कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात की वाटतं, सर्व काही अडकून गेलंय. काहीच पुढे सरकत नाही. काही व्यक्तींना वर्षानुवर्षे हीच अवस्था भोगावी लागते. घरात आजारपण सतत येतं, औषधं करावी लागतात, खर्च वाढतो पण उत्पन्न मात्र स्थिरच राहतं. पैसा टिकत नाही, लागोपाठ कर्ज वाढतं, एक संपलं की दुसरं घ्यावं लागतं. नात्यात सतत कुरबुरी, भांडणं, समज-गैरसमज, अगदी रक्ताच्या नात्यात सुद्धा विसंवाद असतो. घरात कोणाशी कोणाचं जमत नाही. सगळे उपाय करून थकल्यावरही काहीच बदल होत नाही. देवदर्शन, व्रतवैकल्य, वास्तु उपाय, ग्रहशांत, मंत्रतंत्र, तांत्रिक उपाय सगळं करून पाहिलं तरी प्रश्न तेच, आणि मनात एक वेगळीच पोकळी निर्माण होते “देव आहे का खरंच?” ही शंका हळूहळू मन पोखरायला लागते.
अशा व्यक्तीचा आणि त्यांच्या कुटुंबाचा छळ समाजाच्या पातळीवर सुरू होतो मानसिक छळ, आर्थिक दडपण, सामाजिक तिरस्कार. मग माणूस एकटाच पडतो. नातेसंबंध, पैसा, आरोग्य, श्रद्धा सर्व गोष्टी हातातून निसटत जातात. या वेळी हक्काचं कुणी वाटत नाही. अशी असंख्य माणसं महाशक्तीपिठाकडे आली आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेली ही अडचण शब्दांत व्यक्त केली आणि महाशक्तीपिठात त्यांना उत्तर मिळालं. काही वेळा उत्तर एकदम स्पष्ट मिळालं, कधी कधी प्रक्रिया वेळ घेणारी होती, पण त्यांच्या मनातला अंधार हळूहळू विरघळू लागला.
महाशक्तीपीठ म्हणजे केवळ पूजा-पाठ करणारी संस्था नाही. ही एक अशी जागा आहे जिथे पैसा नाही, तर माणूस महत्त्वाचा मानला जातो. इथे तुम्हाला कुणी थोतांड दाखवणार नाही. इथे कुळाचार, शास्त्र, धर्म आणि अध्यात्म या चौकटीत राहून शुद्ध आणि सात्विक मार्गाने लोकांचं कल्याण केलं जातं. इथे येणाऱ्यांकडून सोनं-नाणं मागितलं जात नाही, पण त्यांच्या जीवनात जी दागिन्यासारखी नाती आहेत ती जपली जातात. इथे माणूस हरवलेला असेल, पण त्याला पुन्हा सावरून उभं राहण्यासाठी बळ दिलं जातं.
महाशक्तीपिठात कुणी आलं की, आधी त्याच्या मनातला अंधार समजून घेतला जातो. त्याचे प्रश्न ऐकले जातात. त्याला कोणताही निर्णय घाईत घ्यायला लावला जात नाही. आणि मुख्य म्हणजे, इथे सेवा ही हृदयातून केली जाते. सेवा निशुल्क नाही, कारण प्रत्येक गोष्टीला एक जबाबदारी असते. पण इथे जे काही शुल्क घेतलं जातं, त्याचा वापर धर्मकार्य, अन्नदान, शिक्षण, आणि जनकल्याणासाठीच होतो याची पूर्ण शाश्वती दिली जाते.
महाशक्तीपीठ ही एक साद आहे अशा सर्व लोकांसाठी जे आज एकटे आहेत, जे हरवले आहेत, जेथून मार्ग दिसत नाही. तुम्ही जर अशा अडचणीत असाल, वाट चुकल्यासारखं वाटत असेल, तर एकदा महाशक्तीपिठात या. प्रत्यक्ष येणं शक्य नसेल तर एक कॉल करा, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, आणि उत्तरही दिलं जाईल.
आयुष्य एका कॉलने किंवा भेटीने एकदम बदलणार नाही, पण त्या दिवशी एक नवी दिशा सुरू होईल ज्याने आजवर हजारो लोकांची आयुष्यं उजळून निघाली आहेत.
