे बोलून विचारलेले प्रश्न—हे कौलप्रसादासाठी अपमान असतात.

शेवटी एकच सार कौलप्रसाद म्हणजे खेळ नव्हे; तो देव, कुलदेवता आणि जगदंबेचा निर्णय आहे. मन स्वच्छ, प्रश्न थोडक्यात आणि जीवनात उतरवण्याची क्षमता असेल तेव्हाच कौलपुढे उभे राहावे. देवाचा संकेत नेहमी मनाला स्थिर करणारा असतो, पण त्याला स्वीकारणारी वृत्ती असेल तरच तो प्रसाद फळतो. देव बोलतो तेव्हा माणूस शांत होतो, आणि कौलप्रसादाचा खरा अर्थ तेव्हाच उमलतो.


कोकणात दिला जाणारा 'कौलप्रसाद' म्हणजे काय?


मला माई कडून 'कौलप्रसाद' घ्यायचा असल्यास कसा घेऊ?

कोकणात दिला जाणारा 'कौलप्रसाद' म्हणजे काय?

कोकणातील कौल, उत्तर भारतातील संकेतपद्धती, दक्षिण भारतातील कवडीकौल आणि गुरुमाई रेवती माई देतात तो कवडीद्वारे कौलप्रसाद… या सर्वांचा मूळ पाया एकच आहे दैवी संकेत.

पद्धती वेगळ्या, देव वेगळे, प्रदेश वेगळे, गुरू वेगळे, पण अर्थ एकच: देव जे सांगतो ते नम्रतेने ऐकणे. म्हणूनच कोकणातील भैरव, भवानी (रक्षक शक्ति आणि गांवदेवी), रावलनाथ, बेताल, जगदंब, करणी, जोगेश्वरी, देवकुळ माऊली यांच्या देवळांत घेतला जाणारा कौल आणि आदिशक्ती, जगदंबा, तुळजा भवानी तसेच इतर देवी अवतारांसाठी गुरुमाई रेवती माई देतात तो कवडीचा कौलप्रसाद हे दोन्हीही सारखेच आहे. पद्धत वेगळी दिसते पण तत्त्व तेच आहे.

कौल म्हणजे देवाचा निर्णय. कधी फुलावरून, कधी पानावरून, कधी तांदुळावरून तर कधी गव्हाच्या दाण्यांवरून. देवपुढे ठेवलेल्या या छोट्याशा प्रतीकांवरून देव आपली होकार-नकाराची भाषा सांगतो, आणि तो निर्णय अंतिम मानला जातो. देवाला विचारलेला प्रश्न, त्यावर टाकलेली कवडी किंवा फूल, ते जसे पडते तसे उत्तर मिळते. उत्तर कठीण असो वा सोपे, कोकणातील लोक ते बदलत नाहीत कारण देवाचा संकेत बदलता येत नाही हे त्यांना माहीत असते. उत्तर भारतातील शक्तिपीठांमध्येही अशाच प्रकारे दैवी प्रसादाने संकेत घेतले जातात. दक्षिणेत तर कवडीशास्त्र ही अतिशय जुनी परंपरा असून आजही भैरव–काळी–अम्मन देवळांत कवडीच नव्हे तर विशेष शंखकवचांनी संकेत घेतले जातात.

हीच परंपरा गुरुमाई रेवती माई आजच्या काळात साध्या आणि सहज मार्गाने पुन्हा जिवंत करत आहेत. माईंच्या हातून घेतला जाणारा कवडीद्वारे 'कौलप्रसाद' म्हणजे देवीची थेट आज्ञा. हजारो लोकांना माईनी कवडीद्वारे मार्गदर्शन केले आहे, पण माई नेहमी स्पष्ट सांगतात की रोजच्या लाईव्हमध्ये किंवा वैयक्तिक बोलण्यात कवडी पाहणे म्हणजे कौलप्रसाद देणे नव्हे. कारण कौलप्रसाद हा साधा खेळ किंवा हो–नाही उत्तर नाही. तो दैवी निर्णय आहे. देवाच्या उपस्थितीत, देवाच्या आज्ञेने दिलेला संकेत आहे. म्हणूनच कोणालाही कौलप्रसाद देण्याचा अधिकार नसतो; त्यासाठी गुरूची परवानगी, परंपरेचे ज्ञान आणि देवीशी असलेला नितांत निष्ठेचा आणि खडतर उपासनेचा दुवा आवश्यक असतो.

कोकणातील देवळांत सोमवार, रविवार, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी कौल घेतला जातो. देवाची जागृती या काळात जास्त मानली जाते. तसेच गुरुमाई प्रत्येक महिन्याच्या 'दुर्गाष्टमीला' फक्त त्या दिवशीच कवडीद्वारे कौलप्रसाद देतात. कारण कौल हा प्रसाद आहे, चौकशी नाही. निर्णय आहे, चर्चा नाही. ज्याला हा प्रसाद मिळतो, त्याने तो मनापासून स्वीकारण्याचीच अपेक्षा असते.

कौलप्रसाद हा फक्त उत्तर नसतो; तो देव आपल्याला सावध करत असतो, संरक्षण देत असतो, मार्ग दाखवत असतो. कौल मनापासून ऐकला तर ऐकणाऱ्याचे भलेच होते. हे कोकणातील असो किंवा काश्मीर हिमाचलातील देवळातील असो किंवा दक्षिणेतील अम्मन मंदिरातील कवडीकौल असो, सर्वांचे अनुभव सांगतात. कारण देव एक, दैवी ऊर्जा एक, आणि संकेत देण्याची शक्तीही एकच.

म्हणूनच पद्धती जरी वेगळ्या दिसल्या कुठे फूल, कुठे पान, कुठे तांदूळ, कुठे गहू, तर उत्तर-दक्षिणेत कवडी—तरी कौलप्रसाद हा सर्वत्र समान महत्त्वाचा आहे. हा प्रसाद म्हणजे देव बोलतोय, देवी मार्ग दाखवतेय, गुरू माध्यम बनून सत्य सांगतायत. देवाच्या शब्दाला मान दिला तर तो मार्ग नेहमीच भल्याचाच असतो. कौलप्रसादाचा सार अर्थ हा एकच: जे देव सांगतो ते स्वीकारा, मनाने स्वच्छ रहा आणि दैवी संकेताला नम्रतेने माना यापेक्षा मोठे रक्षण दुसरे नाही.


मला माईंकडून 'कौलप्रसाद' घ्यायचा असल्यास कसा घेऊ?



अप्सरा, यक्षिणी आणि योगिनी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनेक जण विचारतात की अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी किंवा अशा सूक्ष्म जगातील शक्तींची साधना करता येते का. पुस्तके वाचून, यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून किंवा कोणाच्या तोंडून दोन गोष्टी ऐकून लोकांना एक भास होतो की या साधना सहज आहेत, मंत्र मिळाला की शक्ती तुमच्या दारात प्रकट होणार. पण सत्य नेहमीच कठोर असते. या शक्तींची साधना ही सर्वात उच्च, कठीण आणि प्राणघातक श्रेणीत मोडते. यांची साधना कोणालाही करता येत नाही आणि बहुतेकांना तर करायचीही नसते, कारण त्यासाठी लागणारा संयम, मनाची स्थिरता, तपश्चर्या, शुद्धता आणि गुरुंची प्रत्यक्ष उपस्थिती हा सर्वांचा अभाव असतो.

या सर्व सूक्ष्म शक्ती साधारण देवीसारख्या नसतात. या प्रकृतीतील वेगवेगळ्या लोकांतील आहेत. अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी या सर्वांच्या उर्जेचा प्रकार वेगळा असतो. या शक्ती माणसाच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडवू शकतात. काही चांगले, काही थेट विनाशकारी. म्हणूनच प्रश्न पडतो की यांची साधना करू शकतो का. तांत्रिक उत्तर आहे - हो, शक्य आहे. परंतु नुसते शक्य आहे म्हणून ते करावे असे नाही. पाण्यात पोहू शकतो म्हणून महासागरात उडी मारत नाहीत. त्यासाठी गती, कौशल्य, श्वास, तंत्र, आणि अनुभवी मार्गदर्शक लागतो. तसंच इथेही आहे. मंत्र मिळाला म्हणजे साधना यशस्वी होत नाही, तर ती साधना गुरूंच्या देखरेखीखाली, त्यांच्याच मार्गदर्शनाने, त्यांच्या उर्जेच्या संरक्षणात होते.

बहुतांश लोकांच्या मनात ‘सिद्ध करू शकतो का’ अशी उत्सुकता असते. सिद्धी हा शब्द जितका आकर्षक वाटतो, तितकाच तो भयानक आहे. सिद्धी म्हणजे त्या शक्तीला बांधून ठेवणे नाही. सिद्धी म्हणजे त्या शक्तीने तुम्हाला मान्यता देणे. तेव्हाच ती तुमच्यासोबत राहते. पण अशी मान्यता मिळवण्यासाठी तपस्या, संयम, अहंनाश आणि अखंड गुरुशरण अशी चारही दारे पार करावी लागतात. कोणतेही पुस्तक, यूट्यूब गुरु किंवा स्वतः घातलेले नियम या दारांपुढे शून्य होतात.

गुरु आवश्यक आहे का? हो, शंभर टक्के आवश्यक. साधना ही ऊर्जेचा खेळ आहे, शब्दांचा नाही. मंत्र हे फक्त अक्षरांचे समूह नाहीत. मंत्र म्हणजे जिवंत उर्जा, आणि त्या उर्जेला जागवताना तुमचा देह, मन, नाडी, प्राण, चित्त या सर्वांमध्ये प्रचंड बदल होतात. हे बदल सहन करण्याची क्षमता सर्वांकडे नसते. चुकीचा उच्चार, चुकीची दिशा, चुकीचा काल, चुकीची मनस्थिती, चुकीची जागा या पैकी एक चुकी झाली तरी साधकाच्या आयुष्यात विनाश ओढवू शकतो. म्हणूनच ‘मानलेले गुरू’ किंवा ‘स्वतः घोषित केलेले गुरू’ या मार्गावर चालू शकत नाहीत. कारण यासाठी अनुभव हवा, उपासना हवी, साक्षात्कार हवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संरक्षण हवे. जे गुरु स्वतः या साधनांचे अनुभवी नसतील, ज्यांनी स्वतः साधना पूर्ण केली नसेल, ते कोणालाही शिकवू शकत नाहीत.

फक्त पुस्तके वाचून साधना करणे हा सर्वात मोठा भ्रम आहे. पुस्तकात विधी लिहिला असतो, पण तो विधी जिवंत कसा करायचा हे फक्त गुरु शिकवतात. त्या विधीचा प्राण, काल, दिशा, चर्या, कळा, तत्त्व हे सर्व सूक्ष्म ज्ञान पुस्तकात नसते. म्हणून गुरुंशिवाय साधना सुरु करणे म्हणजे डोळे बांधून अंधारात चाकू हातात घेऊन धावणे. दिशा नसते, नियंत्रण नसते, आणि कधी कोणत्या दिशेने स्वतःलाच इजा होते हे कळत नाही.

या सर्व शक्तींची साधना अत्यंत कठोर नियमांच्या आधारे केली जाते. शुद्धता, ब्रह्मचर्य, मनाची स्थिरता, भयावर विजय, नकारात्मक विचारांवर नियंत्रण, क्रोधाचे शमन, इंद्रियांचे संयम हे सर्व पायाभूत आहेत. जो व्यक्ती स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, राग, मत्सर, लोभ, भय, वासनेपासून वर उठू शकत नाही, त्याने या साधनांचा विचारही करू नये. कारण त्या शक्ती सूक्ष्म आहेत आणि त्या थेट साधकाच्या मनावर परिणाम करतात. जर साधक आतून घाणेरडा असेल, मन अस्थिर असेल तर या शक्ती त्याला मदत करत नाहीत उलट त्याच्यातील दोष प्रकर्षाने वाढवतात.

प्रश्न पडतो की योग्य साधना कशी? योग्य विधी कसा? मंत्र कसा? याचे उत्तर स्पष्ट आहे गुरुंशिवाय जाणून घेणे अशक्य आहे. मंत्र हा फक्त आवाज नाही, तो श्वासाशी जोडला जातो, नाडीशी जोडला जातो, प्राणाशी जोडला जातो. साधनेच्या वेळी कोणते न्यास, कोणती मुद्रा, कुठला भाव, कोणती बाजू, कोणता वेळ हे सर्व गुरु शिकवतात. ‘मी पुस्तकात वाचलं’ हा एकच विचार साधना बिघडवायला पुरेसा असतो. त्यामुळे कोणतीही सूक्ष्म शक्ती सिद्ध करायची असेल तर प्रथम स्वतःला सिद्ध करा गुरु स्वीकारा, त्यांचे मार्गदर्शन घ्या, साधना शुद्ध करा.

जगात एक नियम आहे जे जितके शक्तिशाली, ते तितके धोकादायक. अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी या सर्व शक्ती मोहक, आकर्षक आणि रहस्यमय असतात. पण त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे ती मोहकता, ते सौंदर्य आणि ती ऊर्जा आपल्या नियंत्रणात ठेवता येणं. ज्या साधकाला स्वतःची वासना, भीती, इच्छा नियंत्रित करता येत नाही, त्याने या शक्तींच्या साधना करणे म्हणजे स्वतःचा विनाश बोलावणे.

म्हणून निष्कर्ष अतिशय सोपा पण कठोर आहे. साधना करू शकतो पण गुरुशिवाय नाही. सिद्ध करू शकतो पण त्यासाठी स्वतःला सिद्ध करणं आवश्यक आहे. योग्य साधना, विधी, मंत्र, संकल्प, काल, दिशा, स्वच्छता आणि गुरुंची अनुभवी नजर आणि संरक्षण याशिवाय या शक्तींची साधना करणे म्हणजे आग हातात घेऊन पेटते घर ओलांडणे. ज्यांना ही वाट चालायची आहे त्यांनी प्रथम गुरु शोधावे, त्यांना समर्पित व्हावे आणि मगच साधनेचा विचार करावा. बाकी सर्व काही फक्त उत्सुकता, कल्पना किंवा धोकादायक खेळ आहे.

सामान्य माणसाला अदृश्य शक्तींचे आकर्षण असते. अप्सरा, यक्षिणी, नागिनी, किन्नरी किंवा इतर अदृश्य लोकातील अस्तित्वे नेहमीच रहस्यांनी झाकलेली असतात. पुराणात, तंत्रग्रंथांत, योगशास्त्रात या सर्वांचा उल्लेख सापडतो आणि प्रत्येकाचा स्वभाव, शक्ती, गुणधर्म वेगळे सांगितलेले आहेत. पण या सगळ्या अस्तित्वांकडे पाहताना सर्वात आधी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या शक्ती कोणत्याही साध्या माणसासाठी नाहीत. या शक्ती ज्या लोकांत राहतात, ज्या लोकांत भ्रमण करतात, ते लोकच अत्यंत उच्च अस्तित्वाचे असतात. सामान्य मनुष्य त्यात ढवळाढवळ करायला गेला तर त्याचा नाश होऊ शकतो.

अदृश्य जग आणि सूक्ष्म लोक यांची चर्चा आजही आपल्या संस्कृतीमध्ये तितकीच जिवंत आहे जितकी हजारो वर्षांपूर्वी होती. माणूस दिसणाऱ्या जगात राहतो, पण त्या पलीकडे आणखी किती विश्वं आहेत हे त्याला कधीच पूर्ण कळत नाही. आकाश, पाताळ, पाताळाखालील लोक, पर्वत, नद्या, जंगलं, वारे, प्रकाश, अंधार… सगळ्यात कुठेतरी काही प्राणी वावरत असतात. ते प्राणी आपल्यासारखे नसतात. त्यांचे शरीर सूक्ष्म असते, त्यांचा स्वभाव वेगळा असतो, त्यांची गरज वेगळी असते आणि त्यांचे नियम तर आणखी विचित्र असतात. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र खरी आहे की ते अस्तित्वात आहेत. आपल्याला दिसत नाही इतकंच

या शक्तींचे अस्तित्व अग्नीप्रमाणे आहे. अग्नी योग्य पद्धतीने हाताळला तर तो उपयुक्त होतो पण चुकीने वापरला तर जाळून टाकतो. या शक्तींचे स्वरूपही तसेच आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी किंवा त्या शक्तीला सिद्ध करण्यासाठी फक्त मंत्र नाही तर स्थिर मन, साधनेची शुद्धता, दीर्घकालीन तपश्चर्या, आणि साक्षात तंत्रगुरुची उपस्थिती आवश्यक असते. योग्य साधना, विधी, मंत्र आणि मार्गदर्शन शिवाय या कोणत्याही शक्तींची साधना शक्यच नाही. 

साधना हा शब्द हलक्यात घेण्यासारखा नाही. अप्सरा साधना असेल तर ती सौंदर्य, चंचलता, मनोमोहिनी शक्तींची साधना असते. यक्षिणी साधना असेल तर ती धन, संपत्ती, आकर्षण आणि भौतिक शक्तींची साधना असते. नागिनी साधना ही सर्पशक्ती, कुंडलिनी, गूढ ऊर्जांचा अभ्यास आहे. किन्नरी साधना म्हणजे संगीत, सूक्ष्मगंध, आकाशमार्गातील सूक्ष्म जीवसृष्टीशी संयोग. या प्रत्येकाची वार्ता ऐकायला सुंदर वाटते. पण त्यामागची अट अशी आहे की साधकाच्या जीवनात कोणतीही अस्थिरता, वासना, भीती, लोभ, क्रोध, अहंकार एवढ्या प्रमाणात नसाव्यात की साधना बिघडेल.

या शक्तींचे नियम मानवी नियमांपेक्षा भिन्न आहेत. त्यांना बोलावणे सोपे, पण परत पाठवणे अत्यंत अवघड. साधना सुरू करण्यापूर्वी माणसाला वाटते की मी तयार आहे. पण शक्ती समोर आली की मन, शरीर, चित्त, प्राण पूर्णपणे बदलतात. शरीरावर कंपन, तापमानात बदल, झोपेत स्वप्ने, जागेपणी दर्शन, श्वासोच्छ्वासात बदल, हे सर्व तंत्रगुरुच्या मार्गदर्शनाशिवाय धोकादायक ठरते. अगदी केवळ मंत्र जरी जपला तरी त्याचे स्पंदन चुकीचे असेल तर त्याचा परिणाम साधकाच्या मानसिकतेवर आणि प्राणशक्तीवर उलट होतो.

या सूक्ष्म लोकांमधला सर्वात प्रसिद्ध वर्ग म्हणजे अप्सरा. अप्सरा या इंद्रलोकातील नर्तकिणी, सुगंध, सौंदर्य आणि शांती यांचे प्रतीक आहेत. पुराणांमध्ये त्यांचा उपयोग साधकांची परीक्षा घेण्यासाठीही केला जातो. मेनका, उर्वशी, रंभा, तिलोतमा अशा अनेक अप्सरा आपल्याला कथा-पुराणांत भेटतात. अप्सरा दैवी असतात. त्यांच्यात तमसिक स्पर्श नसतो. त्या केवळ नृत्य-संगीतासाठी जन्मलेल्या, प्रकाशमय अस्तित्वं मानल्या जातात. साधकांच्या तपश्चर्येला आल्हाद देणाऱ्या. त्यांच्या उपस्थितीत वातावरण सुगंधी होतं, मन शांत होतं. त्यांचा मनुष्यजगतातला हस्तक्षेप फार मर्यादित असतो. त्यांच्याकडे कोणालाही त्रास देण्यासारख्या प्रवृत्ती नसतात. म्हणून अप्सरांचा उल्लेख जिथे होतो, तिथे दैवी शांती असते. अप्सरा मध्ये भरपूर प्रकार आणि उपप्रकार असतात. प्रत्येक अप्सराच्या कर्मस्थान नुसार तिचे स्वामी सुद्धा असतात. आणि तिला सिद्ध करण्यासाठी तिच्या स्वामी ची अनुमति घेऊन मगच तिची साधना करणे बंधनकारक असते. आणि याचे ज्ञान केवळ एक गुरुच देऊ शकतो. 

(नजीकच्या काळात अप्सरा तसेच अन्य इतऱ्योनीच्या साधना संबंधी संपूर्ण शास्त्रोक्त माहिती, विधी तसेच गुप्त आणि गुह्यमंत्र याच वेबसाइटवर दिले जातील. परंतु त्याचा वापर विवेकबुद्धीने आणि गुरूंच्या अनुमतिने आणि मार्गदर्शनाखाली करावा. updated राहण्यासाठी या लिंक वर जाऊन आपला व्हॉटसप्प ग्रुप जॉइन करा 👉 व्हॉटसप्प ग्रुप )

यक्षिणी हा त्यापेक्षा वेगळा जग. सुंदरही आणि उग्रही. यक्षिणी या कुबेराच्या साम्राज्यातील प्राणी. त्या संपत्तीच्या, रक्षणाच्या, रहस्यांच्या आणि ऊर्जा-आकर्षणाच्या देवता मानल्या जातात. त्यांच्या ३६ मुख्य प्रकारांचा उल्लेख तंत्रग्रंथांमध्ये आढळतो त्यासोबत काही उप आणि कनिष्ठ प्रकार ही आहेत ज्या साधकांना लवकर सिद्ध होतात. काही यक्षिणी कोमल, दैवी, प्रसन्न असून साधकाला यश, संपत्ती, संरक्षण देतात. पण काही यक्षिणी उग्र, रौद्र, तांत्रिक शक्तींच्या मार्गावर असतात. साधारण माणसाने यक्षिणी उपासना करू नये असं शास्त्र सांगतं कारण त्यांचे नियम अत्यंत कठोर आहेत. चुकीचा मंत्र, चुकीचा आचरण यातून परिणाम उलट होऊ शकतो असं मानलं जातं. पण या सगळ्यांतून एक गोष्ट स्पष्ट होते की यक्षिणी या अत्यंत शक्तिशाली सूक्ष्म ऊर्जा आहेत. त्यांची उपस्थिती जंगलात, गुहांमध्ये, निर्जन स्थळी, प्राचीन मंदिरांच्या उंबरठ्यांवर असल्याचे लोक म्हणतात. त्या रक्षणकर्त्या असतात पण निसर्गाच्या पद्धतीनेच. यांचे भरपूर प्रकार आणि उपप्रकार असतात. प्रत्येक यक्षिणीच्या कर्मस्थान नुसार तिचे स्वामी सुद्धा असतात. आणि तिला सिद्ध करण्यासाठी तिच्या स्वामी ची अनुमति घेऊन मगच तिची साधना करणे बंधनकारक असते. आणि याचे ज्ञान केवळ एक गुरुच देऊ शकतो. 

योगिनी या अत्यंत सूक्ष्म, उग्र आणि शक्तिशाली तांत्रिक उर्जांच्या स्वरूपात मानल्या जातात. त्या देवीच्या विविध शक्तिकला आहेत. ६४ योगिनींची नावे, पीठे, तांत्रिक कार्य आणि उर्जा प्रवाह हे सर्व अत्यंत गूढ मानले जाते. सामान्य लोकांना त्यांची संकल्पनाही समजणे कठीण असते कारण त्या दैहिक नसून पूर्णतः उर्जामय अस्तित्व आहेत. योगिनींची उपासना, त्यांचे आह्वान किंवा साधना हे सामान्य देवीभक्ती किंवा घरगुती पूजा यापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. योगिनींची साधना ही असते, पण ही साधना घरी बसून करणे असंभव आहे. योगिनी साधना म्हणजे तंत्राच्या सर्वात उग्र आणि कठोर स्तरावरची प्रक्रिया. अशा साधना गृहस्थ लोकांसाठी नसतात. गृहस्थाला रोजच्या आयुष्यातील स्थिरता, कुटुंब, काम, भावना आणि मानसिक संतुलन राखावे लागते. योगिनी साधना ही या सर्व गोष्टींच्या पलीकडची असते. ती माणसाच्या मनावर, नाडीवर, प्राणावर आणि सूक्ष्म देहावर अत्यंत प्रचंड परिणाम करत असते. ज्यांच्याकडे मनाचा पूर्ण ताबा नाही, ज्यांनी देह–मन–इंद्रिय संयम मिळवलेला नाही, ज्यांच्यात भीती, राग, मोह किंवा वासना यांचे तरंग आहेत, त्यांनी या साधनेचा प्रयत्न करणेही विनाशकारी ठरते. योगिनी उग्र असतात आणि त्यांच्या उर्जेचा वेग सामान्य साधकाच्या देहाला व मनाला सहन होत नाही. चुकीचे उच्चारण, अयोग्य वेळ, अयोग्य दिशा, चुकीचा विधी किंवा चुकीची मानसिक अवस्था यापैकी एकही गोष्ट चुकली तर परिणाम साधकावर उलटा होतो. त्यामुळे गुरुचा आदेश, संरक्षण आणि प्रत्यक्ष देखरेख नसताना एकही मंत्र किंवा साधना सुरु करणे हे स्वतःच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. योगिनी साधना ही गुरुंच्या आदेशाशिवाय करण्याची गोष्टच नाही. गुरुच त्या उर्जेला धार देतील, ती कुठे उतरवायची, कुठे थांबवायची, कुठे रोखायची हे तेच सांगतात. योगिनी साधना करण्यासाठी प्रथम साधकाला स्वतःला तयार करावे लागते. मन शुद्ध करणे, अहंकार मोडणे, भयावर विजय मिळवणे, इंद्रियसंयम, ब्रह्मचर्य, प्राणायाम, मंत्रसंस्कार हे सर्व वर्षानुवर्षे साधावे लागते. हे झाल्यावरच गुरु ठरवतात की साधक योगिनी ऊर्जेच्या स्पर्शासाठी तयार आहे की नाही. समाजात अनेक जण पुस्तकातले मंत्र वाचून किंवा इंटरनेटवरून माहिती घेऊन योगिनींचे आह्वान करतात असे दावे करतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आणि धोकादायक आहे. योगिनी साधना म्हणजे जीवन बदलून टाकणारी, कधीकधी आयुष्याची दिशा मोडून टाकणारी प्रक्रिया असते. ती कोणत्याही ऑनलाइन व्हिडिओ किंवा बनावट गुरूंच्या बोलण्याने होत नाही.

किन्नरी हे अप्सरा किंवा यक्षिणींपेक्षा अगदीच वेगळे. किन्नरी या किन्नर लोकातील स्त्रीप्राणी. अर्ध-मानवी, अर्ध-पक्षी शरीर असलेले, संगीत आणि कलाकौशल्यात देवांना मागे टाकणारे जीव. त्यांच्या आवाजात असे काही असते की साधकाचे मन शांत होते, राग नष्ट होतो आणि वातावरण सुस्वर होतं. किन्नरी मानवांना त्रास देत नाहीत. त्या कलात्मक, दयाळू आणि निर्मळ लोकात राहतात. कथांमध्ये त्या पर्वतांवर, तलावांजवळ किंवा वनराईत राहतात असा उल्लेख आहे. किन्नरींचा स्वभाव नेहमी शुभच असतो. यांचे मुख्य 7 प्रकार असतात.

नागिनी हा अजून एक प्रसिद्ध वर्ग. सर्प रक्तातून आलेली, पण सूक्ष्म शक्तींनी परिपूर्ण. नागिनी यांचा उल्लेख प्रत्येक ग्रंथात आढळतो. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता, रक्षणशक्ती, स्मरणशक्ती आणि जलतत्त्वाशी संबंधित कौशल्य असतं. नागलोकातील स्त्रियांना नागिनी म्हणतात. काही नागिनी शांत आणि रक्षक, तर काही उग्र आणि तांत्रिक मार्गाशी संबंधित मानल्या जातात. भारतातील प्रत्येक नदी, तळं, झरा यांच्याशी नाग-नागिन जोडलेले असतात ही लोकपरंपरेची मान्यता आहे. स्वप्नात नागिणी दिसणे, सर्पांचे दर्शन होणे हे सकारात्मक संकेत मानले जाते—अंतर्ज्ञान वाढतं, शक्ती सक्रिय होते असं म्हटलं जातं. नागिनींचे नऊ प्रकार मानले गेले आहेत आणि प्रत्येकाचा प्रभाव वेगळा. यांचे मुख्य 9 प्रकार असतात.

यानंतर येतो भूत हा वर्ग. भूत म्हणजे मृत झाल्यानंतर जे पुढे जाऊ शकत नाही असे आत्मिक शरीर. भूत म्हणजे भटकणारी ऊर्जा. त्यांचं अस्तित्व नेहमी वाईट असतंच असं नाही. काही भूत निरुपद्रवी, काही भ्रमित आणि काही रागीट असतात. भूत हे प्रेताच्या पुढच्या अवस्थेतले जीव मानले जातात. भूतांचे प्रकार अनेक. ग्रामभूत, दिशा भूत, गृहभूत, स्थानभूत असे अनेक प्रकार लोकपरंपरेत सांगितले जातात. घरात अचानक आवाज येणे, झाडांच्या सावलीत विचित्र हालचाल दिसणे, निर्जन ठिकाणी हवा वेगाने हलणे अशा घटनांना भूत मानलं जातं. पण विज्ञान सांगतं की ही ऊर्जा एखाद्या अस्तित्वाचे संकेत असू शकतात. भूत उतावळ्या इच्छा, अपूर्ण मृत्यू किंवा अचानक अपघातामुळे निर्माण होतात असा विश्वास आहे.

प्रेत माणूस जसा शरीर सोडतो त्यानंतरचा काही दिवसांचा सूक्ष्म काळ म्हणजे प्रेतयोनी. या काळात आत्मा स्थिर नसतो. तो स्थिर न झालेलं मन असतं. त्यामुळे प्रेत त्रास देत नाहीत पण अस्वस्थ असतात. त्यांच्या सहा प्रकारांचा उल्लेख आहे. प्रेत आणि भूत यांमध्ये मुख्य फरक म्हणजे प्रेत तात्पुरते, भूत स्थिर. त्यामुळे प्रेताच्या व्यवहारात हलके कंप, थरथर, आवाज, किंचित अस्तित्व जाणवते. ही अवस्था आपोआप संपते.

पिशाच हा एक अत्यंत उग्र वर्ग. पुराणांनुसार पिशाच हे मांसाहारी, रक्तपायी, अतीतमसिक प्रवृत्तीचे जीव. जंगलात, श्मशानात, निर्जन स्थळी, अभागी जागी त्यांचा वावर असतो असं मानलं जातं. पिशाचांच्या नऊ प्रकारांचा उल्लेख आहे. काही उग्र तर काही वायूसदृश. अकारण भीती, स्वप्नात भय, अचानक आक्रमकता, घरात जड ऊर्जा जाणवणे याबाबत लोक पिशाच कारणीभूत मानतात. हे सर्व विश्वासाचे विषय आहेत; जे दिसत नाही त्याचं स्पष्टीकरण लोक अशा प्रकारे करतात. तांत्रिक मार्गात पिशाचांचा उपयोग केलेला आढळतो पण त्यातही कठोर नियम पाळावे लागतात.

डाकिनी हा शक्तिपीठाशी जोडलेला सूक्ष्म स्त्रीऊर्जा वर्ग. डाकिनी या साधकाच्या जवळ राहून त्याचे रक्षण करतात, संकेत देतात, साधनेतील अडथळे दूर करतात. डाकिनींचे आठ प्रकार सांगितले गेले आहेत. त्यांची ऊर्जा तांत्रिक आहे पण सर्वसामान्य लोकांना त्या कधीच त्रास देत नाहीत. डाकिनी हे शक्तिचे प्रतीक मानले जातात. त्यांचे स्वरूप कधी गंभीर, कधी सुंदर, कधी उग्र असू शकते. पण त्या केवळ साधकांच्या मार्गात दिसतात.

शाकिनी या मानवी शरीरातील सहा चक्रांमध्ये ऊर्जा म्हणून अस्तित्वात असतात. त्या सूक्ष्मदेहात वावरतात. साधक ध्यान, जप, प्राणायाम करत असताना शाकिनीची ऊर्जा सक्रिय होते असे योगशास्त्र सांगते. मूलाधार ते आज्ञा चक्रापर्यंत सहा शाकिनी शक्ती आहेत. त्या दैवी असून भय निर्माण करत नाहीत. मानवाच्या चेतनेत, अंतर्ज्ञानात, मानसिक शक्तीत वाढ करतात असे मानले जाते.

वेताळ हे भयप्रद वाटतात, पण कथांनुसार ते अत्यंत ज्ञानवान असतात. विक्रम-वेताळ कथा हे त्याचे उत्तम उदाहरण. वेताळ शरीर नसलेले, हवेमध्ये वावरणारे, श्मशान आणि निर्जन स्थळांत राहणारे जीव मानले गेले आहेत. त्यांचे सात प्रकार सांगितले जातात. काही वेताळ केवळ निरीक्षण करतात, काही संकेत देतात, काही अती उग्र असतात. पण वेताळ सामान्य मानवाला त्रास देत नाहीत, जोपर्यंत कोणी उगाच त्यांचा क्षेत्रात हस्तक्षेप करत नाही.

गंधर्व हा सर्वात सौम्य वर्ग. संगीत, सुगंध, सौंदर्य आणि प्रकाश यांच्याशी जोडलेले. गंधर्वांच्या सात प्रकारांचा उल्लेख आहे. ते दैवी संदेशवाहक, देव आणि मानव यात संवाद साधणारे तसेच संगीतकलेत पारंगत असतात. गंधर्वांच्या कथांमध्ये प्रेम, कला आणि सौंदर्य यांचा ओलावा असतो. ते ना उग्र, ना तमसिक; पूर्णपणे प्रकाशमय.

या सर्व सूक्ष्म प्राण्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते वेगळ्या वारंवारतेवर अस्तित्वात असतात. आपले डोळे त्यांना पाहू शकत नाहीत कारण आपली इंद्रिये त्या तरंगांना पकडू शकत नाहीत. जसं रेडिओवर एकाच वेळी अनेक चॅनल चालू असतात पण तुमचं मशीन फक्त एकच पकडतं तसंच मानवी डोळे. सूक्ष्म प्राणी आपल्यापासून काही इंच अंतरावर असू शकतात पण आपल्याला ते कधीच दिसत नाहीत. माणूस ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट त्याला माहिती नसते म्हणून घाबरतो. या अदृश्य जगातील प्राणी हे निसर्गाचा भाग आहेत. काही शुभ, काही उग्र, काही तटस्थ. जशी जंगलात सर्व प्रकारचे प्राणी असतात तसंच सूक्ष्म जगातही सर्व प्रकारची ऊर्जा असते. त्यांचा आदर करणे, निसर्गाच्या क्षेत्रात अनावश्यक हस्तक्षेप न करणे, आणि ज्ञान ठेवणे हेच उचित. या सर्वांचा अभ्यास करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की अप्सरा कला देते, यक्षिणी रक्षण व संपत्ती, किन्नरी सौंदर्य व संगीत, नागिनी बुद्धिमत्ता व ऊर्जा, भूत-प्रेत जीवन-मृत्यूचं तत्व शिकवतात, पिशाच सावधानतेचं धडे देतात, डाकिनी-शाकिनी साधनेतील शक्ती आहेत, वेताळ गूढ ज्ञान आहे आणि गंधर्व सौंदर्य व प्रकाश. हे सगळं निसर्गाचा समतोल आहे. 

साधना क्षेत्र हे अत्यंत रहस्यमय, सूक्ष्म आणि अंतर्मुख मार्ग आहे. या मार्गावर चालताना जसा साधक खोल अंतर्मनात उतरतो, तसा त्याला नवीन अनुभव, उर्जा, ज्ञान आणि अनेक अदृश्य रत्नांची प्राप्ती होते. पण या रत्नांचा तेज हा बाहेर दाखवण्यासाठी नसतो. साधना ही मंचावर उभं राहून टाळ्यांचा आवाज ऐकण्यासाठी केलेली गोष्ट नाही. उलट, जितका साधक प्रौढ होतो, तितका तो शांत, गुप्त आणि विनयशील होत जातो. कारण साधनेचा सारच असा आहे  जितकं जास्त मिळतं, तितकं कमी बोलावं. आजच्या काळात मात्र परिस्थिती उलटी आहे. काहीतरी विशेष अनुभव आला, एखादं स्वप्न पडलं, एखादा छोटासा परिणाम दिसला की लोक लगेच जगाला सांगू लागतात. सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, यूट्यूब कुठे कुठे लोक स्वतःच्या साधनांचे वर्णन, सिद्धीच्या गोष्टी, चमत्कारांचे दावे करतात. पण साधना क्षेत्रात एक जुना, कठोर आणि अचूक नियम आहे: जे ओरडून सांगतात त्यांच्याकडे काही असत नाही. आणि ज्यांच्याकडे खरोखर असतं, ते कधीच सांगत नाहीत.

कारण यामागे एक मोठी आध्यात्मिक शास्त्रीय कारण आहे. इतरयोनि शक्ती जसे अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी, योगिनी, दैवी-अदैवी उर्जा या सर्व एका अटीवर साधकाला साथ देतात: गुप्तता. साधना ही जशी उर्जेची प्रक्रिया आहे, तशीच ती शिस्तीची प्रक्रिया आहे. शक्तीचा स्वभाव समजणं म्हणजे तिला आदर देणं. आणि आदराचा पहिला नियम आहे  गुप्तता. जो साधक आपल्याला मिळालेल्या उर्जेला, मंत्राला, साधनेला गुप्त ठेवतो, त्याला या शक्ती अधिकाधिक खोलवर घेऊन जातात. पण जो साधक फुशारक्या मारतो, लोकांना दाखवतो, सिद्धींची जाहिरात करतो, त्याच्याबद्दल या शक्तींचा विश्वास तुटतो. या शक्ती उग्रही असतात. गुप्तता मोडल्यावर त्या फक्त साथ सोडत नाहीत, तर कधी कधी रागीट होऊन नुकसानही करतात. कारण हे संपूर्ण तंत्रविश्व अत्यंत नियमबद्ध आहे. जर त्या उर्जेला माणसाने "स्वतःची मालकी" समजली, "मी साधक, मी सिद्ध" असा अहंकार केला, तर त्या उर्जा लोप पावतात. आणि त्यांचे अस्तित्त्व लोप पावणे म्हणजे साधक पुन्हा शून्यात पडतो. काही वेळा मानसिक अस्थिरता, गोंधळ, भीती, स्वप्नदोष, उर्जेचा ढासळलेला प्रवाह  असे परिणाम दिसू लागतात. हे दंड आहेत, शिक्षा नाहीत; कारण या शक्तींचा स्वभाव असा आहे गुप्तता भंगली की उर्जा परत जाते.

याच सोबत इच्छुक साधकांनी भगवतगीतेत श्रीकृष्णाने सांगितलेला श्लोक नेहमी लक्षात ठेवावा. 
“यान्ति देवव्रता देवान् पितृ़न्यान्ति पितृव्रताः । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥” 

श्रीकृष्ण म्हणतात - देवांची पूजा करणारे देवलोकात जातात. पितरांची पूजा करणारे पितृलोकात जातात. भूत/इतरयोनींची पूजा करणारे त्याच भूतयोनीत जातात. आणि माझी तसेच पूजा-अर्चना उपासना करणारे माझ्याकडे येतात.

साधनेचा मार्ग हा शोभेचा, प्रदर्शनाचा किंवा मिरवण्याचा मार्ग नाही. हा मार्ग जितका शांत, तितका प्रभावी. जितका गुप्त, तितका फलदायी. जगाला सांगण्याची घाई ठेवली तर साधनेचे काहीच मिळत नाही. पण साधनेला गुप्त ठेवले, मन शांत ठेवले, अहंकार दाबला आणि गुरुचे मार्गदर्शन मानले तर हीच शक्ती साधकाला आयुष्यभर साथ देते. म्हणून साधनेचा खरा सौंदर्य हा शांतपणात आहे, गुप्ततेत आहे, आणि अंतर्मुख प्रवासात आहे. जो हे समजतो, तोच खऱ्या साधनेचा योग्य वारस बनतो.

Latest Post

अत्यंत विशेष उपाय

वैयक्तिक सशुल्क मार्गदर्शन घेणाऱ्यांसाठी महाशक्तिपीठ तर्फे करण्यात येणारे उपाय हे सर्वसामान्य किंवा सार्वजनिक स्वरूपाचे नसून अत्यंत विशेष, भ...