जय जगदंब जय भवानी
अती प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या कवडी शास्त्राचा वर्ग आता सध्याच्या सोप्या भाषेत लवकरच घेण्यात येत आहे. आजवर गुरुमाईंनी या विद्येच्या अनेक बॅचेस घेतल्या असून, त्यांचे असंख्य शिष्य आणि विद्यार्थी आज कवडी विद्येच्या माध्यमातून स्वतःची उपजीविका करत आहेत. त्यापैकी अनेक जण यूट्यूब आणि फेसबुकवर लाईव्ह सत्रे घेत आहेत, तसेच अनेकांना या विद्येचे प्रत्यक्ष अनुभवही येऊ लागले आहेत.हे शास्त्र माईंनी कोणाकडूनही शिकलेले नसून, स्वतः आई साहेब तुळजाभवानीने त्यांना या शास्त्राचे महत्त्व आणि शिकवण दिली आहे. देवीच्या आदेशानुसार माई हे दिव्य शास्त्र संपूर्ण जगभर पसरवत आहेत. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कवडी शास्त्राद्वारे देवीला कौल लावून जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या जगातील प्रथम गुरु माई आहेत. आज अनेक जण माईंची नक्कल करत आहेत; यावरूनच या शास्त्राचे अलौकिक आणि अद्भुत सामर्थ्य लक्षात येते.
कवडीशास्त्र शिकल्यामुळे आध्यात्मिक जीवनाची खरी वाटचाल सुरू होते. व्यक्तीची अंतर्ज्ञान शक्ती, म्हणजेच इंट्यूईशन पावर, अनंत पटींनी वाढते. एखादी व्यक्ती कितीही दूर असली तरी फक्त तिचे पूर्ण नाव आणि आडनाव माहित असल्यास, तिच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहजपणे आपल्या आसनावरून देता येते. या विद्येमुळे घरबसल्या सन्मानजनक कमाई करण्याची संधीही उपलब्ध होते. यासाठी समोरच्या व्यक्तीचे जन्मनाव, जन्मतारीख, जन्मवेळ किंवा जन्मठिकाण यांची कोणतीही गरज नाही. समाजात ज्या नावाने ती व्यक्ती ओळखली जाते, त्याच नावाचा आणि आडनावाचा पुरेपूर उपयोग होतो.
कवडी शास्त्र शिकण्यासाठी ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र किंवा वास्तुशास्त्र यांचे ज्ञान असणे आवश्यक नाही. या विद्या माहित नसली तरीही कोणीही ही कवडी विद्या सहज शिकू शकतो.
कवडीशास्त्राचा क्लास एकूण 21 दिवसांचा असतो. यामध्ये पहिले तीन दिवस गुरु माई झूम किंवा टेलिग्रामद्वारे थेट क्लास घेतात, आणि त्या क्लासचे रेकॉर्डिंग आयुष्यभरासाठी उपलब्ध असते. त्यानंतर 21 दिवसांची उपासना सांगितली जाते, ज्यामधून गुप्तमंत्राद्वारे कवड्या सिद्ध होतात. पुढे प्रॅक्टिकल स्वतः गुरु माई करून घेतात आणि शेवटी आशीर्वाद देऊन क्लासची समाप्ती होते. ही गुप्त कवडीविद्या शिकल्याचे सर्वांना सर्टिफिकेटही दिले जाते. क्लास पूर्ण झाल्यानंतरही आवश्यकतेनुसार माई मार्गदर्शन देतात.
माईंच्या अनेक शिष्यांच्या जीवनात या क्लासमुळे आमूलाग्र सकारात्मक बदल झाले आहेत. तुम्हालाही ही विद्या नक्की शिकता येईल. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपले अॅडमिशन आत्ताच घ्या.
हसत खेळत आणि आनंदी वातावरणात जीवनात साक्षात शिव–पार्वतीची ही अती प्राचीन आणि गुप्तविद्या शिकण्याची संधी या क्लासच्या निमित्ताने सर्वांना मिळते. माईंच्या मुखातून मिळणारा कवडीचा गुप्त मंत्र म्हणजे जणू देवीची शक्ती अंगात संचारल्याचा अनुभव देणारा असतो.
संपर्कासाठी नंबर देण्यात येत आहे. - 07028177950
.png)
