कोकणात दिला जाणारा 'कौलप्रसाद' म्हणजे काय?

कोकणातील कौल, उत्तर भारतातील संकेतपद्धती, दक्षिण भारतातील कवडीकौल आणि गुरुमाई रेवती माई देतात तो कवडीद्वारे कौलप्रसाद… या सर्वांचा मूळ पाया एकच आहे दैवी संकेत.

पद्धती वेगळ्या, देव वेगळे, प्रदेश वेगळे, गुरू वेगळे, पण अर्थ एकच: देव जे सांगतो ते नम्रतेने ऐकणे. म्हणूनच कोकणातील भैरव, भवानी (रक्षक शक्ति आणि गांवदेवी), रावलनाथ, बेताल, जगदंब, करणी, जोगेश्वरी, देवकुळ माऊली यांच्या देवळांत घेतला जाणारा कौल आणि आदिशक्ती, जगदंबा, तुळजा भवानी तसेच इतर देवी अवतारांसाठी गुरुमाई रेवती माई देतात तो कवडीचा कौलप्रसाद हे दोन्हीही सारखेच आहे. पद्धत वेगळी दिसते पण तत्त्व तेच आहे.

कौल म्हणजे देवाचा निर्णय. कधी फुलावरून, कधी पानावरून, कधी तांदुळावरून तर कधी गव्हाच्या दाण्यांवरून. देवपुढे ठेवलेल्या या छोट्याशा प्रतीकांवरून देव आपली होकार-नकाराची भाषा सांगतो, आणि तो निर्णय अंतिम मानला जातो. देवाला विचारलेला प्रश्न, त्यावर टाकलेली कवडी किंवा फूल, ते जसे पडते तसे उत्तर मिळते. उत्तर कठीण असो वा सोपे, कोकणातील लोक ते बदलत नाहीत कारण देवाचा संकेत बदलता येत नाही हे त्यांना माहीत असते. उत्तर भारतातील शक्तिपीठांमध्येही अशाच प्रकारे दैवी प्रसादाने संकेत घेतले जातात. दक्षिणेत तर कवडीशास्त्र ही अतिशय जुनी परंपरा असून आजही भैरव–काळी–अम्मन देवळांत कवडीच नव्हे तर विशेष शंखकवचांनी संकेत घेतले जातात.

हीच परंपरा गुरुमाई रेवती माई आजच्या काळात साध्या आणि सहज मार्गाने पुन्हा जिवंत करत आहेत. माईंच्या हातून घेतला जाणारा कवडीद्वारे 'कौलप्रसाद' म्हणजे देवीची थेट आज्ञा. हजारो लोकांना माईनी कवडीद्वारे मार्गदर्शन केले आहे, पण माई नेहमी स्पष्ट सांगतात की रोजच्या लाईव्हमध्ये किंवा वैयक्तिक बोलण्यात कवडी पाहणे म्हणजे कौलप्रसाद देणे नव्हे. कारण कौलप्रसाद हा साधा खेळ किंवा हो–नाही उत्तर नाही. तो दैवी निर्णय आहे. देवाच्या उपस्थितीत, देवाच्या आज्ञेने दिलेला संकेत आहे. म्हणूनच कोणालाही कौलप्रसाद देण्याचा अधिकार नसतो; त्यासाठी गुरूची परवानगी, परंपरेचे ज्ञान आणि देवीशी असलेला नितांत निष्ठेचा आणि खडतर उपासनेचा दुवा आवश्यक असतो.

कोकणातील देवळांत सोमवार, रविवार, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी कौल घेतला जातो. देवाची जागृती या काळात जास्त मानली जाते. तसेच गुरुमाई प्रत्येक महिन्याच्या 'दुर्गाष्टमीला' फक्त त्या दिवशीच कवडीद्वारे कौलप्रसाद देतात. कारण कौल हा प्रसाद आहे, चौकशी नाही. निर्णय आहे, चर्चा नाही. ज्याला हा प्रसाद मिळतो, त्याने तो मनापासून स्वीकारण्याचीच अपेक्षा असते.

कौलप्रसाद हा फक्त उत्तर नसतो; तो देव आपल्याला सावध करत असतो, संरक्षण देत असतो, मार्ग दाखवत असतो. कौल मनापासून ऐकला तर ऐकणाऱ्याचे भलेच होते. हे कोकणातील असो किंवा काश्मीर हिमाचलातील देवळातील असो किंवा दक्षिणेतील अम्मन मंदिरातील कवडीकौल असो, सर्वांचे अनुभव सांगतात. कारण देव एक, दैवी ऊर्जा एक, आणि संकेत देण्याची शक्तीही एकच.

म्हणूनच पद्धती जरी वेगळ्या दिसल्या कुठे फूल, कुठे पान, कुठे तांदूळ, कुठे गहू, तर उत्तर-दक्षिणेत कवडी—तरी कौलप्रसाद हा सर्वत्र समान महत्त्वाचा आहे. हा प्रसाद म्हणजे देव बोलतोय, देवी मार्ग दाखवतेय, गुरू माध्यम बनून सत्य सांगतायत. देवाच्या शब्दाला मान दिला तर तो मार्ग नेहमीच भल्याचाच असतो. कौलप्रसादाचा सार अर्थ हा एकच: जे देव सांगतो ते स्वीकारा, मनाने स्वच्छ रहा आणि दैवी संकेताला नम्रतेने माना यापेक्षा मोठे रक्षण दुसरे नाही.


मला माईंकडून 'कौलप्रसाद' घ्यायचा असल्यास कसा घेऊ?



Latest Post

अत्यंत विशेष उपाय

वैयक्तिक सशुल्क मार्गदर्शन घेणाऱ्यांसाठी महाशक्तिपीठ तर्फे करण्यात येणारे उपाय हे सर्वसामान्य किंवा सार्वजनिक स्वरूपाचे नसून अत्यंत विशेष, भ...