जगदंब नामलेखन माहिती

जगदंब... एक नाव... एक मंत्र... एक शक्तियात्रा!

"जगदंब" हे केवळ देवीचे नाव नाही, ते एक मंत्र आहे — श्वासासारखा सतत चालणारा, आणि प्राणासारखा प्रत्येकाला जीवन देणारा. जगदंब नावाचा उच्चार केवळ ओठांवर न राहता, मनातून, हृदयातून, आणि आत्म्याच्या खोलवरून होतो, तेव्हाच या नावाची खरी शक्ती प्रकट होते. आणि जेव्हा हे नाव केवळ बोललं जात नाही, तर लिहिलं जातं — आर्ततेने, नित्यनेमाने, श्रद्धेने, तेव्हा ते केवळ अक्षर राहत नाही, ते एक बीज बनतं. शक्तीचं बीज.

१०८ कोटी सामूहिक नामलेखन व्रत आणि शक्तियाग —

हा उपक्रम म्हणजे केवळ भक्तीचा एक मार्ग नव्हे, तर तो आहे हजारो साधकांच्या एकत्रित शक्तीचा महासंकल्प. एक वही... एक लेखणी... एक व्रत... एक शक्ती... हा उपक्रम "महाशक्तिपीठ" मार्फत सुरू करण्यात आलेला आहे. उद्दिष्ट एकच — १०८ कोटी ‘जगदंब’ नाम लेखन करून, संपूर्ण भारतभर एक सामूहिक आध्यात्मिक ऊर्जा तयार करायची आहे. हा व्रत म्हणजे फक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्याचा मार्ग नाही, तो आहे स्वतःच्या आत दडलेली शक्ती जागवण्याचा संकल्प.

हे व्रत कसे करायचे?

दररोज किमान २१०० वेळा ‘जगदंब’ नाव लिहायचं आहे.३६५ दिवसांमध्ये एकूण ७,६६,५०० वेळा हे नाव लिहिले जाईल.तुमच्या हस्ताक्षरात, तुमच्या भावनांनी ओथंबलेलं, तुमच्या आत्म्याचं अर्पण असलेलं हे लेखन एकत्र करून शेवटी एक विशाल शक्तियाग केला जाईल. या शक्तियागात प्रत्येक साधकाची वही आहुती म्हणून अर्पण केली जाईल — आणि त्यातून जागृत होणारी ऊर्जा हजारो आयुष्यं बदलवेल.

हे व्रत का विशेष आहे?

कारण इथे कोणताही भेदभाव नाही. स्त्री-पुरुष, वयोवृद्ध, विद्यार्थी, कामगार, गृहिणी — कोणताही वयोगट असो.हे व्रत मोफत आहे.कोणतीही फी नाही. कोणतेही शुल्क नाही.फक्त एक संकल्प आहे, एक श्रद्धा आहे.

आवश्यक साहित्य:

  • २०० पानी वही

  • लाल शाईचा नवीन पेन (शाई बदलू नये)

  • एक लाल वस्त्र आणि आसन

  • लेखन करताना जवळ ठेवायचं पाणी: वेलची, गुलाबजल, दूध आणि खडीसाखर यांचं मिश्रण

व्रताचे नियम:

  • दररोज उत्तरेकडे तोंड करून लेखन करावं.

  • शुद्ध मनाने, मौनात राहून, शक्यतो मोबाइल/टीव्ही/गोंगाटापासून दूर राहून लेखन करावं.

  • राग, द्वेष, गॉसिप, तक्रारी यांपासून दूर रहावं.

  • लेखन झाल्यानंतर तयार केलेलं पाणी स्वतः प्यावं आणि घरच्या मंडळींनाही द्यावं.

  • बेडवर झोपणं शक्यतो टाळावं. जमल्यास चटईवर झोपावं.

लाल शाईचे महत्त्व

लाल म्हणजे देवीचा रंग — शक्ती, रक्त, जीवन आणि समर्पण.लाल शाईतून लिहिलेलं प्रत्येक "जगदंब" हे अक्षर म्हणजे देवीच्या चरणी अर्पण केलेला शुद्ध भाव, आपल्या रक्तासारखा पवित्र.त्या प्रत्येक अक्षरात तुमचं दुःख, आशा, प्रार्थना, आणि श्रद्धा भरलेली असते.

या व्रताचे अनुभूतीदायक अनुभव:

या व्रतातून आधी अनेक साधकांनी आयुष्याला कलाटणी दिली आहे.

  • कुणाला नोकरी मिळाली

  • कुणाला अपत्यप्राप्ती झाली

  • कुणाला कोर्ट केस मध्ये विजय मिळाला

  • कुणी आत्महत्या टाळली

  • कुणाच्या आयुष्यात पुन्हा समाधान परतलं

हे फक्त अनुभव नाहीत, ही शक्तीची साक्ष आहे.

१०८ कोटी सामूहिक नामलेखन व्रत आणि शक्तियाग. जगदंब

नावनोंदणी कशी करावी?

कोणतंही शुल्क न देता, फक्त एक संकल्प घेऊन खालील लिंकवर तुमचं नाव नोंदवा:


👉 https://forms.gle/aMdYmeU2ZfqYW2oW7

अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क:

📞 7028177950

🌐 www.gurumaai.org

Latest Post

अप्सरा, यक्षिणी आणि योगिनी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनेक जण विचारतात की अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी किंवा अशा सूक्ष्म जगातील शक्तींची साधना करता येते का. पुस्तके वाचून, यूट्यूबवरील व्हिडि...